कांदा बाजारभाव: कांदा चार हजार पार! या तारखेपर्यंत कांदा करणार शंभरी पार..

0

कांदा बाजारभाव: दिवाळीनंतर (diwali) नवीन कांदा (new Onion) बाजारात (market) यायला सुरुवात होत असते. मात्र मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) कांद्यासह अनेक पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. साहजिकच यामुळे बाजारात नवीन कांदा यायला उशीर होणार असल्याने आता कांद्याच्या दरात (Onion price) दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे दिवाळीनंतर दाखल होणारा लाल कांदा (red onion) जवळपास संपुष्टात आला आहे. साहजिकच यामुळे लाल कांदा बाजारात दाखल होण्यासाठी आता खूप उशीर लागणार असल्याने, येणाऱ्या काळात कांद्याच्या दरात (Onion Rates) विक्रमी वाढ होणार असल्याचे बोललं जात आहे. (Kanda bajarbhav)

लाल कांद्याच्या हंगामाला आता उशीरा सुरुवात होणार असल्याने, मागणीनुसार कांदा बाजारात उपलब्ध होत नसल्याने, येणारे तीन महिने कांदा तेजीत राहणार असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे खराब झालेला कांदा देखील बाजारात काही प्रमाणात दाखल होत असल्याने, चांगल्या कांद्याला चांगला भाव देखील मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या चांगल्या दर्जाचा कांदा मार्केटमध्ये खूप कमी येत आहे. गेल्या दोन दिवसापासून कांद्याचा भाव वाढत चालला आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा कालचा बाजार ४ हजारपर्यंत पोहचला आहे. मात्र कांदा हा चांगल्या प्रतीचा असणे आवश्यक आहे.

महिनाभरात कांदा भिडणार गगनाला

अवकाळी पावसामुळे दिवाळीनंतर बाजारात दाखल होणाऱ्या लाल कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लाल कांदा तब्बल 90% खराब झाला असल्याने, कांद्याच्या मागणीनुसार पुरवठा होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. अवकाळी पावसामुळे फक्त शेतामध्ये असणाऱ्या लाल कांद्याचं नुकसान झालं नाही, तर शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याचं देखील खराब वातावरण आणि अवकाळी पावसामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे.

दिवाळीनंतर बाजारात दाखल होणारा लाल कांदा परतीच्या पावसामुळे अक्षरशः संपुष्टात आला. यासोबतच शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा देखील खराब वातावरण आणि अवकाळी पावसामुळे बाधित झाला. साहजिकच यामुळे आता बाजारात नवीन कांदा यायला आणखी तीन चार महिन्याचा अवधी लागणार असल्याने कांद्याची मागणी वाढणार आहे. आणि पुरवठा खंडित होणार आहे. साहजिकच यामुळे कांद्याच्या मागणीचे आणि पुरवठ्याचे गणित कोलमडल्यामुळे येणाऱ्या तीन महिन्यात कांदा उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

एका आठवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ

अवकाळी पावसामुळे दिवाळीनंतर बाजारात दाखल होणाऱ्या लाल कांद्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी, बाजारात चांगल्या प्रतीचा आणि हलक्या प्रतीचा कांदा दाखल देखील होत आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. परंतु चांगल्या प्रतीचा कांदा फक्त 20 टक्के बाजारात येत आहे. तर उर्वरित 80 टक्के हा कांदा हलक्या प्रतीचा असल्याने कांद्याचे भाव पाहिजे तेवढ्या प्रमाणात वाढले नाहीत. मात्र तरी देखील गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात पाच ते सात रुपयांनी दिवसेंदिवस वाढ होतच आहे. बाजारामध्ये एक नंबर कांदा हा ४० रुपयापर्यंत विकला गेला आहे. तर हलक्या प्रतीचा कांदा 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे देखील विकला आहे.

कांदा करणार शंभरी पार

अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे देशभरातील अनेक राज्यामधला कांदा खूप मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतलं जातं. मात्र पाठीमागच्या हंगामामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कर्नाटकसह महाराष्ट्रातील कांद्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसतो. मात्र यावर्षी शेतीत असणाऱ्या कांद्याबरोबरच शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस आणि खराब वातावरणामुळे शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांनी देखील साठवून ठेवलेला कांद्याचे नुकसान झाल्याने, आता मागणी आणि पुरवठ्याचे गणित चुकलं आहे. साहजिकच यामुळे आता कांद्याचा येणाऱ्या काळात खूप मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. बाजारात नवीन कांदा दाखल होण्यासाठी तीन ते चार महिने कालावधी लागणारा असल्याने, आता तीन महिने कांद्याच्या दरात खूप मोठी तेजी पाहायला मिळणार आहे. कांदा फक्त तेजीतच राहणार नाही, तर यावर्षी कांदा शंभरीपार करेल, असा देखील अंदाज या विषयाच्या तज्ज्ञांचा व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

Onion Price: या कारणामुळे कांदा करणार विक्रम; जाणून घ्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान काय असणार कांद्याची स्थिती..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.