Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..

Vastu Shastra: आपल्या कर्मावर विश्वास ठेवून आयुष्य जगणाऱ्यांची मोठी संख्या असली तरी, वास्तुशास्त्रानुसार आयुष्य जगणाऱ्यांची संख्या देखील समाजात पाहायला मिळते. कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करायचा झाल्यास, आपण अनेकदा वास्तुशास्त्राचा सहारा घेतो. याविषयी अधिक संगण्याची गरज नाही. नवीन घर बांधताना प्रत्येकजण आपल्या घराचे तोंड कोणत्या दिशेला असायला हवं, हे देखील वास्तुशास्त्राचा आधार घेऊनच ठरवतात. एवढंच नाही तर आपण वास्तुशास्त्राचा आधार घेऊनच घराची वास्तुशांती करतो. याप्रमाणेच घरात कोणत्या वस्तू हव्यात आणि त्या कोणत्या दिशेला असायला हव्या, याविषयी देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे.

घरात कोणकोणत्या वस्तू कोण-कोणत्या दिशेला असाव्यात, याविषयी वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मात्र अनेकांना याविषयी माहिती नसते. घरात नको त्या वस्तू, नको त्या ठिकाणी ठेवल्यामुळे घरात अशांतता निर्माण होऊ शकते. याविषयी देखील वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीवरचे भले मोठे घड्याळ लावलं जातं. पूर्वी लग्न समारंभात किंवा इतर समारंभात पाहुणे मंडळींकडून हमखास भिंतीवरचे घड्याळ आहेर म्हणून भेट दिलं जायचं. अलीकडे ही संख्या कमी झाली आहे, मात्र काही प्रमाणात अजूनही भिंतीवरचा घड्याळ आहेर म्हणून दिलं जातं.

अलीकडच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल फोन असल्यामुळे, घरामध्ये घड्याळ लावणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असं आपण म्हणू शकतो. मात्र अजूनही अनेकांच्या घरांमध्ये भिंतीवरचे घड्याळ पाहायला मिळते. जर तुमच्या देखील घरात भिंतीवरच घड्याळ असेल, तर हे घड्याळ कोणत्या दिशेला असावं, याला देखील फार महत्त्व आहे. आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर वास्तुशास्त्रामध्ये घरात भिंतीवरचे घड्याळ असणं आवश्यक असल्याचं म्हटलं गेलं आहे. जाणून घेऊया यासंदर्भात सविस्तर.

अनेकदा आपल्या घरामध्ये घड्याळाची आवश्यकता असते, तेव्हा आपण घड्याळ घेऊन येतो. आणि हे घड्याळ अशा ठिकाणी लावतो, ज्या ठिकाणी भिंतीवर जागा शिल्लक आहे. घड्याळ लावण्याची ही पद्धत आणि दिशा चुकीची असून, याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. घरातील घड्याळ योग्य दिशेला नसेल, तर तुमच्या घरात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्वप्रथम आपण अशा कोणत्या दिशा आहेत? ज्या दिशेस घड्याळ लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगण्यात आला आहे. त्यानंतर आपण घड्याळ लावण्याचा योग्य पद्धती देखील जाणून घेऊ.

दक्षिण तसेच या दिशेस घड्याळ कधीही लावू नये

दक्षिण दिशेस घड्याळ कधीही लावू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्याचं म्हटलं जातं. या दिशेला जर घड्याळ लावलं, तर घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये नकारात्मकता निर्माण होते. आणि याचा थेट परिणाम आरोग्यावर देखील होतो. असे देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर घड्याळ हे घरातील कधीही मुख्य दरवाजासमोर, तसेच दरवाजाच्यावर लावू नये. कारण घरातून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, तेव्हा आपलं लक्ष घड्याळाच्या काट्याकडे जातं. आणि त्याचा आपल्या ऊर्जेवर परिणाम होतो. याशिवाय घड्याळ कधीही झोपताना आपल्या उशाखाली घेऊन झोपू नये. किंवा झोपताना घड्याळ जवळ ठेवून झोपू नये.

या दिशेस लावा घड्याळ

घड्याळ कोणत्या दिशेला लावू नये, याविषयी आपण सविस्तर जाऊन घेतलं. आता आपण घड्याळ कोणत्या दिशेस लावलं पाहिजे, हे जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार घरात घड्याळ भिंतीवर लावताना उत्तर, पूर्व तसेच पश्चिम दिशा ठरवावी. या दिशा घड्याळ लावण्यासाठी खूप उत्तम मानल्या जातात. जर तुम्ही या दिशांवर घड्याळ लावले, तर घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याबरोबरच जर तुम्ही बेडरूममध्ये घड्याळ लावणार असाल, तर घड्याळ अशा ठिकाणी लावा, ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश करताच तुमचं लक्ष घड्याळावर गेलं पाहिजे. याबरोबरच घड्याळावर कधीही धूळ जमता कामा नये. धूळ साचण्यापूर्वी घड्याळ नेहमी स्वच्छ करत राहणं आवश्यक आहे.

घड्याळा बाबतीत काही खास गोष्ट

जर तुमच्या घरातील घड्याळ बिघडलं असेल, तर ते लवकरात लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. घरामधील घड्याळ बिघडता कामा नये. बिघडलं असेल, तर ते लगेच दुरुस्त करणे आवश्यक आहे. अनेकांना घड्याळ भेटवस्तू म्हणून द्यायची सवय असते, मात्र घड्याळ कधीही कोणाला भेट वस्तू म्हणून देऊ नये. जर तुम्ही घड्याळ भेटवस्तू म्हणून देत असाल, तर तुमचा टाईम तुम्ही दुसऱ्याला देत आहात, असा त्याचा अर्थ आहे. जर तुमच्या घड्याळाची वेळ पुढे मागे असेल, तर त्या घडाळ्याची वेळ नियंत्रित करुन घ्या.

हे देखील वाचा Best partner Zodiac Sign: या तीन राशींच्या मुलांकडे मुली होतात आकर्षित; पती बनवण्यासाठी देखील असतात उत्सुक..

Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

infosys recruitment 2022: Infosys ने काढली ५५ हजारांची महाभरती! अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज..

Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.