Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

0

Job: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. दूरसंचार विभाग अंतर्गत दूरसंचार विभाग पुणे याठिकाणी तब्बल 270 जागांची रिक्त भरती केली जाणार असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या नोकर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. (Telecommunication requirment 2023)

दूरसंचार विभागा अंतर्गत पुणे विभागात केल्या जाणाऱ्या भरतीसाठी “उपविभागीय अभियंता” या पदासाठी 270 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, इलेक्ट्रिकल त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक तसेच इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन, कॅम्पुटर सायन्स, टेलिकम्युनिकेशन, माहिती तंत्रज्ञान इत्यादी विभागापैकी उमेदवाराने किमान एक अभियांत्रिकी पदवी संपादन करणे आवश्यक आहे. पात्रतेविषयी सखोल माहिती हवी असल्यास यावर क्लिक करा. (Department of Telecommunications)

वयोमर्यादा आणि वेतन

दूरसंचार विभागाअंतर्गत केल्या जाणाऱ्या 250 रिक्त जागांच्या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा आणि वेतन याबाबत जाणून घ्यायचं झाल्यास, अर्ज प्राप्त होईपर्यंत उमेदवाराचे वय 56 वर्षाहून अधिक नसणे आवश्यक आहे. दरमहा वेतनाविषयी जाणून घ्यायचं झाल्यास, उपविभागीय अभियंता या पदासाठी एक लाख 51 हजार शंभर रुपये इतका पगार देण्यात येणार आहे.

अर्ज पद्धत नोकरीचे ठिकाण

दूरसंचार विभागांतर्गत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठीचा पत्ता खालील प्रमाणे, ADG-1(A & HR), DGT HQ, खोली नंबर 212 दुसरा मजला, UIDAII इमारत, काली मंदिराच्या पाठीमागे, नवी दिल्ली -110001 अधिकृत वेबसाईट dot.gov.in

हे देखील वाचा IND vs AUS: स्मिथ-वॉर्नर प्रमाणे जडेजानेही केली चेंडू सोबत छेडछाड; व्हिडिओ समोर आल्याने उडाली खळबळ..

Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..

Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.