Onion Price: या कारणामुळे कांदा करणार विक्रम; जाणून घ्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान काय असणार कांद्याची स्थिती..

0

Onion Price: सध्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी (Farmer) खूप कठीण काळ आहे. हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने (Return rain) हिरावून घेतल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राभर पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसा अगोदर अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) देखील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अवकाळी पावसातून सावर तो की नाही, तोवरच परतीच्या पावसाने सर्व काही हिरावून घेतलं. सोयाबीन, (Soybean) कांदा (Onion) फळबागा (Orchard) यासारख्या अनेक पिकांची अक्षरशः माती झाली. परंतु आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी येणार काळ चांगला असणार आहे. (Good news for onion farmers)

ऐन दिवाळीत (diwali) परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर (Maharashtra) पाहायला मिळत आहे. एकीकडे काढणीला आलेलं पीक परतीचा पाऊसामुळे मातीमोल झाल्यानंतर शेतकऱ्याची व्यथा डोळ्यांना पाहवत नाही. तर दुसरीकडे अजूनही सरकारकडून (maharashtra government) शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याची परिस्थिती आहे. साहजिकच यामुळे आता शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे स्वतःवर आलेल्या संकटाचा स्वतःचा सामना करायचा आहे.

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी, आता पुढच्या पिकांना मात्र शेतीसाठी पुरेसं पाणी मिळणार आहे. याशिवाय येणाऱ्या काळात शेतीमालाला देखील चांगला भाव मिळण्याची शक्यता असल्याचं तज्ञांनी म्हंटले आहे. खासकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी येणार काळ हा चांगला असून, येणाऱ्या तीन महिन्यांत कांद्याला विक्रमी भाव मिळणार असल्याचं बोललं जात आहे. पाठीमागच्या आठवड्यापूर्वी कांदा कवडीमोल भावाने विकला जात होता. मात्र या आठवड्यात अनेक ठिकाणी कांद्याला बाराशे ते दीड हजाराच्या आसपास बाजारभाव मिळाला आहे.

केंद्र सरकारने (central government) अनेक राज्यातमध्ये बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला असला तरी देखील किरकोळ बाजारामध्ये कांदा २५ ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. येणाऱ्या काळात या दरात आणखीन 20 ते 25 रुपये प्रति किलोने वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली असल्याने केंद्र सरकारने बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असली तरी देखील शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील खूप मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाबरोबरच आता परतीच्या पावसामुळे देखील कांद्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काढायला आलेला कांदा पावसामुळे शेतातच राहिला. आणि यामुळे जवळजवळ 90 टक्के कांदा हा शेतातच नासला गेला. यामुळे आता मागणीनुसार येणाऱ्या काळात पुरवठा होणार नसल्याने कांदा दराच्या बाबतीत विक्रम करणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

मध्य नोव्हेंबर पासून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कांद्या तेजीत राहणार असल्याचं बोललं जात आहे. डिसेंबर पासून फेब्रुवारी या तीन महिन्यात कांदा विक्रम करू शकतो. असा देखील अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे कांद्याचे महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फक्त शेतातीलच नाही, तर साठवून ठेवलेल्या कांद्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. साहजिकच यामुळे कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे.

सोलापूर एपीएमसीमध्ये पांढऱ्या कांद्याला तब्बल पाच हजार रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याचे बाजार भाव आता तेजीत वाढत चालले असून, कांदा येणाऱ्या काळात विक्रम करेल, असे देखील बोललं जात आहे. साधारण डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत कांदा चांगलाच तेजीत असणार आहे. कांद्याला या काळात चांगला बाजार भाव मिळणार असला तरी, पुन्हा कांद्याची लागवड करून कांद्याचे पीक जोमाने आणणे हे देखील शेतकऱ्यां समोरील आव्हान असणार आहे. दिवाळीनंतर कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते.

दिवाळीनंतर कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतो. मात्र यावर्षी अवकाळी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे कांद्याचे खूप मोठे नुकसान झाले. साहजिकच यामुळे मागणीनुसार पुरवठा होणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता नवीन कांदा आणखी तीन चार महिने बाजारात उपलब्ध होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांमध्ये कांदा विक्रम करू शकतो. असा अंदाज व्यापाऱ्यांसह अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे. दोन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप कठीण काळातून जावे लागले आहे. मात्र येणाऱ्या काही महिन्यांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा Sport shoes: Puma Reebok कंपनीच्या या पाच जबरदस्त स्पोर्ट शूजला अमेझॉनवर मिळतोय तब्बल 70 टक्के डिस्काउंट..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स.. 

सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.