Pregnancy Tips: गरोदर स्त्रियांना आंबट खाण्याची इच्छा का होते? कारण जाणून तुम्हीही व्हाल अचंबित..

Pregnancy Tips: प्रत्येक स्त्रीला एक ना एक दिवस आई हे व्हावेच लागते. आई होण्याच्या हा ऐतिहासिक आणि आनंदाच्या क्षणांचं शब्दात वर्णन करता येणे अशक्य आहे. आपण एका गोंडस मुलाला जन्म देणार या कल्पनेत स्त्री नऊ महिने रमून जात असते. या काळात ‘स्त्री’ला आपल्या बाळाच्या काळजी शिवाय काहीही महत्त्वाचं वाटत नाही. गरोदर असणाऱ्या स्त्रीची काळजी देखील या काळात अनेक जण घेत असतात. या काळात तिने कोणत्याही गोष्टीची मागणी केली, तरीदेखील तिचा हट्ट पुरवला जातो. गरोदर असणाऱ्या महिलांना नेहमी आंबट खाण्याची इच्छा होते. हे तुम्ही देखील ऐकले असेल. मात्र या काळात त्यांना आंबटच खायची इच्छा सर्वाधिक का होते? या विषयी तुम्हाला माहिती आहे का?

गरोदर असणाऱ्या ‘स्त्री’च्या शरीरामध्ये मानसिकतेबरोबरच शरीरात देखील विविध बदल होत असतात. (Health) गर्भावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून, या काळामध्ये तीच्या आवडी निवडी देखील जोपासल्या जातात. खासकरून या काळात ‘स्त्री’च्या खाण्यापिण्याविषयी विशेष काळजी घेतली जाते. या काळात स्त्रीला अनेक पदार्थ खावेसे वाटतात, मात्र हा बदल अचानक कसा काय होतो? या विषयी जाणून घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. खासकरून आंबट असणारे पदार्थ का खावेसे वाटतात? जाणून घेऊया सविस्तर.

गर्भधारणा झाल्यानंतर, गरोदर असणाऱ्या स्त्री मधील शरीरात अनेक हार्मोनलमध्ये बदल होत असतात. या काळात गरोदर असणाऱ्या स्त्रीच्या शरीरामधील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळते. साहजिकच यामुळे त्यांच्या वासावर देखील परिणाम झाल्याचं दिसून येतं. सामान्यप्रमाणे त्यांना पदार्थांची चव देखील लागत नसल्याचं जाणवतं. शरीरामधील सोडियम आणि हार्मोनलमध्ये बदल झाल्याने स्त्रीला या काळात आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होते. या काळातील फक्त आंबटच नाही, तर अनेक न खाल्लेले पदार्थांची देखील चव कशी असते, याविषयी देखील तिच्या मनात इच्छा जागृत होत असते.

या विषयासंदर्भात एक संशोधन करण्यात आलेल्या संशोधनामध्ये तब्बल 60 ते 80 टक्के महिला या काळात अनेक पदार्थ खाण्याची इच्छा जाहीर करतात. नेहमी खाणाऱ्या पदार्थांची अचानक त्यांना एलर्जी वाटण्याचे प्रकार या काळात होतात. आयुष्यात न खालेले पदार्थ महिलांना खावेसे वाटतात. हा बदल गर्भधारणा झाल्यानंतर शरिरातील हार्मोनलच्या बदलामुळे होत असल्याचे संशोधनातून समोर आलं आहे. महिलांना या काळात खावेसे वाटणाऱ्या अनेक पदार्थांचा हट्ट पुरवला जातो. मात्र याबाबत काळजी देखील घेणे आवश्यक आहे.

ही काळजी आवश्यक

स्त्रियांना या काळात अनेक आंबट पदार्थ खावेसे वाटत असले, तरी देखील हे पदार्थ खाण्याचे प्रमाण देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. चिंच त्याचबरोबर आवळा लिंबू, कैरी, इत्यादी पदार्थ कमी खाणे आवश्यक आहे. या पदार्थांमधून मोठ्या प्रमाणात विटामिन्स त्याचबरोबर लोह, कॅल्शियम, पोटॅशियम इत्यादी घटक मिळत असले तरीदेखील या पदार्थांचा अतिरेक झाला तर याचा परिणाम आपल्या शरीरावर त्याचबरोबर गर्भधारणेवर देखील होऊ शकतो. साहजिकच यामुळे या पदार्थांचे सेवन हे प्रमाणात करणे आवश्यक आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

या काळात गरोदर स्त्रियांना आंबट असणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात खावेसे वाटत असले, तरी देखील हे पदार्थ खाताना काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. खासकरून मुरलेले लोणचे खाताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कैरीच्या लोणच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मसाला त्याचबरोबर मीठ देखील असते. हा मसाला आरोग्यासाठी योग्य नसतो. काही पदार्थ खाल्ल्याशिवाय चैनच पडत नसेल, तर तुम्ही अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला देखील घेणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

Health Tips: शारीरिक संबंधामध्ये खंड पडल्यास मानसिकतेवर आणि शरीरावरही होतात हे गंभीर परिणाम..

Health Tips: पुरुष आपल्या कमरेला कडदोरा का बांधतात? कारण जाणून तुम्हीही धराल डोकं..

Relationship Tips: मुलांच्या या सहा गोष्टींवर मुली टाकतात जीव ओवाळून; मुलींच्या हृदयात राहायचं असेल तर करा हे काम..

Relationship Tips: मुलं आपल्या वयापेक्षा कमी मुलींकडेच जास्त आकर्षित का होतात? ही 5 कारणे जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20‌; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.