Chanakya Niti: लग्नापूर्वी या गोष्टींची काळजी घेतल्यास पती-पत्निमध्ये कधीच उद्भवत नाहीत समस्या..

0

Chanakya Niti: आपल्या भारतीय संस्कृतीत (Indian culture) विवाहाला (marriage) एक वेगळे महत्व आहे. कोणत्याही नात्यांमध्ये प्रेम (Love) विश्वास (trust) आत्मसन्मान (self respect) आणि एकमेकांचा आदर होत नसेल तर नातं अधिक काळ टिकत नाही. पती-पत्नीच्या (husband wife) नात्यांमध्ये तर या गुणांना विशेष महत्त्व आहे. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी पती पत्नी यांच्या नात्याविषयी आपल्या नीतीशास्त्रामध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. तुम्हाला देखील वैवाहिक जीवनामध्ये समस्या येऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्राचा अवलंब करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया आचार्य चाणक्याने सांगितलेल्या निती शास्त्राविषयी सविस्तर.

लग्नापूर्वी दोघांनीही काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. काहीजण वैवाहिक जिवनाचा पुरेपुर आनंद घेऊ शकत नाहीत. छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद होतात. त्यामुळे पती-पत्नीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला या त्रासातून जावे लागते. बर्‍याचदा तर नात्यांमध्ये ताटातुट सुद्धा होते. त्यामुळे वैवाहिक जिवनाचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असते.

आचार्य चाणाक्य यांच्या चाणाक्य निती या ग्रंथामध्ये राजकारण, समाजकारण, नातेसंबंधाबाबत माहिती देण्यात आली आहे. यासोबतच मानवी जिवनाला सुखकर करण्यासाठीचे अनेक उपदेश चाणाक्यांनी चाणाक्य निती या ग्रंथामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये वैवाहिक जिवनाचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी कोणत्या गोष्टींचा प्रकर्षाने विचार करणं आवश्यक आहे. याविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. वैवाहिक जिवनात खटके उडण्यास कुठली कारणे जवाबदार आहेत. यावर सुद्धा आचार्य चाणाक्य यांनी भाष्य केले आहे.

आचार्य चाणाक्य यांच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कारण याच गोष्टी तुमच्या वैवाहिक जिवनाच्या आनंदात बाधा निर्माण करत असतात. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे लग्न होणार्‍या पती-पत्नीच्या वयातील अंतर आहे. लग्न करण्याअगोदर दोन्ही कुटुंबांनी या गोष्टीचा गांभिर्याने विचार करणे जरुरी आहे. वयामध्ये जास्त अंतर असणार्‍या पती-पत्नींचे नाते दिर्घकाळ टिकत नाही. नाते टिकले तरी त्या नात्यातला जिवंतपणा हरवून जातो. असे चाणाक्य यांनी सांगितले आहे. आचार्य चाणाक्य यांनी याबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे. ज्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

पती-पत्नीच्या वयातील अंतर नात्यात कटुता निर्माण करण्यास कारणीभूत ठरु शकते. वयाने मोठ्या असणार्‍या पुरुषाशी एखाद्या तरुणीचे लग्न करुन दिल्यास ते नाते दिर्घकाळ टिकणे कठीण असते. कमी वय असणार्‍या तरुणीच्या काही वेगळ्या गरजा असतात. तसेच ती तिच्या वयानुसार एका वेगळ्या नजरेतून जिवनाकडे बघत असते. याउलट वय जास्त असणार्‍या पुरुषाच्या स्वभावात काहीसा निरसपणा येतो. तरुण वयात विविध अनुभव घेतले असल्यामुळे, ठराविक वयाचा टप्पा गाठल्यानंतर तो वेगळ्या पद्धतीने जिवनाकडे बघू लागतो. त्यामुळे नात्यात समतोल राहत नाही. संवाद कमी होतो आणि त्या नात्यातला जिवंतपणा नाहीसा होतो. परिणामी नाते तुटू सुद्धा शकते.

आपण बघतो की, बर्‍याचदा वयाने मोठ्या असणार्‍या स्त्रीशी सुद्ध लग्न केले जाते. आचार्य चाणाक्य यांच्या चाणाक्य नितीनुसार पतीचे वय पत्नीच्या वयापेक्षा कमी असणारे नाते जास्त काळ टिकू शकत नाही. वयाने मोठ्या असणार्‍या स्त्रीशी नाते जोडल्यास त्यामध्ये समन्वय राहत नाही. बर्‍याचदा वय जास्त असल्यामुळे स्त्री पुरुषावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करते. मात्र पुरुषाला ते मान्य होत नाही. त्यामुळे छोट्या-छोट्या कारणांवरुन भांडण-तंटे व्हायला लागतात. परिणामी ते नाते तुटण्याच्या मार्गावर येते. त्यामुळे वयाने मोठ्या असणार्‍या स्त्रीशी नाते जोडण्या अगोदर थोडा विचार करणे जरुरी आहे.

सुखसोयी असून सुद्धा अनेकांना शांतता मिळत नाही. छोट्या-छोट्या कारणांवरुन भांडणं होतात. वारंवार नात्यात वितुष्ट निर्माण होते. त्यामुळे सर्व सुरळीत असताना सुद्धा शांत आणि समाधानी वाटत नाही. आपल्या आजूबाजूला पाहिले तर मोठ्या संख्येने लोकं या समस्येने ग्रासले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र आचार्य चाणाक्यांनी यावर फार छान उपदेश केले आहेत‌.

आचार्य चाणाक्य म्हणतात, वैवाहिक जिवनाचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी समाधानी असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे पती-पत्नी या दोघांनाही एकमेकांच्या गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकमेकांच्या गरजांची पूर्तता करण्यावर दोघांचा भर असला पाहिजे. जेणेकरुन दोघांनाही समाधानी वाटेल.

तसेच नात्यात समजुतदारपणा असणे फार आवश्यक आहे. दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असायला हवी. नसल्यास ती विकसीत करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन एकमेकांच्या चुकांचे जाहीर प्रदर्शन न करता त्या चुका समजून घेता येतील. तसेच एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्यावा, दोघांमधील संवाद वाढवावा. आचार्य चाणाक्य यांच्या म्हणण्यानुसार, या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नात्यात कधीच वितुष्ट निर्माण होणार नाही.

हे देखील वाचा Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Health tips: उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे जाणून व्हाल चकित; जाणून घ्या हरभरे खाण्याचे शरीरावर होणारे परिणाम..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

PM Kisan Yojana: म्हणून PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होतेय कमी; आत्ताच जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही १३ वा हप्ता..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.