Aadhaar card: आधार कार्ड धारकांना मिळणार ४.७८ लाखांचे कर्ज! काय आहे या योजनेची सत्यता? जाणून घेऊया..

0

Aadhaar card: आधार कार्ड हे आता अत्यंत महत्वाचे दस्तावेज झाले आहे. ओळख पटवण्यासोबतच आधार कार्डचे अनेक फायदे आहेत. सरकारी योजनांना यशस्वीरीत्या राबवण्यासाठी, त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधार कार्ड मोठी भूमिका बजावते. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. एवढेंच नाही तर आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर आणि बॅंक खाते लिंक असणे सुद्धा अनिवार्य आहे. तेव्हाच तुम्ही सरकारी योजनेचा पुरेपुर लाभ घेऊ शकाल. त्यामुळे ओळखपत्रापुरते मर्यादित न राहता, आधार कार्डचे स्वरुप आता व्यापक झाले आहे.

एकीकडे आधार कार्डचे विविध फायदे असताना काही तोटे सुद्धा आहेत. आधार कार्डचा वापर करुन फसवणूक होत असल्याच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशावेळी सातत्याने सायबर यंत्रणेकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात येत असतो. मात्र मोहाला बळी पडून अनेक जण या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याच्या घटना घडत आहेत. सोशल मिडीयावर आधार कार्ड संबंधित विविध मॅसेज फिरत असतात. मात्र त्याची सत्यता पडताळून बघणे हे आपले काम आहे. असाच एक मॅसेज सध्या सोशल मिडीयावर फिरतो आहे. ज्याची सत्यता आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

आधार कार्डधारकांना मिळणार ४ लाख ७८ हजारांचे कर्ज! असा हा मॅसेज आहे. सोशल मिडीयावर अनेकांनी हा मॅसेज वाचला असेल. मात्र काही सुज्ञ लोकांनी या मॅसेजबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला सुद्धा या मॅसेजच्या सत्यतेबाबत विचारणारे अनेक मॅसेज प्राप्त झाले. यानंतर आम्ही याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. नेमक्या कुठल्या योजनेअंतर्गत आधार कार्डधारकांना हे कर्ज वितरीत केले जात आहे. याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या योजनेच्या सत्यतेबाबतची महत्वाची माहिती आमच्या हाती लागली, जी येथे आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

आधार कार्ड धारकांना मिळणार ४.७८ लाखांचे कर्ज! हा सोशल मिडीयावर व्हायरल होणारा मॅसेज पूर्णत: खोटा आणि फेक आहे. हा दावा आम्ही नाही तर, खुद्द एका सरकारी फॅक्ट चेक कंपनीने केला आहे. सरकारकडून अशा कुठल्याही योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही. कुणीतरी चुकीच्या उद्देशाने हा मॅसेज व्हायरल करत आहे. त्यामुळे तुम्हाला जर असा कुठला मॅसेज आला असेल, तर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सुद्धा या सरकारी एजन्सीने केले आहे. मात्र ही एजन्सी नेमकी कुठली आहे आणि काय काम करते? याबाबत सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.

पीआयबी फॅक्ट चेक असे या एजन्सीचे नाव आहे. सरकारी योजनांसंबंधित सोशल मिडीयावर व्हायरल होणार्‍या मॅसेजची सत्यता शोधण्याचे काम ही कंपनी करते. याशिवाय खोट्या मॅसेजचे खंडन करते. ही एजन्सी भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करते. त्यामुळे सरकारी धोरणे व योजनांबाबत पसरवण्यात आलेल्या चुकीच्या संदेशांना प्रकाशझोतात आणण्याचे काम या संस्थेचे आहे. तुम्हाला सुद्धा एखाद्या मॅसेजवर संशय वाटत असल्यास या पीआबी फॅक्ट चेकच्या सहाय्याने तुम्ही त्या मॅसेजची सत्यता पडताळू शकता. एजन्सीच्यावतीने सर्वसामान्यांसाठी मोबाईल क्रमांक आणि मेल आयडी जारी करण्यात आला आहे. 918799711259 या मोबाईल क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in किंवा या ई-मेल आयडीवर मॅसेजन करुन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

आधार कार्ड बाबत विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सायबर चोरट्यांकडून मोह दाखवून पद्धतशीरपणे तुम्हाला जाळ्यात अडकवले जाते. त्यामुळे कुठल्याही मॅसेजची सत्यता पडताळल्या शिवाय समोर जाऊ नका. तुमच्या संबंधित कुठलीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करु नका असे आवाहन पीआयबी फॅक्स चेक एजन्सीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन केले आहे.

 हे देखील वाचाBCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Aadhar card: आधार कार्डवरून बँक अकाउंट  केलं जातंय रिकामं; त्वरित फॉलो करा या टीप्स..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..

Viral video: सापाची आणि माकडाची थरारक झुंज पाहून व्हाल थक्क; पाहा काय झाला शेवट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.