OnePlus Smartphone: OnePlus चा हा स्मार्टफोन Amazon वर मिळतोय तब्बल वीस हजारांनी स्वस्त..

0

OnePlus Smartphone: आपल्याकडे देखील उत्कृष्ट स्मार्टफोन असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. खासकरून रिल्सच्या या जमान्यात स्मार्टफोनला (smartphone) अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. एक चांगला कॅमेरा असणारा स्मार्टफोन तुमच्याकडे असेल, तर तुम्ही दरमहा लाखो रुपये देखील कमवू शकता. साहजिकच त्यामुळे उत्कृष्ट कॅमेरा फोनची प्रतीक्षा प्रत्येकालाच असते. मात्र किंमती अभावी प्रत्येकाला चांगला कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करणे शक्य होत नाही.

उत्कृष्ट कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोनला प्रचंड मागणी असते. अलीकडे वन प्लस या स्मार्टफोनने देखील आपला वेगळा ग्राहक निर्माण केला आहे. खास करून तरुण पिढी या स्मार्टफोनचे खूप मोठे चाहते असल्याचं पाहायला मिळते. वन प्लस या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, या स्मार्टफोनला जबरदस्त कॅमेरा वर्क देण्यात आले आहे. जर तुम्ही देखील oneplus चा जबरदस्त कॅमेरा असणारा उत्कृष्ट स्मार्टफोन खरेदी करायच्या विचारात असाल, आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुमचा शोध याठिकाणी पूर्ण होणार आहे.

वन प्लस कंपनीने लॉन्च केलेला OnePlus 10T 5G या स्मार्टफोनची मूळ किंमत तब्बल 55 हजार रुपये इतकी आहे. साहजिकच त्यामुळे इच्छा असून देखील अनेकांना हा फोन किमती अभावी खरेदी करता येत नव्हता. मात्र ॲमेझॉनवर भन्नाट ऑफर सुरू असून, ग्राहकांना आता हा स्मार्टफोन तब्बल पन्नास टक्क्याहून अधिक डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्ट (Flipkart) अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर (Amazon e commerce website) अनेक बड्या कंपन्यांचे स्मार्टफोन ग्राहकांना नेहमी निम्या किंमतीत खरेदी करता येतात. आता पुन्हा एकदा अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर ग्राहकांना OnePlus 10T 5G हा स्मार्टफोन तब्बल 24 हजारांपर्यंत खरेदी करता येणार आहे. अमेझॉनवर सुरू असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला हा फोन तब्बल सहा हजार रुपये डिस्काउंटवर खरेदी करता येत आहे. सोबतच तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला 24 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडीशनमध्ये असेल, तर तुम्हाला 18000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळू शकते.

फीचर आणि स्पेसिफिकेशन

जबरदस्त कॅमेरा बरोबरच या स्मार्टफोनचे फीचर्स देखील कमाल आहेत. या स्मार्टफोनमध्ये ग्रहकाना 16GB LPDDR5 रॅम त्याचबरोबर 256GB स्टोरेज मिळते. या स्मार्टफोनला ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेटचे प्रोसेसर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये तब्बल 6.7-इंचाचा फुल एचडी + फ्लुइड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच 120Hz रिफ्रेश रेटला त्याचबरोबर 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करणारा आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनकरिता कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील देण्यात आली आहे.

कॅमेरा

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्या विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, या स्मार्टफोनला तगडा कॅमेरा देण्यात आला आहे. 8MP अल्ट्रा-वाइड अँगल तसेच 50MP प्राथमिक लेन्स आणि 2MP मॅक्रो अशा स्वरूपाचा ट्रीपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीनही कॅमेरे फ्लॅशसह येणार आहेत. फ्रंट कॅमेऱ्याविषयी जाणून घ्यायचे झाल्यास 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

MSRTC Recruitment 2023: ST महामंडळात या उमेदवारांसाठी तब्बल इतक्या पदांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..

Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात या उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Ration Card: सरकारचा मोठा निर्णय! या 14 जिल्ह्यांना मिळणार रेशन ऐवजी वर्षाला 36 हजार रुपये..

Yuzvendra Chahal: चहल होणार पिता, इतक्या महिन्यांची गरोदर आहे धनश्री; पाहा व्हिडिओ..

Hug Day: मित्र आणि जोडीदाराला मारलेल्या मिठीतला हा फरक माहीत असायलाच हवा अन्यथा गमवाल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.