Married life tips: वैवाहिक जीवनातल्या या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा व्हाल बर्बाद..

0

Married life tips: आयुष्यात (Life) प्रत्येकाला चढउतार पहावे लागतात. अनेक जण कठीण प्रसंगाचा तेवढ्याच हिंमतीने सामना करतात. तर काहीजण कठीण प्रसंगांमध्ये तुटून देखील जातात. जीवन जगत असताना आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडतील, असं अजिबात नसतं. तुम्हाला कधी कधी वास्तवात राहून येणाऱ्या कठीण वेळेचा देखील सामना तितक्याच हिंमतीने करणं गरजेचं असतं. आयुष्याशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टी विषयी आचार्य चाणक्य यांनी उलगडा केला आहे. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी लिहिलेल्या अनेक गोष्टी वाचून तुम्ही तुमचे आयुष्य सुंदर बनवू शकता. वैवाहिक जीवनातल्या (Married Life) तीन गोष्टी तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका, असं देखील आचार्य यांनी सांगितले आहे. अशा कोणत्या आहेत, त्या गोष्टी जाणून घेऊया सविस्तर. (Aacharya Chanakya niti)

आयुष्यात येणाऱ्या संकटाचा सामना तुम्हाला स्वतः करायचा असतो. तुमच्या आयुष्यात येणारी संकटे तुम्ही इतरांना सांगत असाल, तर लोक फक्त मजा घेत असतात. तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कोणीही मदत करत नाही. एवढेच नाही, तर तुम्ही अडचणीतून बाहेर यावं, अशी देखील अनेकांची इच्छा नसते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात येणाऱ्या काही अडचणी चुकूनही कोणाला सांगू नयेत, असं आचार्य चाणक्य म्हणतात. खास करून वैवाहिक जीवनातल्या अडचणी तुम्ही बाहेर सांगितल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. आणि समाजात तुमची प्रतिष्ठा मलिन होते. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत सविस्तर.

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली अनेक धोरणं तुम्ही आत्मसात करणे आवश्यक आहेत. आचार्य चाणक्य यांनी व्यवसायासंबंधी त्याचबरोबर, वैवाहिक जीवन, आरोग्य, पैसा, त्याचबरोबर समाजाशी संबंधित असणाऱ्या अनेक विषयांवर आपले आदर्श विचार मांडले आहेत. आचार्य चाणक्य यांच्यामध्ये जर वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील, तर त्यामुळे दुःखी होण्याचे काही कारण नाही. वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असणे स्वाभाविक आहे. मात्र वैवाहिक जीवनामधील अडचणी तुम्ही बाहेर सांगणं मूर्खाचे ठरेल.

वैवाहिक जीवनाच्या अडचणी विषयी आचार्य चाणक्य म्हणतात, तुमची अर्धांगिनी फायदासाठी तुमच्याशी भांडू शकते. अशावेळी तुमच्या दोघांचे भांडण हे समाजात कोणालाही सांगण्यात मूर्खाचं ठरेल. अर्धांगिनीच नाही, तर समाजातील कुठल्याही स्त्रीशी तुम्ही भांडू नका. स्त्रियांसोबत तुम्ही भांडल्याने समाजात तुमची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता असते. महिलांचा सन्मान जरूर करा. मात्र काही कारणामुळे वाद होईल, अशी शक्यता असते, अशा ठिकाणाहून पळ काढणे, देखील खूप आवश्यक असते.

वैवाहिक आयुष्य जगत असताना जर तुमच्या वैवाहिक जीवनासाठी पैशाची कमतरता भासत असेल, तर तुम्ही याकडे खूप गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्हाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर तुमच्या पत्नीचे देखील तुमच्यावरचे प्रेम कमी होऊ शकते. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये जर आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल, तर तुम्ही या परिस्थितीचा हिंमतीने सामना करणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनातील आर्थिक परिस्थिती बाबत तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नये, अन्यथा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो.

आयुष्यामध्ये अनेकदा अनेकांची फसवणूक होऊ शकते. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जर तुम्हाला मुर्खात काढून एखाद्याने फसवणूक केली असेल, आणि केलेली फसवणूक इतरांच्या किंवा तुमच्या देखील दृष्टीने खूप कमकुवत वाटत असेल, तर अशावेळी तुम्ही चुकूनही तुमची झालेली फसवणूक पत्नी त्याचबरोबर इतरांना देखील सांगू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला सहज फसवता येऊ शकते, असा अनेकांचा समज होऊ शकतो. तुमच्या या कृत्यामुळे तुम्हाला कमकुवत समजलं जातं. समाजात तुमची प्रतिमा मलिन देखील होण्याची शक्यता असते. साहजिकच यामुळे एखाद्या वेळेस तुमची फसवणूक झालीच तर तुम्ही कोणालाही सांगू नका.

हे देखील वाचाPhysical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

कांदा बाजारभाव: कांदा चार हजार पार! या तारखेपर्यंत कांदा करणार शंभरी पार..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Maharashtra Government Job: पोलिस, तलाठ्यासह विविध विभागात एकूण 75 हजार रिक्त पदांची होणार भरती; जाणून घ्या विभागनिहाय जागा आणि तारीख..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.