Health Tips: पुरुष आपल्या कमरेला ‘कडदोरा’ का बांधतात? कारण जाणून तुम्हीही धराल डोकं..

Health Tips: आपल्या धर्मामध्ये अनेक गैरसमज आहेत. काही गोष्टी का कराव्यात, आणि का करू नयेत, याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, पुरुषांच्या कमरेला असणारा करदोडा. असंख्य पुरूषांच्या कमरेला कडदोरा पाहायला मिळतो. मात्र त्यापैकी अनेकांना आपण कमरेला कडदोरा का परिधान करतो, याविषयी माहिती देखील नाही. किंवा कमरेला कडदोरा का घालतात? याविषयीची अनेक वेगवेगळी कारणे माहिती असतील, मात्र आज आपण कमरेला कडदोरा नक्की का घातलात, याविषयी धार्मिक आणि शास्त्रीय कारणे जाणून घेणार आहोत.

कमरेला कडदोरा काय म्हणतात? याविषयी आपण सर्वप्रथम धार्मिक कारण जाणून घेऊ. 

दिवाळीमध्ये भाऊबीजे दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळताना आभूषण म्हणून, हातात कडदोरा देते. हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. बहीन भावाला ओवाळताना आभूषण म्हणून, कडदोरा देते. यासंदर्भात धार्मिक कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर असं लक्षात येतं, आपल्या भावाच्या पाठीमागे कोणत्याही वाईट प्रवृत्ती लागू नयेत. इडापिडा जाऊन बळीचं राज्य यावं. अशी कामना बहीण भावाला ओवाळताना करते. काळ्या धाग्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते. त्याशिवाय धनलाभ देखील होतो, असा समज आहे.

मात्र लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांना याविषयी काहीही देणंघेणं नसतं. त्यांना जर हे सांगितले, तर ते आपल्या कंबरेला कधीच कडदोरा बांधणार नाहीत. आणि म्हणून, त्यांना घाबरवण्यासाठी घरातील ज्येष्ठ मंडळींनी एक युक्ती वापरली. जर तुम्ही कमरेला कडदोरा बांधला नाही, आणि तेवढ्यात गाढव ओरडलं, तर तु मुलगी होशील. घरातील ज्येष्ठ मंडळी असं म्हटल्याचा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. मात्र आपण मोठे झाल्यानंतर, आपल्या लक्षात आले यात काहीही तथ्य नाही. अनेकांना धार्मिक कारण पटत असले, तरी वस्तुस्थिति खूप वेगळी आहे. पुरुष कमरेला करदोडा का बांधतात, याला एक शास्त्रीय कारण आहे. आता आपण तेही जाणून घेऊ.

कमरेला करदोडा बांधण्याची ही आहेत शास्त्रीय करणे. 

माणसाच्या शरीराचा सर्वात रुंद भाग कोणता असेल, तर तो कंबर. कमरेला आपण कधीही कडदोरा एकेरी बांधत नाही. तुम्ही लक्षात घेतले, तर तुमच्या लक्षात येईल, आपण नेहमी दुहेरी परिधान करतो. साहजिकच यामुळे हा कडदोरा आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर आपण सहज बांधू शकतो. किंवा तो बांधण्यासाठी पुरेसा ठरतो. यातच आपल्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे. पूर्वी दवाखाने नव्हते. याशिवाय इमर्जन्सी कारणाकरिता दवाखान्यात जाण्यासाठी वाहनांचा देखील पर्याय उपलब्ध नव्हता. साहजिक यामुळे पूर्वी ‘वैद्य’ लोकांवर उपचार करायचे. वैद्य सांगेल त्या प्रमाणे, पूर्वी लोक देखील घरगुती उपचार करायचे. उपचारामध्ये अनेक उपयोगी वस्तू वापल्या जात होत्या. यामध्ये कमरेला असणारा कडदोरा हा देखील महत्वाचा भाग होता. हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र कमरेला असणाऱ्या कडदोऱ्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोग होत होता. कसा ते देखील आपण समजून घेऊ.

पूर्वी लोकांना कामानिमित्त संध्याकाळी उशिरापर्यंत रानावनात काम करावं लागतं असे. त्यावेळी उजेडाचे कोणतेही साधन नव्हते. यामुळे अशा वेळी सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार म्हणून, लगेच आपल्या कमरेला असणारा कडदोरा काढून, ज्या ठिकाणी सर्पदंश झाला आहे, त्या भागाच्यावर बांधण्यासाठी उपयोगी पडत असे. यामुळे सापाचे विष रक्तात भिनण्यापासून स्वतःचे संरक्षण व्हायचे. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर, हेच कमरेला कडदोरा बांधण्याचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्र लोकशाही देखील हाच दावा करते. याशिवाय कमरेला कडदोरा बांधण्याला आणखीही काही शास्त्रीय कारणे आहेत, आपण ते देखील पाहू.

पोटाच्या आजारांपासून मिळतो आराम 

कमरेला बांधलेल्या दोऱ्यामुळे किंवा कडदोऱ्यामुळे कमरेचे घर्षण होते. घर्षण हे ऍक्युप्रेशर accupressure सारखे काम करते. साहजिकच यामुळे कंबर आणि त्याखालील अवयवांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते. खासकरून आरोग्याच्या तक्रारी ह्या नेहमी आपल्या पोटपासून सुरू होतात. कमरेला दोरा बांधल्याने कमरेचे आणि दोऱ्याचे घर्षण होते. यामुळे ॲक्युप्रेशर निर्माण होण्याचे काम होते. याचा परिणाम म्हणून, पोटाच्या आणि कमरे खालच्या अवयवाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हे देखील वाचा Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

scientific reason: या वेळेस नखे, केस कापल्यास होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या या पाठीमागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण..

Electricity bill: आता घरातील वीजबिल येणार निम्म्यावर, फक्त वापर ही स्ट्रिक..

Relationship tips: या तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

OTT Platform: Amazon prime, Netflix, Disney+hotstar आता पाहता येणार मोफत; वापरा फक्त ही स्ट्रिक..

Women and Child Development: महिला व बाल विकास विभागात मेगा भरती! बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Work From home side effect: वर्क फ्रॉम होम मुळे मानसिक आरोग्यावर होतायत हे तीन गंभीर परिणाम..

Swastika Sign: मुख्य प्रवेशद्वार, लग्न, महत्त्वाच्या समारंभात स्वस्तिक का काढले जाते? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.