Health tips: उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे जाणून व्हाल चकित; जाणून घ्या हरभरे खाण्याचे शरीरावर होणारे परिणाम..

0

Health tips: निरोगी आरोग्यासाठीआहार सर्वात महत्वाची भूमिका बजावतो. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक आपल्याला आहारातून मिळतात. त्यामुळे आपण कायम निरोगी आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच ज्या खाद्य पदार्थांमधून पोषक घटक आपल्या शरीराला मिळतील अशाच पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारात ठेवायला हवा. अशाच एका पोषक पदार्थाबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. त्या खाद्यपदार्थाचे नाव आहे उकडलेले हरभरे.

असलेल्या चण्याचे प्रचंड फायदे आहेत. उकडलेल्या चण्यामध्ये पोषक घटकांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे उकडलेल्या चण्याचा आहारात समावेश करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. मात्र सहसा उकडलेले चणे कोणी खात नाही. बर्‍याचदा चण्याला पाण्यात भिजू घातले जाते. त्यानंतर त्या भिजलेल्या चण्याला झणझणीत फोडनी देऊन जेवणात त्याचा समावेश केला जातो. मात्र तेलाची फोडणी देण्यापेक्षा केवळ उकडून चणे खाण्याचे फायदे अधिक आहेत.

एखाद्या वेळेस नाश्त्यामध्ये रोज तेच-ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळेला उकडलेले हरभरे तुमच्या उपयोगी येऊ शकतात. गरम पाण्यात छान हरभरे ऊकदूरन, त्यात कांदे, कोथिंबिर आणि चाट मसाला घालून तुम्ही त्याला अधिक चविष्ट करु शकता. सकाळी नाश्त्यामध्ये हा पदार्थ खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि ऊत्साहवर्धक वाटू लागेल. कारण उकडलेल्या हरभर्‍याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच ब्रेन बुस्टर म्हणून सुद्धा हरभर्‍याला महत्व आहे. उकडलेले हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या फायद्यांबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत.

कॅलरीजची मुबलक मात्रा

निरोगी आयुष्याशी कॅलरीजचा फार जवळचा संबंध आहे. आपल्या आहारातून आपल्या शरीरात कॅलरीज जात असतात. कॅलरीजचे संतुलीत प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज आपल्या शरीरात जाणे योग्य आहे. कॅलरीजचे संतुलन बिघडले की, लगेच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवायला लागतो. शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात कॅलरीज आपल्या शरीरात जाणे जरुरी आहे. उकडलेल्या चण्यांमध्ये कॅलरीजचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे चणे उकडून खाल्ल्यास शरीराच्या कॅलरीजच्या गरजेची बर्‍यापैकी पूर्तता होऊ शकते.

उकडलेले हरभरे प्रोटीनयुक्त

शरीराला कायम सुदृढ ठेवण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. उकडलेल्या हरभर्‍यांमध्ये प्रोटीन्सची मात्रा पुष्कळ असते. शरीरातील उर्जा वाढवण्यात प्रोटीन्सचा मोठा वाटा असतो. दिवसभर शरीराला कार्यक्षम ठेवण्यासाठी शरीरात प्रचंड उर्जा असणे आवश्यक आहे. त्याकरिता शरीरात प्रोटीन्सची मात्र असणे जरुरी आहे. त्यामुळे सकाळी नाश्त्यात ऊच्च प्रमाणात प्रोटीन्स असलेले उकडलेले चणे खाल्ल्यास दिवसभर शरीर एकदम उर्जावान राहते. याशिवाय उकडलेल्या चण्यांचे सेवन केल्यास स्नायु सुद्धा बळकट होतात. त्यामुळे स्नायु संबंधित तक्रार असणार्‍यांनी तर आवर्जुन या पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करावा.

फायबरचे मुबलक प्रमाण

उकडलेल्या चण्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते. फायबर शरीरातील वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. तसेच उकडलेल्या हरभर्‍यांमुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहते. जेणेकररुन पचनक्रिये संबंधित आजार होण्याची शक्यता कमी असते. तसेच पचनक्रिया सुरळीत असल्यास तुम्ही अनेक आजारांपासून मुक्तता मिळवू शकता. चण्यांमुळे अनावश्यक वाढणार्‍या चरबीवर सुद्धा बंधन येते. तसेच लालसा कमी करण्यासाठी सुद्धा चणे उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

हे देखील वाचा Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

Viral video: शिकार करायला गेलेल्या वाघाचा माकडानेच केला करेक्ट कार्यक्रम; व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

PM Kisan Yojana: म्हणून PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होतेय कमी; आत्ताच जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही १३ वा हप्ता..

Aadhaar card: आधार कार्ड धारकांना मिळणार ४.७८ लाखांचे कर्ज! काय आहे या योजनेची सत्यता? जाणून घेऊया..

Bigg Boss season 16: बिग बॉस 16 च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव आले समोर; जाणून घ्या धुमाकुळ घालणाऱ्या या स्पर्धकाचे नाव..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.