Aadhar card: आधार कार्डवरून बँक अकाउंट केलं जातंय रिकामं; त्वरित फॉलो करा या टीप्स..
Aadhar card: आधार कार्ड (aadhar card) प्रत्येकाकडे असणे जवळपास आता अनिवार्यच झालं आहे. आधार कार्ड केवळ ओळखपत्रापूरतं मर्यादित न राहता अनेक ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवायचा असल्यास आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि बॅंक अकाऊंट (Bank account) आधार कार्डशी लिंक असणे जरुरी आहे. लिंक नसल्यास अनेक लाभांपासून वंचित राहण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळे जवळपास सर्वांनीच मोबाईल नंंबर आणि बॅंक अकाऊंट आपल्या आधार कार्डशी लिंक केलेले आहे.
आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक (Aadhar card Bank account linked) असल्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटे देखील आहे. तुम्ही योग्य खबरदारी घेतली नाही, तर तुमचं बँक अकाउंट आधार कार्डच्या माध्यमातून रिकामं देखील केलं जाऊ शकतं. सायबर चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कोण त्यांच्या जाळ्यात अडकतं? याकडं त्यांचं बारीक लक्षं असतं. थोडीही कुजबुज लागताच, ते डाव टाकतात आणि क्षणार्धात तुमचं बॅंक अकाउंट रिकामं केलं जातं. आधार कार्डच्या नंबरवरुन बॅंक अकाऊंटमधील रक्कम लंपास केल्याच्या अनेक घटना आपण बातम्यांमधून ऐकल्या आहेत. त्यामुळे आजच्या या सायबर चोरीच्या युगात सुरक्षेच्या दृष्टीने आपण कायम सजग असणं जरुरी आहे.
आधार कार्डवरील सर्व डेटा सुरक्षित असल्याचा दावा आधारशी संबंधित UIDAI कडून केला जातो. मात्र त्याचवेळी सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांकडून केले जाते. कारण या चोरींच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होते आहे. या सायबर चोरट्यांची पुढील शिकार तुम्ही देखील होऊ शकता. परंतू तुम्ही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी काही महत्वाच्या टीप्स आम्ही येथे देत आहोत.
ओटीपी
सायबर पोलिसांकडून सुद्धा ही सुचना वारंवार दिली जाते. ओटीपी म्हणजे संबंधित व्यवहार करण्यासाठी तुमची परवानगी मागितली जाते. त्यामुळे तुम्ही जर ओटीपी दिला, तर संबंधित व्यवहारास तुमची परवानगी आहे असा संदेश जातो. त्यामुळे तुम्हाला कधीही ओटीपी देण्यासंबंधी फोन किंवा मॅसेज आला तर त्याला रीप्लाय देऊ नका. बर्याचदा तुमच्याशी खोटं बोलून तुमच्याकडून ओटीपी घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, UIDAI चे प्रतिनिधी कधीच ओटीपी मागत नाहीत. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडून ओटीपी शेअर करण्याची चुक बिलकुलही करु नका.
आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करा
आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे फार गरजेचे आहे. बेसीक व्हेरीफीकेशन तसेच आधार कार्डशी संबंधित ईतर फीचर्सचा वापर करण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे जरुरी आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा. अद्यापपर्यंत लिंक केलेला नसेल किंवा मोबाईल नंबर बदलला असेल तर लगेच जवळच्या आधार केंद्राला भेट द्या आणि तेथे आधार कार्ड अपडेट करुन घ्या. जर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असेल, तर आधार कार्डशी कुठलीही छेडछाड झाल्यास लगेच संबंधित सुचना तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल.
डिजीटल कॉपीचा वापर करा
अनेकवेळा ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या कॉपीची मागनी केले जाते. मात्र शक्य होईल तोपर्यंत डिजीटल कॉपीचा वापर करा. UIDAI ने सुद्धा डिजीटल कॉपीला परवानगी दिली आहे. त्यामुळे जागोजागी आधार कार्डची कॉपी देण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डिजीटल कॉपी सेव्ह करुन ठेवा. डिजीटल कॉपीवर काम चालवा. जेणेकरुन तुमच्या आधार कार्डच्या कॉपीचा सुद्धा गैरवापर होणार नाही.
आधार कार्डची हिस्ट्री चेक करा
तुमच्या आधार नंबरचा कुठे वापर केला गेलाय का? याची माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे शक्य झाल्यास आपल्या आधार कार्डची हिस्ट्री चेक करा. अगदी सोप्या पद्धतीने हिस्ट्री चेक केली जाऊ शकते. सर्वप्रथम UADAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला तुमच्या आधारची हिस्ट्री ट्रॅक करता येईल. त्यावरुन तुम्ही तुमच्या आधार कार्ड नंबरचा गैरवापर होण्यापासून रोखू शकता. आधार कार्डच्या सुरक्षेसंबंधीत या काही महत्वाच्या टीप्स बघून तुम्ही सायबर चोरट्यांचे शिकार होण्यापासून स्वत:ला वाचवू शकता.
हे देखील वाचा Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..
Sex Mistakes: सेक्स केल्यानंतर चुकूनही करू नका हे काम अन्यथा..
Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..
PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..
Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम