Samsung galaxy S22: सॅमसंगची विशेष ऑफर, २७ हजारात खरेदी करा ८६ हजाराचा हा स्मार्टफोन..

0

Samsung galaxy S22: प्रत्येकाला आपल्याकडेही दर्जेदार स्मार्टफोन (smartphone) असावा असं वाटत असतं. मात्र बजेटममुळे सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. रिल्सच्या जमान्यात स्मार्टफोनला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. उत्कृष्ट कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनला प्रचंड मागणी असल्याचं पाहायला मिळतं. मात्र जबरदस्त कॅमेरा असणारे स्मार्टफोन प्रचंड महाग असतात. सहाजिकच यामुळे अनेकांना तडजोड करावी लागते. मात्र आता Samsung जबरदस्त ऑफर देत आहे. सॅमसंगचा दर्जेदार स्मार्टफोन आता तुम्हाला निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

सॅमसंगच्या वेबसाईटवर आकर्षक ऑफर सुरू आहेत. या ऑफरमध्ये तुम्हीला Samsung galaxy S22 हा 86 हजाराचा स्मार्टफोन केवळ २७ हजारामध्ये विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर, हा smartphone तुम्हाला केवळ 27 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. सॅमसंगच्या ऑफिशिअल वेबसाईटवर ही कमालीची ऑफर तुमच्यासाठी सध्या लाईव्ह सुरू आहे. या ऑफरमध्ये तुम्ही Samsung Galaxy S22 हा फोन बंपर डिस्काउंट सोबत खरेदी करू शकणार आहे.

जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर

सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी विशेष वापर ठेवली आहे. ग्राहक सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या स्मार्टफोनची खरेदी बंपर डिस्काउंटमध्ये करू शकतात. 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची मूळ किंमत 85 हजार 999 रुपये आहे. मात्र सॅमसंगच्या वेबसाईटवर ग्राहकांना हा फोन 57 हजार 999 मध्ये खरेदी करता येत आहे. म्हणजेच, तुमची तब्बल 28 हजार रुपये बचत होणार आहे. याशिवाय जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला, तर तुम्हाला आणखी तीस हजार रुपयांनी हा स्मार्टफोन स्वस्त पडणार आहे. म्हणजेच तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 27 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या फिचर्स

सॅमसंगच्या या तगड्या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घ्यायचे झाल्यास, या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.1 इंचाचा येतो. सोबतच १२०hz ला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या प्रोसेसरचा विचार करायचा झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन 1 चिपसेट बसवण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील दर्जेदार देण्यात आला आहे. एलईडी फ्लॅश लाईटसह या स्मार्टफोनला तीन प्रायमरी कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50MP 10MP आणि 12MP कॅमेऱ्याचा समावेश आहे.

याशिवाय या स्मार्टफोनला 10MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जो सर्वोत्तम मानला जातोय. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या बॅटरीचा विचार करायचा झाल्यास, या स्मार्टफोनची बॅटरी 3700mAh ची देण्यात आली आहे. जी 25W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन फोन अँड्रॉइड 12 बेस्ड समसंगच्या one UI वर आधारित चालतो. हा स्मार्टफोन कंपनीने ब्लॅक, व्हाईट, ग्रीन या तीन कलरमध्ये बाजारात उतरवला आहे.

हे देखील वाचाOnePlus Smartphone: OnePlus चा हा स्मार्टफोन Amazon वर मिळतोय तब्बल वीस हजारांनी स्वस्त..

Valentine: यंदा व्हॅलेंटाईनला गुलाब नाही, या वस्तुची झाली रेकॉर्डब्रेक विक्री; जाणून तुम्हीही व्हाल हैराण..

Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर जीवघेणा हल्ला, दांडक्याने दोन गटात मारामारी, गाडीचाही चुरा, पाहा व्हिडिओ..

Health Tips: जाणून घ्या एक महिना साखर खाल्लीच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

Relationship Tips: या प्रकारच्या पुरुषांवर महिला टाकतात जीव ओवाळून; नातेसंबंध जोडण्यास असतात कायम तयार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.