Health Tips: ‘हे’ पाच पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट, आतडी, डोळे, मेंदू, हृदयाच्या समस्या होतात दूर..

Health Tips: धावपळीमुळे अलीकडे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवताना पाहायला मिळतात. खास करून अनेकांना पोटाच्या समस्यांनी ग्रासलं असल्याचं देखील दिसून येतं. निरोगी आयुष्य हे प्रत्येकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तरी देखील अनेक जण याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात. आरोग्याचा बाबतीत खूप नियम पळणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र तरीदेखील अनेकांना निरोगी राहता येत नाही. निरोगी आरोग्य हे आपल्या निरोगी आहारावर अवलंबून असते. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी काय खावे? या संदर्भात माहिती देणार आहोत. पोटासंदर्भात असणारे विकार, आतड्यांच्या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला ज्या पाच पदार्थांची आवश्यकता आहे. आज आपण त्याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.

निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर निरोगी आहार करणं खूप आवश्यक आहे. हे प्रत्येकाला माहीत असतं, मात्र तरी देखील अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. किंवा अनेकांना सकाळच्या नाष्ट्यामध्ये, दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळीच्या जेवणात काय असावं? याविषयीची पुरेशी माहिती नसते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी काय खाल्लं पाहिजे, याला खूप महत्त्व आहे. याच्यावरच आपले निरोगी आरोग्य अवलंबून असतं. आणि म्हणून सकाळच्या नाश्त्यामध्ये नियमितपणे काय खावं याविषयी आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत.

गरम पाणी आणि मध

पोट आणि आतडी साफ होण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या नियमितपणे तुम्ही कोमट पाणी आणि पाण्यामध्ये एक चमचा मध (Honey) मिसळून पिणे आवश्यक आहे. मधामध्ये मिनरल्स, विटामिन्स, आणि एंजाइम्स असते. हे घटक तुमचे पोट आणि आतडे साफ करण्याचे काम करतात. दिवसभर तसेच रात्री आपण जे पदार्थ खाल्ले आहेत, त्या पदार्थांमधील किंवा पोटात साचणारी काही विषारी द्रव्य बाहेर पडतात. आणि म्हणून प्रत्येकाने नियमितपणे गरम पाणी आणि त्यामध्ये एक चमचा मध टाकून पिणे आवश्यक आहे.

दलिया (Oatmeal)

निरोगी आरोग्यासाठी कोमट पाण्यात मध मिसळून नियमितपणे पिणे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, याविषयी देखील आपण गंभीर असणे आवश्यक आहे. अनेकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड, पाव यासारख्या वस्तू आवडतात. मात्र यामुळे तुमच्या पोटाचे विकार उद्भवण्यास मदत होऊ शकते. पोटाच्या विकारापासून मुक्तता हवी असेल, तर तुम्ही ओट्स (oats) तसेच दलियाचा (Oatmeal) नाश्ता करणे आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये खूप कमी कॅलरी आणि जास्त फायबर असते. साहजिकच यामुळे तुमचे पोट भरलेले वाटते. आणि तुम्हाला भूक लागत नाही.

कलिंगड

फळे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. याविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र इतर फळांच्या तुलनेत कलिंगड खूप प्रभावी आहे. 90% पाण्याने बनलेले हे आहे. कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असल्याने, आपल्या शरीराला पाण्याची असणारी कमतरता भरून काढण्याचे काम कलिंगड करते. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत, कलिंगडामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छाशक्ती नाहीशी होते. कलिंगड हे आपल्या शरीरामध्ये असणारी कॅलरी खूप मोठ्या प्रमाणात कमी करते. एवढेच नाही, तर कलिंगडामुळे रक्तभिसरण संस्था देखील व्यवस्थित काम करते. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यात देखील कलिंगड खूप मदत करते.

पपई

पपई देखील अनेक आजारांवर काम करते. पपई खाल्याने आपल्या शहरात असणाऱ्या पेशींची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. आणि रोगप्रतिकार शक्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढते. विशेष म्हणजे, मूळव्याध असणाऱ्यासाठी पपई रामबाण उपाय आहे. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने, आपले पोट साफ होण्यास मदत होते. पपईचे नियमित सेवन केल्याने, आपले आतडे स्वच्छ आणि मजबूत होतात. याशिवाय पपईमुळे शरीरात असणारे, खराब कोलेस्टेरॉल कमी होते.

भिजवलेले बदाम (Almonds)

सकाळी उठल्यानंतर, भिजवलेले बदाम (Almonds) खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. बदामामध्ये अनेक जीवनसत्व आढळतात. विटामिन ई, प्रथिने, मॅंगनीज, हे सर्व बदमामध्ये आढळते. सकाळी उठल्यानंतर, भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूला चालना मिळते. बदाम खाताना एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, बदामच्यावर असणारी साल आपण काढून टाकने आवश्यक आहे. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते. टॅलीन आपल्या शरीरामध्ये असणारी पोषक तत्वांचे शोषण रोखण्याचे काम करते.

हे देखील वाचा Jio prepaid plan: Jio चा haप्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Health Tips: पुरुष आपल्या कमरेला कडदोरा का बांधतात? कारण जाणून तुम्हीही धराल डोकं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.