Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे…

0

Women Sex Life: सेक्स संदर्भात उघडपणे बोलणं आपल्याकडे अ’श्ली’ल समजलं जातं. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर, या बाबतीत बोलणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्या आयुष्यात शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य (Mental Health) महत्वाचं आहे, तसेच लैंगिक आयुष्य (Women Sex Life) देखीलखूदेखील महत्वाचे आहे. से’क्स’ दररोज केल्याने काय होते, या बाबत आपल्याकडे अनेक समज, गैरसमज आहेत. परंतु त्यासाठी दोघांची ईच्छा देखील असणे गरजेचं आहे. तुम्ही एकमेकांच्या मनाचा विचार करून जर ‘से’क्सचा आनंद घेत असाल तर तुमचे लैंगिक जीवन अधिक सुंदर होत जाईल. एकमेकांच्या भावनांचा विचार करून शारिरीक सुखाचा आनंद घेत असाल तर पती पत्नीच्या नात्यात अजूनच गोडवा आलेला तुम्हाला पाहायला मिळेल.

वाढत्या वयानुसार महिलांच वजन (Belly Fat) झपाट्याने वाढत जातं. हार्मोनल्स बदलांमुळे महिलांच्या शरीरात हे बदल बघायला मिळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परंतु वजन वाढल्यामुळे शरीराच्या ठेवणीत झालेले बदल महिलांना आवडत नाहीत. वजन वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर (Mental Health) देखील परिणाम होत असतो. त्यामुळे वजन वाढू नये, याची विशेष काळजी महिला वर्गाकडून घेतली जाते. याकरिता नियमीतपणे व्यायाम, जिम आणि ऊत्तम डायटसारखे पर्यायसुद्धा महिलांकडून वापरले जातात. आपले वजन वाढू नये, यासाठी शक्य ती सर्व काळजी महिलावर्ग घेत असतो. यामध्ये विशेषत: लग्नाअगोदर तरुण मुलींकडून जास्त काळजी घेतली जाते. लग्नानंतर  वजन वाढु नये, यासाठी वेळ देणे त्यांना बर्‍याचदा शक्य होत नाही. त्यामुळे लग्नानंतर महिलांचे वजन वाढलेले आपण बर्‍याचदा बघतो. हेही वाचा: गरोदर स्त्रियांना आंबट खाण्याची इच्छा का होते? कारण जाणून तुम्हीही व्हाल अचंबित..

लग्नानंतर वजन वाढण्यामागे आणखी काही कारणं सांगितली जातात. त्यापैकी शरीरसंबंद्ध ठेवणे हेसुद्धा एक कारण मानले जाते. लग्नाअगोदर सहसा शरीरसंबंद्ध ठेवण्याचे प्रमाण कमी असते आणि सोबतच वजन वाढु नये, याकडेसुद्धा तरुणींचे लक्ष असते. मात्र लग्नानंतर या परिस्थितीत बदल होतो. आपल्या साथीदराशी बर्‍याचदा शरीरसंबंद्ध ठेवण्यात येतो. त्यानंतर अचानक आपले वजन वाढत असल्याचे महिलांच्या लक्षात येते. परिणामी जास्तीत जास्त शरीरसंबंद्ध ठेवल्यानेच आपले वजन वाढत असल्याचा महिलांचा समज होतो. परंतू खरोखरच लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागे शरीरसंबंद्ध ठेवणे हेच कारण आहे काय? तर तेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. हेही वाचा:Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

शरीर संबंद्ध ठेवणे हा एकप्रकारचा व्यायाम आहे:
वजन वाढण्यावर नियंत्रण मिळवायचे असल्यास डॉक्टर आपल्याला व्यायाम करण्याचा सल्ला देतात. तसेच आहारात देखील बदल करण्याचा सल्ला देतात. अनेक तज्ज्ञांच्या मते ‘से’क्सुअल रिलेशनशीप हा एकप्रकारचा व्यायाम आहे. शरीर संबंध ठेवणे हा काही वाईट प्रकार नाही. त्यामुळे ‘से’क्सुअल रिलेशनशीप विषयी जे काही गैरसमज असेल, त्यांना पडताळुन बघणे गरजेचे आहे. काही पुरातन पुस्तकांमध्येसुद्धा शरीरसंबंधाचा उल्लेख आहे. त्यामुळे त्या सबंधित कुठलीही वाईट भावना डोक्यात ठेवणे चुकीचे ठरु शकते. तज्ज्ञांच्यामते शरीरसंबद्ध ठेवल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात. ज्याप्रमाणे व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि आपल्याला ताजतवानं वाटु लागते.  त्याप्रमाणेच सेक्स झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला थोड ताजतवानं वाटु शकतं. सेक्स करतांना आपली पुर्ण एनर्जी त्याठिकाणी वापरली जाते. त्यामुळे शारीरिक संबंधांना व्यायाम संबोधन्यात आले आहे. याशिवाय काही पुरातन पुस्तकांमध्ये देखील ‘से’क्सची तुलना व्यायामाशी करण्यात आलेली आहे. हेही वाचा: flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल

लग्नानंतर महिलांचं वजन वाढण्यामागचं हे आहे, खरे कारण: मुलगी असो वा मुलगा पौगांडावस्थेत आल्यानंतर त्यांच्यात विविध बदल होताना बघायला मिळतात. हे सर्व बदल घडुन येण्यामागचे कारण सेक्स हार्मोन असतात. मुलांमध्येसुद्धा हे सेक्स हार्मोन काही बदल घडवुन आणतात, त्याचप्रमाणे मुलींमध्येसुद्धा आपल्याला हे बदल बघायला मिळतात. मुलींमध्ये वाढत्या वयानुसार हे बदल होत जातात. लग्नानंतर या बदलांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कदाचित सेक्स हार्मोनच्या बदलांमुळे महिलांच वजन वाढु शकतं. सेक्स हार्मोनच्या बदलांना शारीरिक संबंध कारणीभुत आहेत का? हे मात्र नक्की सांगता येणार नाही. धावपळीच्या आयुष्यात काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळेसुद्धा हे बदल होत असल्याचे बर्‍याचदा काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

वजन वाढण्याचा आणि सेक्सचा संबंध:
लग्नानंतर आपल्या साथीदारासोबत (Women Sex Life) होणार्‍या नियमित सेक्समुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळेच आपले वजन वाढते अशी महिलांची धारणा होऊन जाते. त्यामुळे वजन वाढु नये याची काळजी घेण्याच्या नादात सेक्स करतांनासुद्धा काही महिला आपलं संपूर्ण समर्पण त्यामध्ये देऊ शकत नाही. वजन वाढणे हा त्यांचेसाठी चिंतेचा विषय असतो. त्यामुळे बहुतेकदा असं होऊ शकतं. मात्र त्याअगोदर खरोखरच सेक्स करण्याचा आणि वजन वाढण्याचा थेट संबंध आहे का? हे जाणुन घेणे, याची सत्यता पडताळणे महत्वाचे होऊन जाते. याप्रसंगी काही तज्ज्ञ आपले मत नोंदवताना असे सांगतात की, सेक्स आणि महिलांचे वजन वाढणे याचा कसलाही सबंध नाही. महिलांचे वजन वाढणे यामागे हार्मोनल्स बदल हे कारणीभूत आहे. सेक्स करणे हे कधीच महिलांचे वजन वाढण्यामागचे कारण होऊ शकत नाही.

सेक्स हार्मोनमुळे वजन वाढत, मग सेक्स हार्मोन बदलाची कारणे काय?
शरीरसबंध ठेवल्याने वजन वाढत नाही,  हे जरी खरे असले तरी सेक्स हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा त्यांच्या असंतुलित होण्यामुळे वजन वाढतं, असं अनेकांच मत आहे. त्यामुळे सेक्स हार्मोन्सच्या बदलाची कारणं काय असु शकतात? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. परंतू अगोदर एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, सेक्स आणि सेक्स हार्मोन्सचा खुप सबंध येतो असे नाही. सेक्स केल्यानेच सेक्स हार्मोन्स झपाट्याने बदलतात असे नाही. त्यामुळे जर तुमच्या मनात असा काही गैरसमज असेल तर तो अगोदर तुमच्या मनातून काढून टाकायला हवा.

वाढते वय हे सेक्स हार्मोन बदलाचे मुख्य कारण आहे. मुलगा असो वा मुलगी वाढत्या वयानुसार त्यांच्यात हार्मोनल्स बदल आपल्याला बघायला मिळतात. यासोबतच धावपळीचे आयुष्य, अवेळी जेवण, संपूर्ण बदलेली लाईफस्टाईल, आहारातला असमतोल ही सेक्स हार्मोन्समध्ये झपाट्याने बदल होण्याची कारणे आहेत. ज्यामुळे महिलांचे वजन सुध्दा झपाट्याने वाढते. शरीरसंबंध ठेवण्याचा आणि वजन वाढण्याचा कुठलाही संबंध नाही. यावर अद्याप कुठलेही संशोधनही झालेले नाही. वैज्ञानिकदृष्ट्या शरीरसंबद्ध ठेवल्याने वजन वाढते हा केवळ एक गैरसमज आहे.

हेही वाचा: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम.. 

अगोदर तिचा फेसबुकला मेसेज, नंतर व्हॉट्सॲपला तसला व्हिडिओ कॉल, त्यानंतर खात्यातून १ लाख गायब.. 

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम.. 

Lifestyle: दररोज सेक्सके काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.