मानसिक आरोग्य: डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने होतात हे परिणाम; वेळीच ‘असे’ थांबवा अविचार अन्यथा..

मानसिक आरोग्य: विचार (thought) हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आहे. विचार असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही, हे प्रत्येकजण मान्य करेल. मात्र हाच विचार जेव्हा अविचार होतो, तेव्हा हस्त्या खेळत्या आयुष्याची क्षणात वाट लागू शकते. डोक्यात सतत येणाऱ्या अविचारामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा (mental health) आजार हा सगळ्यात वाईट आजार असतो, असे अनेक तज्ञ सांगतात. या आजारातून बाहेर पडणं एवढं सोपं नसतं. डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने मानसिकतेवर काय परिणाम होतात? यातून कसे बाहेर पडायचे? आज आपण याच विषयासंदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.

विचार आणि अविचार यातील फरक समजून घेणे आवश्यक

अनेकदा आपण सतत विचार करत असतो, मात्र तरीदेखील आपल्याला नेहमी वाटतं असतं. सगळं काही नॉर्मल आहे. काही गोष्टींची जास्त काळजी करणे, ही नॉर्मल बाब आहे. मात्र नॉर्मल आणि सतत विचार करत राहणे, यातील फरक वेळीच ओळखणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या मानसिकतेचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. किरकोळ कारणावरून सतत होणारी चिडचिड, कामात लक्ष न लागणे, लठ्ठपणा, ध्येयाचा विसर, अशी अनेक लक्षणे तुम्हाला देखील असतील तर समजून, जा तुम्ही या अविचाराचा बळी झाला आहात. आता आपण यातून बाहेर कसे पडायचे? हे जाणून घेऊ.

डोक्यात सतत येत असणारे विचार लिहून काढा:

जर तुमच्या डोक्यात सतत अविचार येत असतील, तर यातून जितकं श्यक्य होईल, तितके बाहेर पडणे आवश्यक आहे. अनेकांना वाटतं, यातून बाहेर पडणे शक्य नाही. यातून पडणे अवघड असले, तरी देखील बाहेर पडणे शक्य आहे. तुमच्या डोक्यात सतत येणाऱ्या विचारांना तुम्ही एखाद्या नोटमध्ये लिहून काढणे आवश्यक आहे. काही तासांनंतर तुम्ही लिहून ठेवलेल्या विचारांना एकदा वाचून काढा. तुम्ही लिहून ठेवलेल्या विचारांना वाचल्या नंतर, तुमच्या लक्षात येईल, आपण हे विचार का करत आहोत, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडेल. आणि तुम्ही सतत करत असणाऱ्या अविचारी विचारातून बाहेर पडाल.

स्वतः बद्दलचे सत्य स्वीकारणे आवश्यक

अनेकदा आपण आपल्या बद्दलचे सत्य स्वीकारत नाही. काळ हा वेळेनुसार, बदलत असतो. तुमचा चांगला टाइम कायम तसाच राहील, असं अजिबात होत नाही. तसेच तुमचा सुरू असलेला वाईट काळ देखील तसाच राहील असेही काही नाही. तुम्ही वस्तुस्थिती ओळखून कृती करत राहणे, फार आवश्यक असते. आपला वर्तमान वाईट असेल, तर अनेकदा आपण आपल्या भूतकाळात जातो. आणि विनाकारण विचार करत बसतो. वास्तविक पाहता भूतकाळाचा विचार करून वर्तमान कधीही व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वर्तमानाची सत्यपरिस्थिती ओळखूनच तुमचं आयुष्य जगावं लागणार आहे.

भावनांना बाहेर येऊद्या:

महिलांच्या तुलनेत पुरुष आपल्या भावना मोकळ्या करत नसल्याचे पाहायला मिळते. मनावर असणारे दडपण हे सर्वात मोठं दडपण असते. आणि म्हणून मनावरचं ओझ कमी करणे आवश्यक असते. कोणत्याही विषयाचे तुमच्यावर तडपण असेल, तरीदेखील तुम्ही तो विषय इतरांशी शेअर करणं आवश्यक असतं. मनामध्ये असणाऱ्या भावना कधीही मनामध्ये दाबून ठेवू नये, असं अनेक psychologist म्हटल्याचे तुम्ही देखील ऐकलं असेल.

भूतकाळ विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित करा

डोक्यात सतत अविचार येण्यास इतर कारणांबरोबच आपला भूतकाळ जबाबदार असतो. भूतकाळातल्या अनेक चांगल्या आठवणी आपल्याला नेहमी आपल्या वाईट काळात आठवतात. आणि त्या आठवणी विसरता देखील येत नाहीत. हे जरी खरं असलं तरी, आपल्याला आपला भूतकाळ विसरून आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. तरच आपण सतत डोक्यात येणाऱ्या अविचारी विचारातून बाहेर पडू शकतो.

झोप व्यवस्थित घेणे आवश्यक

मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे, फार आवश्यक असते. पुरेशी झोप झाल्यानंतर, अनेक समस्यांपासून आपण दूर राहतो. पुरेशी झोप हे निरोगी आरोग्याची पहिली पायरी आहे. कामात गुंतवून घेणे आवश्यक: सतत अविचार मनामध्ये येत असतील, तर आपण कोणत्याही चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे. खासकरून पुस्तके वाचण्यात वेळ घालवल्यास तुम्ही डोक्यात सतत येणाऱ्या अविचारी विचारांचा अधिकतेने सामना करू शकता.

हे देखील वाचा Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Health Tips: हे पाच पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट, आतडी, डोळे, मेंदू, हृदयाच्या समस्या होतात दूर..

Health Tips: पुरुष आपल्या कमरेला कडदोरा का बांधतात? कारण जाणून तुम्हीही धराल डोकं..

Monsoon Update: पंजाबराव डख यांच्या 11 ऑगस्ट पर्यंतच्या हवामान अंदाजाने शेतकरी चिंतेत; राज्यात या भागात होणार अतिवृष्टी..

Health Care: जेवणानंतर करा हे काम अन्यथा द्याल या मोठ्या आजाराला निमंत्रण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.