Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Relationship tips: आपल्याही आयुष्यात एखादी प्रेमळ आणि सुंदर मुलगी असावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्येकाला इच्छेप्रमाणे मुलगी मिळेलच असं नाही. अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यात मुलगा किंवा मुलगी असतेच असते. एकमेकांवर प्रेम करणे आणि रिलेशनशिपमध्ये राहणे यात काही गैर देखील नाही. नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडलेले जोडपं सुरुवातीला एकमेकांवर खूप प्रेम करतात. मात्र हळहळ हेच प्रेम कमी देखील होताना पाहायला मिळते. साहजिकच यामुळे एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होतो. दोघांनाही एकमेकांना हवा हवा असणारा सहवास नकोसा वाटू लागतो.

एकमेकांशिवाय चैन पडत नसणाऱ्या जोडप्यांना कालांतराने एकमेकांचा सहवास नाओसा वाटतो. हे तुमच्या बाबतीत देखील घडले असेल. मात्र असे का होते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? याला अनेक कारणे असली तरी, नात्यात दुरावा येण्यास बहुतेकदा मुलगाच जबाबदार असतो. मुलांच्या आयुष्यात एखादी प्रेमळ आणि सुंदर मुलगी आल्यानंतर मुलगा तिला गमावण्याच्या भीतीमुळे अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे ती जवळ येण्याऐवजी लांबच जाते. नकळत तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडतात जायचं परिणाम तुमच्या नात्यावर होतो. कोणत्या कारणामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, या विषयी सविस्तर जाणून घेऊ.

तुम्ही एकमेकांच्या नवीन प्रेमात पडल्यानंतर सुरवातीचा काळ कायम तसाच राहील असे अजिबात होत नाही. सुरुवातीला एकमेकांसोबत अधिक वेळ घालवायला आवडत असतं. मात्र कालांतराने दोघांनाही किंवा दोघांमधील एकाला स्पेस हवा असं वाटू लागतं. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्वातंत्र्य देणे आवश्यक असतं. आपल्या जोडीदाराचे आपल्यावर प्रेम राहिले नाही. या काळात तुमच्या मनात असे अनेक विचार येऊ शकतात. मात्र याचा अर्थ तुमच्यावर तुमच्या जोडीदाराचे प्रेम नाही, असे अजिबात म्हणता येत नाही. नात्यात दुरावा निर्माण करणारी महत्वाची तीन कारणे कोणकोणती आहेत हे देखील आपण जाऊन घेऊया.

स्पेस न देणं

कधी प्रेमळ आणि सुंदर मुलगी आयुष्यात आल्यानंतर मुलं अधिक possessive होताना पाहायला मिळतात. मात्र यामुळे तुमच्या सुंदर नात्यात अनेक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होत. अनेकांना आपल्या गर्लफ्रेंडने नेहमी आपल्या सोबतच बोललं पाहिजे, असं वाटतं असतं. अनेकदा फोन एसएमएसचा त्यांनी दिला नाही तर मुलांनी समजून घेणं आवश्यक असतं आपल्या व्यतिरिक्त देखील तिच्या आयुष्यात अनेक काही महत्त्वाची लोक आहेत, तिला देखील वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. स्वतःच आयुष्य आहे. तुम्ही तिला स्वातंत्र्य दिले नाही तर ती या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकते.

संशय

कोणतंही नातं विश्वासावर टिकून असतं, एकदा का तुम्ही विश्वास गमावू लागला की नात्यात दुरावा यायला सुरुवात होते. आपला जोडीदार व्यस्त राहू लागला तर आपल्या मनात अनेकदा संशयाला सुरुवात होते. वास्तविक पाहता कपलच्या आयुष्य व्यतिरिक्त व्यक्तिगत आयुष्य देखील असतं. आपल्या आवडीनिवडी जोपासण्याचं स्वातंत्र्य देणे फार आवश्यक असते. रिलेशनशिपच्या सुरुवातीचा काळ आणि काही वर्षानंतरचा काळ सारखाच असेल, असं नाही. हळूहळू काही गोष्टींमधील आवड कमी होत जाते, मात्र याचा सन्मान करणे फार आवश्यक असते.

शा री रि क सं बं धा सा ठी आग्रह करणं

रेशीम शिक्षा सुरुवातीच्या काळात शा रीज्रिक संबंध विषयी दोघांच्याही मनात अधिक आकर्षण असू शकतात. हळूहळू हे कमी होत जातं. पार्टनर यासाठी तयार नसेल तर तुम्ही त्याचा सन्मान करणे आवश्यक आहे शा री रि क संबंध साठी तुम्ही अधिक आग्रह करता कामा नये. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकांचा समज असतो, प्रेम वाढवण्यासाठी शारीरिक संबंध खूप गरजेचे आहे. मात्र असं मुळीच नाही. प्रेम वाढवण्यासाठी पार्टनरला स्वातंत्र्य देणे फार आवश्यक आहे.

हे देखील वाचा WhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..

VIRAL VIDEO: भल्या मोठ्या सापाशी दोन हात करत कुत्र्याने असं वाचवलं मालकाला; व्हिडिओ पाहून होईल पाणी पाणी..

मानसिक आरोग्य: डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने होतात हे परिणाम; वेळीच असे थांबवा अविचार अन्यथा..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

Health Tips: या तीन गोष्टी नियमित केल्यास आयुष्यभर लागणार नाही चष्मा; डोळ्याच्या आरोग्यासाठी या गोष्टी कराच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.