Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

0

Relationship tips: पुरुष सुंदर महिला किंवा मुलींकडे पाहतात हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. यात महिलांचा देखील समावेश असतो. फक्त पुरुषच पाहतात असं नाही तर महिला देखील पुरुषांकडे पाहतात. पुरुष आणि महिला या दोघांना एकमेकांविषयी आकर्षण असतं. महिलांच्या तुलनेत पुरुष महिलांकडे सर्वाधिक जास्त आकर्षित होतात. महिलांच्या काही ठराविक अवयवांकडे पुरुष सर्वाधिक आकर्षित होत असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे. पुरुष सर्वप्रथम महिलांच्या पाच अवयवांकडे प्रथम आकर्षित होतात. कोणते आहेत, ते अवयव जाणून घेऊया सविस्तर.

महिलांचे मोकळे केस करतात आकर्षित

एखादी महिला मोकळे केस ठेऊन रस्त्यावरुन जात असेल तर सर्वांच्या नजरा त्या महिलेकडे गेल्याचे आपल्याला बघायला मिळेल. मोकळे केस असणार्‍या महिलांकडे लगेच पुरुषांचे लक्ष जाते. दाट आणि लांब केस असणार्‍या महिलेने तिचे केस मोकळे सोडल्यास ती महिला अधिक सुंदर दिसते. असं एका सर्व्हेतून समोर आले आहे. ज्यामध्ये असे निदर्शनास आले की, ७४ टक्के पुरुष महिलांच्या केसाकडे बघून आकर्षित होतात. महिलांनी मोकळे सोडलेल्या केसांवर नेहमी पुरुषांची नजर खिळून राहते, हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल.

पुरुषांना आकर्षित करण्यासाठी महिलांचे कपडे सुद्धा मोठी भूमिका बजावतात. स्वच्छ आणि सुंदर कपडे परिधान केलेल्या महिलेकडे सगळ्यांची नजर वळते. त्यामुळे बर्‍याचदा असे निदर्शनास येते की, स्वच्छ कपडे घातलेल्या महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात. यासंबंधीत करण्यात आलेल्या सर्वेत असे लक्षात आले की, २६ टक्के पुरुष महिलांचे कपडे बघून त्यांच्याकडे आकर्षित होतात. चमकदार कपडे यात आणखी भर घालतात. त्यामुळे लैंगिक भावना उत्तेजीत करण्यासाठी बर्‍याचदा चमकदार कपड्यांचा उपयोग केला जातो. सहसा रात्रीच्या वेळी नाईट ड्रेसमध्ये महिला चमकदार कपड्यांचा वापर करतात. ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक उत्तेजनेस चालना मिळते.

हसणं हा माणसाच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण असे म्हणतात, हसण्याने माणासाचे आयुष्य वाढते. महिलांची स्माईल पुरुषांना त्यांच्या मोहात पाडते. Match.com या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महिलांच्या स्माईलकडे ८८ टक्के पुरुष आकर्षित होतात. पहिल्याच भेटीत छान स्माईल देणाऱ्या मुलींनी आमच्यावर कमालीची छाप पाडली असल्याचं एका सर्वेक्षणात म्हंटले आहे. यामध्ये किमान १००० पुरुषांचे सर्वेक्षण करण्यात आले. मॅंचेस्टर युनिव्हर्सिटीने देखील यावर एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये गुलाबी आणि लाल लिपस्टिक वापरणार्‍या तरुणी स्माईल करताना पुरुषांना जास्त आकर्षित करत असल्याचं समोर आले आहे.

ज्याप्रमाणे महिलांचे स्वच्छ कपडे पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यात मोठी भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेला सर्वाधिक महत्व देणार्‍या महिला पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करतात. कामाच्या व्यापामुळे महिलांना वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. स्वच्छतेला महत्व न देणार्‍या महिला पुरुषांना आवडत नसल्याचं समोर आलं आहे.

पुरुष महिलांच्या पाच अवयवांकडे आकर्षित होत असले तरी या सगळ्यांमध्ये पुरुष महिलांच्या डोळ्यांकडे सर्वाधिक जास्त आकर्षित होतात. पुरुषांची नजर सर्वप्रथम महिलांच्या डोळ्याकडे जात असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे. ७० टक्के पुरुष महिलेच्या डोळ्यांचे निरीक्षण करतात. तसेच महिलेच्या डोळ्यांकडे काळजीपूर्वक बघतात. महिलांच्या डोळ्यांचा पुरुषाच्या मनावर खोलवर परिणाम होतो. मोठे डोळे असणार्‍या महिला यात अधिक भर घालतात. असे म्हणतात हृदयाचा मार्ग डोळ्यातून जातो. त्यामुळे बहुतांशी मुलं मुलीच्या सुंदर डोळ्याकडे बघून त्यांच्या प्रेमात पडतात.

हे देखील वाचा Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Shikhar Dhawan: मिस्टर आयसीसीचे करिअर संपुष्टात; BCCI ने संपवलं शिखर धवनचे करिअर..

IB Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; लगेच जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या गोष्टींची काळजी घेतल्यास पती-पत्निमध्ये कधीच उद्भवत नाहीत समस्या..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.