Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government Scheme: शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनेक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवताना पाहायला मिळते. रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे आता शेतकऱ्याच्या जमीन देखील कुमकुवत होत चालल्या असून, जमीनीची सुपीकता देखील नष्ट होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रासायनिक खतांच्या किंमती तब्बल दुप्पट झाल्या असल्या तरी रासायनिक खतांचा उपयोग शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने, आता या संदर्भात केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे.

दिवसेंदिवस शेतकरी रासायनिक खतांचा अधिक वापर करत असल्याने, शेतकऱ्याचे उत्पन्न घटत चालले आहे. फक्त उत्पन्नच नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मातीची सुपीकता देखील संपुष्टात येत आहे. ही खूप मोठी चिंतेची बाब असल्याचे, लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने या संदर्भात पाऊले टाकली आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने काही उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी, यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेची (Paramparagat Krushi Vikas Yojana) सुरुवात देखील केंद्र सरकारने केली आहे. या योजनेतून शेतकऱ्याला तब्बल पन्नास हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकार देत आहे.

केंद्र सरकारच्या परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत तीन वर्षात पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानातून शेतकरी रसायनिक खताचा अवलंब न करता, सेंद्रिय खते, त्याचबरोबर सेंद्रिय कीटकनाशके, सेंद्रिय बियाणांची खरेदी करू शकणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना हे अनुदान सेंद्रिय खते बीबीयाने आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठीच देत आहे. या अनुदानातून शेतकऱ्यांना सेंद्रिय खत खरेदी केल्याचा पुरावा देखील सरकारला द्यावा लागणार आहे. आता आपण या योजनेअंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ घेता येऊ शकतो? त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

असं आहे या योजनेचे स्वरूप

सरकारने ही योजना 2016 मध्ये सुरू केली. केंद्र सरकारकडून हे अनुदान शेतकऱ्यांना तीन वर्षांमध्ये दिले जाते. या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येणाऱ्या या रकमेचे विभाजन तीन वर्षात करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या वर्षात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर ३१ हजार ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ८८०० रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकर्‍यांना कापणीकरिता, पॅकेजिंग तसेच मार्केटिंग करण्यासाठी दिले जाते. सोबतच तिसऱ्या वर्षी या योजनेत राज्य सरकारचा देखील ३ हजार प्रती हेक्टरी समभाग आहे.

पात्रता आणि कागदपत्रे 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकरी हा या देशाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्या व्यतिरिक्त या योजनेचा लाभ कोणालाही घेता येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. अर्जदाराचे वय हे अठरा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच शेतकरी हा पीएम किसान सन्मान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या वयाचा पुरावा, त्याचबरोबर मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, तसेच आधार कार्ड आणि रहिवासी दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pgsindia-ncof.gov.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही हे सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्ही ‘ऑप्शन’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ‘ऑप्शन’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन वेब पेज ओपन झालेलं दिसेल. नवीन पेज ओपन झाल्यानंतर, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती टाकून फॉर्म भरायचा आहे. तुम्ही भरलेल्या अर्जासोबत कागदपत्रांची स्कॅन कॉफी करायची आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही ‘सबमिट’ या बटणावर क्लिक करायचं आहे.

हे देखील वाचाHealth Tips:  हे पाच पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट, आतडी, डोळे, मेंदू, हृदयाच्या समस्या होतात दूर..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Jio prepaid plan: Jio चा हा रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.