Work From home side effect: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मानसिक आरोग्यावर होतायत हे तीन गंभीर परिणाम..

0

Work From home side effect: उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक जण वेगवेगळी कामे करत असतात. कामावर मानसिक आरोग्य देखील अवलंबून असतं. आपण कोणते काम करतो, त्यावर आपले आरोग्य अवलंबून असते. आपण ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी जर अनेक चांगली लोकं मित्र-मैत्रिणी असतील, तर, आपल्या कामाचा असणारा तणाव आपल्याला जाणवणार नाही. या उलट जर आपण काम करत असणाऱ्या ठिकाणी आपल्याशी गप्पा मारणारी लोक नसतील, तर याचा खूप वाईट परीणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. कोरोनामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम करावं लागलं. मात्र याचा खूप वाईट परिणाम अनेकांच्या मानसिक आरोग्यावर झाला.

कोरोनामुळे अनेकांचे जीवनमान विस्कळीत झाले. अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. सोशल distancing मुळे सर्वच क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘work Frome home’ दिले. हा काळ अनेकांसाठी खूप आव्हानात्मक होता. अजूनही अनेकजण यातून बाहेर आले नाहीत. आरोग्य, वयक्तिक आयुष्य, अनेकांचे व्यवसायिक आयुष्य देखील कोलमडले. आपले कर्मचारी सुरक्षित राहावे, आणि कंपनीचे काम सुरळीत चालावे, यासाठी अनेकांना वर्क फ्रॉम होम दिले. अनेकांना वाटत असेल, वर्क फ्रॉम होममुळे खूप फायदे झाले. मात्र हे जाणून तुम्हाला वाटेल, वर्क फ्रॉम होममुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठे गंभीर परिणाम झाले आहेत. वर्क फ्रॉम होममुळे, मानसिक आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात, हे जाणून घेऊया.

‘वर्क फ्रॉम होम’मुळे कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळाली. आपल्या आवडत्या ठिकाणी कुटुंबासोबत फिरण्याची संधी देखील मिळाली. एकीकडे हे जरी खरं असलं तरी, दुसरीकडे वर्क फ्रॉम होममुळे मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम देखील झाले. वर्क फ्रॉम होममुळे माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? मानसिक आरोग्यावर होणारे तीन गंभीर परिणाम आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र एका सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करण्यात आला, यामध्ये त्यांचे ऑफीस मधील आयुष्य आणि वर्क फ्रॉम होमचे आयुष्य याच्या अभ्यासातून काही धक्कादायक माहिती समोर आली. जाणून घेऊया सविस्तर.

थकवा

जर्नल ऑफ अप्लाइड सायकोलॉजीने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, कोरोनामध्ये ऑनलाईन कामामध्ये लक्षणीय वाढ झाली. या काळात ऑनलाईन बरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्स करण्याचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढला. या सगळ्या गोष्टींमुळे याचा थेट परिणाम घरून काम करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर झाला. ऑफिसच्या तुलनेत वर्क फ्रॉम होममुळे लोकांचे जीवन अधिक तणावग्रस्त झाले. तणावामुळे लोकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम झाला. या काळात लोकांना अधिक थकवा देखील जाणवू लागला.

वर्क फ्रॉम होममुळे नेहमी ऑनलाईन राहण्याच्या सवयींमुळे, त्याचबरोबर वारंवार व्हिडिओ कॉन्फरन्स, ऑडिओ कॉन्फरन्समुळे याचा थेट संबंध अनेकांच्या आरोग्यावर झाला. या काळात अनेकांच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले. याउलट ऑफिसमध्ये काम करण्याचा काळ आणि अनुभव खूप वेगळा असतो. याविषयी आपल्या माहिती आहे. ऑफिसमध्ये असंख्य जण असतात. अनेकांमुळे एकमेकांना काम करण्याची प्रेरणा मिळत राहते. घरून काम करत असताना अधिक थकवा जाणवतो. यामुळे एका जागेवरून हालचाल देखील करू वाटत नाही. अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवन एकसारखं झालं.

ऑफिसला न जाता, घरून काम करत असल्याने व्यवसायिक जीवन आणि वैयक्तिक आयुष्य यात काहीच फरक राहिला नाही. ऑफिसमध्ये असताना ऑफिसची कामं उरकून आपल्या मित्रांना, घरच्यांना भेटणयची ओढ असायची, ती वर्क फ्रॉम होममुळे संपुष्टात आली. कोरीनाच्या भीतीमुळे घरात कुठेही बाहेर जाता येत नव्हते. शिवाय परवानगी देखील नव्हती. घरातील अनेक सदस्य कुठेही जात नसल्याने, घरात एखाद्या छोट्याश्या खोलीत बसून काम करावं लागत असल्याने वयक्तिक आणि व्यावसायिक काम यात काहीच फरक राहिला नाही. ऑफिसच्या ऑनलाईन कामातून थोडफार मोकळा वेळ मिळाला, तर घरचे काम करायला लागत असल्याने, तणावातून बाहेर यायला वेळच मिळत नाही.

जास्त खाणे

या काळात अनेक सदस्य घरामध्ये असल्याने, जेवणात नेहमी चांगले आणि गरम गरम पदार्थ खायला मिळतात. घरी असल्यामुळे आपल्याला जे पदार्थ आवडतात, ते पदार्थ लगेच उपलब्ध होतात. सतत काही ना काही काही खात राहिल्याने, याचा आरोग्यावर देखील गंभीर परिणाम झाला. जास्त खाणे आणि कमी हालचाल यामुळे लठ्ठपणा याचा देखील सामना करावा लागला. अपचन, आणि पोटाच्या आजारांना देखील या काळात सामोरे जावे लागले. जर तुम्ही देखील work Frome home करत असाल, तर तुम्ही तुमच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

Best partner Zodiac Sign: या तीन राशींच्या मुलांकडे मुली होतात आकर्षित; पती बनवण्यासाठी देखील असतात उत्सुक..

Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..

Fig Benefits For Men: विवाहित पुरुषांची ताकद वाढवण्याचे काम करतो हा पदार्थ; नियमित सेवन केल्यास, होतील हे जबरदस्त फायदे..

Skin Care Tips: नियमित कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवल्यास होतात हे आश्चर्यकारक फायदे..

Kitchen tips: हिरवे झालेले बटाटे खात असाल, तर सावधान! होतायत हे गंभीर आजार..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

infosys recruitment 2022: Infosys ने काढली ५५ हजारांची महाभरती! अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.