Kitchen tips: हिरवे झालेले बटाटे खात असाल, तर सावधान! होतायत हे गंभीर आजार..

Kitchen tips: तंदुरुस्त आरोग्य ही माणसाला लाभलेली खूप मोठी संपत्ती आहे. आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच निरोगी आहार करणे देखील खूप आवश्यक असतं. आपण काय खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून असतं. अनेकदा आपण बाजारातून पालेभाज्या खरेदी करताना पालेभाज्या हिरव्यागार दिसल्या, तर लगेच खरेदी करतो. मात्र बाजारातून पालेभाज्या तसेच इतर काही खाण्याच्या वस्तू खरेदी करताना त्या योग्य आहेत की नाहीत? हे देखील जाणून घेणं आवश्यक असतं. पालेभाज्या हिरव्या असतील, तर त्या उत्तम असतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र असं अजिबात नसतं. आज आम्ही तुम्हाला बटाट्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.

ग्रामीण असो किंवा शहरी भाग, बटाटा मोठ्या आवडीने खाल्ला जातो. उपवासाला देखील बटाटा चालत असल्याने बटाट्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रामध्ये तर वडापाव खूप मोठ्या आवडीने खाल्ला जातो, वडापाव बनवण्यासाठी बटाटा हा मुख्य पदार्थ आहे. साहजिकच अशा अनेक घटकांमुळे बटाट्याला मोठी मागणी आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असून देखील आपण पाहतो, अनेकदा बटाट्याला हिरवा रंग आलेला असतो. त्याचबरोबर कोंब देखील फुटलेले असतात. मात्र तरी देखील अनेक जण हिरवा रंग चढलेला आणि कोंब आलेला बटाटा खरेदी करतात. हिरवा बटाटा आणि कोंब आलेला बटाटा खरेदी करणे योग्य आहे का? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

यामुळे बटाट्याला येतो हिरवा रंग

अन्न योग्य पद्धतीने शिजवणे हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आपण शिजवत असलेले पदार्थ किंवा अन्न शिजवण्यायोग्य आहे का? खाण्या योग्य आहे का? हे जाणून घेणेदेखील खूप आवश्यक आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, बटाटा नेमका हिरवा कशामुळे होतो? तर या विषयी आपण वैज्ञानिक शास्त्रीय कारणे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बटाटा हिरवा कशामुळे होतो, हे जाणून घेऊ. बटाटा ज्या वेळेस डायरेक्ट सूर्यप्रकाशाच्या झोकात येतो, त्यावेळेस बटाटे हिरवे होतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, सूर्यप्रकाशात बटाटा आल्यामुळे हिरवा कसा काय पडतो? तर त्याला एक विज्ञानिक कारण आहे.

सूर्यप्रकाश पडल्यामुळे क्लोरोफिल तयार होते. आणि क्लोरोफिलपासून बटाटा हिरवा होतो. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, सूर्यप्रकाशाची किरणे पिकांवर पडली तर पिक बहारदार येतं. वाढण्यासाठी गती घेतं. आपण पाहतो, अनेक बाजारांमध्ये नेहमी तेच-तेच बटाटे व्यापारी फिरवतात. साहजिकच यामुळे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या बटाट्यांवर सूर्य प्रकाशाचा थेट संबंध वारंवार येतो. सातत्याने बटाट्यांवर सूर्य प्रकाशाचा संबंध आल्याने बटाटे हिरवे पडतात, आणि कोंब देखील येतात. आता आपण हिरवे झालेले बटाटे खाल्ल्यास काय होते? हे देखील जाणून घेऊ.

हिरवे बटाटे खावेत का?

बटाट्याला हिरवा रंग आणि कोंब कसे येतात? हे आपण सविस्तर जाणून घेतले. यामागे काय वैज्ञानिक कारण आहे, हे देखील पाहिलं. आता आपण हिरवे झालेले बटाटे वापरावे की नाही, हे देखील जाणून घेऊ. अन्नपदार्थ खाण्यायोग्य आहेत की नाही, हे तपासणाऱ्या अनेक संस्था आहेत. National capital poison centre ही संस्था देखील हे काम करते. या संस्थेच्या मते, हिरवा रंग चढलेले बटाटे, हे खाण्यायोग्य नाहीत. हे बटाटे खाल्ल्यामुळे मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

एखाद दुसऱ्या वेळेस हे बटाटे खाल्ल्यानंतर फारसा फरक पडणार नाही, मात्र वारंवार हिरवा रंग चढलेल्या बटाटे खाल्ल्यास, शरीरात विष देखील तयार होऊ शकतं. हिरवा रंग चाललेले बटाटे खाल्ल्यास तुम्हाला मळमळ त्याचबरोबर पचन व्यवस्थेवर देखील आघात करू शकतो. याशिवाय डोकेदुखी, न्यू रो लॉ जि क ल यासाख्या समस्या उद्भवू शकतात. हिरवा रंग चढलेल्या बटाट्यामध्ये सो ला ना ई न संयुग मोठ्या प्रमाणात तयार होते. साहजिकच यामुळे बटाट्याची चव देखील काही वेळा कडू लागते. आणि याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. आता आपण बटाटे हिरवे होण्यापासून कसे वाचवले जाऊ शकतात? याविषयी जाणून घेऊ.

बटाटे हिरवे होण्यापासून असे वाचवा. 

बटाट्याला हिरवा रंग कशामुळे चढतो, बटाट्याला हिरवा रंग चढल्यास बटाटे खावे की नको, हिरवा रंग चढलेले बटाटे खाल्ल्यास काय समस्या उद्भवतात? हे देखील आपण जाणून घेतलं. मात्र बटाट्याला हिरवा रंग चढण्यापासून आपण वाचवू देखील शकतो. सूर्यप्रकाशाचा थेट बटाट्याची संबंध आल्यावर बटाट्याला हिरवा रंग चढतो, साहजिकच त्यामुळे आपण प्रकाशापासून बटाट्याला लांब ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच बटाटे हे नेहमी अंधारात ठेवणे आवश्यक आहे.

हे देखील वाचाFlipkart Big Saving Days Sale: आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल! स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्के डिस्काउंट..

Fig Benefits For Men: विवाहित पुरुषांची ताकद वाढवण्याचे काम करतो हा पदार्थ; नियमित सेवन केल्यास, होतील हे जबरदस्त फायदे..

Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..

Best partner Zodiac Sign: या तीन राशींच्या मुलांकडे मुली होतात आकर्षित; पती बनवण्यासाठी देखील असतात उत्सुक..

Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

infosys recruitment 2022: Infosys ने काढली ५५ हजारांची महाभरती! अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.