Relationship Tips: मुलं आपल्या वयापेक्षा कमी मुलींकडेच जास्त आकर्षित का होतात? ही 5 कारणे जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Relationship Tips: प्रेम हे कधीही कोणालाही कोणत्याही वयामध्ये होऊ शकतं. याची अनेक उदाहरणे तुम्हाला देखील माहिती असतील. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. माणूस एखाद्याच्या प्रेमात पडला, तर त्याला किळसवाणे वाटणारे जग अचानक सुंदर वाटू लागतं. प्रेम कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतं, प्रेम करण्याला वयाची काहीही अट नाही. हे प्रत्येकाला मान्य असलं तरी, मुलांना किंवा पुरुषांना आपल्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुली, महिलाच जास्त आवडतात, ही गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का? आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आपल्याही आयुष्यात एखादी सुंदर मुलगी किंवा मुलगा असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. आपल्यावरही जीव लावणारं कोणीतरी असावं, आपली काळजी करणारं कोणीतरी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यात गैर देखील काही नाही. मात्र प्रेम करताना नेहमी काही गोष्टी बॅक ऑफ द माइंडमध्ये असतातच. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. एका संस्थेकडून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडप्यांचा सर्वे करण्यात आला. यामध्ये बहुतेक जोडप्यांचा पार्टनर हा त्यांच्या वयापेक्षा कमी वयाचा असल्याचे निदर्शनास आलं आहे.

आपल्याला माहीत असणाऱ्या जोडप्यांबाबत देखील आपण ही गोष्ट नोटीस केल्यानंतर लक्षात येईल. पुरुष नेहमी आपल्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींकडे जास्त आकर्षित होतात. हे तुम्हाला मान्य असलं, तरी याची कारणे मात्र निश्चितच माहीत नसतील. लग्न करताना देखील नेहमी आपल्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींसोबत लग्न केलं जातं. याची कारणे तुम्हाला कदाचित माहीत असतीलही. मात्र आपल्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींकडे मुलं जास्त आकर्षित का होतात? आणि त्यांनाच का पसंत करतात? हे नक्कीच माहीत नसेल. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.

कमी तणाव येतो

पुरुषांना नेहमी आपला पार्टनर हा आपल्यापेक्षा वयाने कमी असावा, असं वाटत असतं. आपल्या पेक्षा वयाने कमी असणाऱ्या महिला आपल्यासोबत असल्यास, तणावमुक्त जीवन जगता येते. अशी माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. पुरुष अशा महिलांसोबत आपले जीवन जगताना स्वतः प्रचंड कॉन्फिडन्स फील करतात. आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या महिलांकडे पुरुष अधिक आकर्षित होण्याची अनेक कारणे असली तरी, तणाव हे देखील एक महत्त्वाचं कारण असल्याचं समोर आलं आहे.

भांडणे होण्याचे प्रमाण कमी

पुरुषांना महिलांसोबत भांडणे करायला कधीही आवडत नाहीत. किरकोळ गोष्टीवरून देखील महिला भांडण करतात, असा पुरुषांचा समज आहे. जर आपल्यापेक्षा वयाने कमी महिलासोबत आपण राहिलो, तर भांडणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं. असं देखील पुरुषांचे मत असल्याचं, एका सर्वेतून समोर आलं आहे. आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या मुलींना डेट केल्यास अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. असं पुरुषांना वाटते.

​जुने दिवसांची आठवण..

प्रत्येक माणसाला अजूनही आपण तरुणच आहोत असं वाटत असतं. साहजिकच यामुळे आपला जोडीदार देखील सुदंर तरुण असावा, असं अनेकांना वाटत असतं. त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींना डेट केल्यास पुरुषांना त्यांचे जुने दिवस आठवतात. असं देखील सर्वेतून समोर आलं आहे. आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या मुली ह्या इमानदारीने आपल्याशी वागतात, अशी माहिती देखील समोर आली आहे.

कमी वयाच्या मुली जास्त रोमँटिक असतात

पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या मुलींना डेट का करावी वाटते? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या मुली ह्या आपल्यापेक्षा जास्त रोमँटिक असतात. असा पुरुषांचा समज असतो, अशी माहिती सर्वेतून समोर आली आहे. वाढत्या वयानुसार, पुरुषांच्या आयुष्यात प्रेमाची होणारी कमतरता भरून काढण्यासाठी पुरुष असा विचार करतात. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुली आपल्यापेक्षा जास्त रोमँटिक असल्याने, पुरुषांमध्ये प्रेमाची आणि आपलेपणाची भावना अधिक जाणवते.

मनमोकळ्या गप्पा मारण्यात संकोच वाटत नाही. 

आपल्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींना डेट करायला किंवा आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या महिलांकडे जास्त आकर्षित होण्याचं मुख्य कारण म्हणजे, अशा महिलांसोबत पुरुषांना मनमोकळेपणाने गप्पा मारता येतात, अशी देखील माहिती समोर आली आहे. समवयस्कर किंवा आपल्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांसोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारू शकत नसल्याचा पुरुषांचा समज आहे. वयाने कमी असणाऱ्या महिलाकडे आपण मनातील कोणतीही गोष्ट त्यांना सांगताना कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नाही.

हे देखील वाचा Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Second hand bike: फक्त 35 हजार किमी पळालेली Hero HF Deluxe मिळतेय 15 आणि 20 हजारांत; जाणून डिटेल्स..

Women child development: या उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभागात मोठी भरती..

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..

Viral Video: रस्त्यावर बिबट्या गाईची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा उडेल थरकाप..

Pomegranate Farming: तेल्याने त्रस्त आहात? करा ही उपाययोजना तेल्याचा होईल कायमचा बंदोबस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.