Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

0

Benefits Of Foreplay: वैवाहिक जीवन (married life) प्रत्येकाचं आनंदी आणि समाधानी असेलच, असं नाही. नातं सुंदर बनवण्यासाठी फक्त प्रेमाची गरज असते असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र प्रेमाव्यतिरिक्त देखील नात्याच्या काही गरजा आहेत, त्या तुम्हाला तितक्याच प्रायोरिटीने पूर्ण कराव्या लागतात. प्रेमाबरोबरच आनंदी आणि समाधानी आयुष्यासाठी भावनिक आणि शारीरिक गरजा देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. खरंतर काही विषयांवर आजही आपल्याकडे उघडपणे बोललं जात नाही. मात्र जीवनाशी निगडीत असणाऱ्या काही विशेष गोष्टींची तुम्हाला माहिती असणे, फार आवश्यक आहे.

वैवाहिक जीवनामध्ये शारीरिक संबंधाला (Physical relationship) अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारीरिक संबंध हा फक्त माणसाच्याच नाही, तर प्रत्येक प्राण्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच तुम्हाला शारीरिक संबंधविषयी असणारी प्रत्येक गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. एका सर्वेनुसार अनेक जोडप्यांना फोरप्ले (Foreplay) हा काय प्रकार आहे? हे माहीत नसल्याचं समोर आलं आहे. शारीरिक संबंध ठेवताना फोरप्लेचे काय महत्त्व आहे? फोरप्ले म्हणजे काय? फोरप्ले वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि समाधानी कसे बनवते? महिलांसाठी हे किती महत्वाचे आहे? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

जगभरातल्या आठ हजार स्त्रियांचा एक सर्वे करण्यात आला. ज्यामध्ये केवळ सात टक्के महिला आपल्या पार्टरसोबत संबंध केल्यानंतर समाधानी असल्याचं समोर आले आहे. लैंगिक संबंध ठेवत असताना महिला संबधा बाबत उत्तेजन होत नसल्याची माहिती देखील समोर आली. या दरम्यान ऑर्गेझमपर्यंत महिला न पोहचण्याला ‘फोरप्ले’ हे एकमेव कारण असल्याचं समोर आले. नियमितपणे संबंध ठेऊन देखील महिलांना समाधान आणि आनंद मिळत नाही. साहजिकच यामुळे लैंगिक संबंध हे एखाद्या कामाप्रमाणे बनून गेल्याचं सिद्ध होते. या सगळ्यांवर मात करायची असेल, तर तुम्हाला फोरप्लेचा पुरेपूर वापर करायचा आहे. सर्वप्रथम आपण फोरप्ले म्हणजे काय हे जाणून घेऊ.

फोरप्ले म्हणजे काय 

अनेकांना फोरप्ले म्हणजे काय? असा प्रश्न पडला असेल. तर या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास कोणत्याही खेळापूर्वी आपण जो ‘वॉर्म अप’ करतो, त्याला ‘फोर प्ले’ असं म्हटलं जातं. खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मन प्रसन्न करण्यासाठी ‘वॉर्म अप’ खूप गरजेचा असतो. जोडीदाराला उत्तेजित करण्यासाठी जे काही केलं जातं त्यास फोर प्ले’ म्हंटले जाते.  त्याचप्रमाणे लैंगिक संबंध करताना फोर प्ले जितका जास्त वेळ कराल, तितका तुम्ही अधिक वेळ याचा आनंद घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या महिला जोडीदाराला अधिक आनंद आणि समाधान देऊ शकता.

लैंगिक संबंध करण्याच्या अगोदर उत्तेजना खूप महत्त्वाची असते. उत्तेजना शिवाय लैंगिक संबंधाचा आनंद आणि समाधान देखील दोन्ही जोडप्याला मिळणार नाही. हे तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. लैंगिक संबंध करत असताना दोघांचीही उत्तेजना होईलच असं नसतं. महिलांच्या तुलनेत पुरुषांची संबंध करण्याची इच्छा लगेच होते. महिलांना मात्र यासाठी अधिक वेळ लागतो. दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पुरुष संबंधासाठी उत्तेजित होतात. तर महिलांसाठी वीस ते पंचवीस मिनिटे इतका काळ उत्तेजन होण्यासाठी लागतो. साहजिकच जितका वेळ तुम्ही संबंध ठेवायच्या अगोदर ‘फोर प्ले’ कराल तितका जास्त आनंद आणि समाधान महिलांना देऊ शकता. आता आपण फोर प्लेचा तुमच्या संबंधावर कसा परिणाम होतो, आणि ‘फोर प्ले’चे कोणकोणते प्रकार आहेत हे देखील सविस्तर जाणून घेऊ.

लैंगिक संबंधात फोर प्लेचं महत्व?

शारीरिक संबंध माणसाची फक्त गरजच नाही, तर शारीरिक संबंधाला भावनिकरित्या देखील खूप महत्त्व आहे. शारीरिक संबंध हा दोन जोडप्यांमधील भावनिक नातं घट्ट करत असतो. साहजिकच यामुळे भावनिक आणि शारीरिक नातं घट्ट करण्यात ‘फोर प्ले’ खूप मोठा रोल अदा करते. संबंध ठेवण्याची तुमची ज्यावेळेस इच्छा होते, तेव्हा तुमच्या जोडीदाराची इच्छा असेलच असं नाही. अनेक जोडपे शारीरिक संबंधाकडे एका कामाप्रमाणे पाहतात. मात्र कामापलीकडेही या संबंधाला महत्त्व आहे. शारीरिक संबंधामुळे तुमच्या दोघांमध्ये भावनिक नातं अधिक घट्ट होत असतं. मात्र त्यासाठी दोन्ही जोडीदारांची उत्तेजना शिखरापर्यंत जाणं आवश्यक असतं. आणि हे काम ‘फोर प्ले’ बजावत असते. यावरून लैंगिक संबंधा अगोदर फोर प्लेचं महत्त्व किती आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल.

महिलांसाठी आनंद आणि समाधानाचा क्षण

दोन्ही जोडप्यांची सेक्स करण्याची इच्छा झाली, तरी देखील संबंधांमध्ये ऑर्गेझम खूप महत्वाचा असतो. सेक्स करताना महिला ऑर्गेझमपर्यंत पोहचणं खूप गरजेचं असतं. लैंगिक संबंधापूर्वी तुम्ही उत्तेजनाच्या परमोच्च शिखरावर जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत तुमच्या संबंधाला काहीही अर्थ नसतो. संबंध दरम्यान दोन्हीं पार्टनर आनंदी आणि समाधानी होणं फार आवश्यक असतं. यासाठी लैंगिक संबंधा अगोदर तुम्ही जितका जास्त वेळ ‘फोर प्ले’ कराल तितके तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंद आणि समाधान देऊ शकता. पुरुषांच्या तुलनेत महिलांना उत्तेजित होण्यासाठी दुप्पट कालावधी लागतो. हे तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही ‘फोर प्ले’ खूप मोठ्या तीव्र प्रमाणात करणं गरजेचं आहे. ज्यामुळे महिलांना जास्त आनंद आणि समाधान मिळते.

जोडीदारांमध्ये संवाद होतो. 

सेक्स करत असताना आपण अनेकदा पाहतो, आपला जोडीदार आपल्याशी काहीही बोलत नाही. याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंद आणि समाधान देऊ शकत आहात, असा होत नाही. सेक्स करत असताना दोन्हीं जोडीदारांनी एकमेकांशी संवाद साधणं फार आवश्यक असतं. संबंधा दरम्यान दोघेही संवाद तेव्हाच साधू शकतात, जेव्हा दोघांचीही उत्तेजना परमोच्च शिखरावर असेल. जर तुम्ही ‘फोर प्ले’ला अधिक वेळ दिला असेल, तर तुमचा जोडीदार त्याच्या गरजेनुसार, आणि आवडीनुसार तुम्हाला साथ दिल्याचा अनुभव येईल. जो नॉर्मल संबंधा दरम्यान जाणवत नाही.

लैंगिक संबंधा आगोदर दोन्हीं जोडप्यांसाठी ‘फोर प्ले’ किती आवश्यक आहे, हे आपण जाणून घेतले. आता आपण ‘फोर प्ले’ चे कोणकोणते महत्वाचे मार्ग आहेत, हे देखील जाणून घेऊ.

लैंगिक संबंधा आगोदर ‘फोर प्ले’ खूप आवश्यक आहे. ‘फोर प्ले’ करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी तुम्ही काही महत्त्वाचे मार्ग अवलंबून तुमचं लैंगिक आयुष्य आनंदी आणि समाधानी बनवू शकता. यामध्ये लैंगिक संबंधाच्या अगोदर तुम्ही तुमच्या पार्टनरला महत्त्वाच्या अवयवांचा हलकासा चावा घेऊ शकता. तुमच्या दोन्ही हातानी जोडीदाराच्या अवयवांना कुरवाळू शकता. पार्टनर कोणत्या गोष्टीमुळे अधिक उत्तेजित होतो, याकडे देखील तुमचं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही या प्रकारचा अवलंब करू शकता.

लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी तुम्ही एकत्र अंघोळ देखील करू शकता. यासोबतच तुम्ही अधिक चावट विषयांवर गप्पा मारू शकता. संबंधाच्या बाबतीत तुम्ही अधिक मोकळेपणाने तुमच्या जोडीदारासोबत संभाषण करा. जोडीदाराला कोणत्या प्रकारे संबंध ठेवायला आवडतं, या विषयावर देखील तुम्ही बोलू शकता. एकाच पद्धतीने तुम्ही संबंध ठेवत असाल, तर यात बदल करा. नेहमी वेगवेगळी पोझिशन घेऊन तुम्ही संबंध ठेऊ शकता. चावट विषयांवरून तुम्ही तिला चिडवू शकता. अशा अनेक मार्गांनी तुम्ही ‘फोर प्ले’ करून तुमचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि समाधानी करू शकता.

हे देखील वाचा Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Intelligence Bureau Recruitment: १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी बंपर भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Married life tips: वैवाहिक जीवनातल्या या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा व्हाल बर्बाद..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.