infosys recruitment 2022: Infosys ने काढली ५५ हजारांची महाभरती! अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज..

0

infosys recruitment 2022: आयटी क्षेत्रात नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यात infosys सारखी आयटी कंपनी असेल, तर सोने पे सुहागा असेच म्हणावे लागेल. भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी म्हणून Infosys IT कंपनीने नावलौकिक मिळवला आहे. या कंपनीत जॉब करणे अनेकांचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाला या कंपनीत नोकरी मिळेल, असं नाही. या कंपनीत काम करण्यासाठी उमेदवारांकडे अधिक गुणवत्ता आणि रेफरन्सची देखील आवश्यकता असते. तरच तुम्ही अशा आयटी कंपनीत काम करू शकता. मात्र आता अनेकांचे या कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कारण ही कंपनी तब्बल 55 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची माहिती आहे.

Infosys ने देशाबरोबरच जागतिक स्तरावर देखील अनेक पदांसाठी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करायला सुरुवात केली आहे. आपल्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्पर्धात्मक नुकसान भरपाईची पुनरावृत्ती देण्याचे काम करत आहे. Infosys लवकरच देशातल्या काही राज्यामधील शाखांमध्ये तब्बल ५५ हजार कर्मचाऱ्यांची निवड करणार आहे. या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकाऱ्यानी या संदर्भात माहिती दिली आहे. नवीन कर्मचारी, अनुभवी कर्मचारी तसेच इंटर्नशिपसाठी देखील आम्ही ही भरती करत आहोत.

निलांजन रॉय म्हणाले, आम्ही काही धोरणे आखली आहेत. त्यानुसार आम्हीला गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी प्रतिभा असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आम्ही येणाऱ्या दीर्घकाळासाठी निवड करणार आहोत. साहजिकच यामुळे आमच्या कंपनीला गती मिळण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे. याबरोबरच इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी सलील पारेख यांनी देखील याविषयी भाष्य केले आहे.

सलील पारेख म्हणाले, या क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी तसेच विज्ञान शाखेतील पदवीधरांना खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. मात्र या क्षेत्रात येण्यासाठी त्यांना काही कौशल्य देखील आत्मसात करावी लागतील. त्यांच्या कौशल्यवर काम करण्यासाठी देखील आम्ही तयार असल्याच त्यांनी म्हटलं आहे. इन्फोसिस FY23त या जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी फ्रेशर्स उमेदवारांची देखील निवड करण्यात येणार आहे. ही सविस्तर माहिती सलील पारेख यांनी NTLF या प्रोग्रामला मार्गदर्शन करताना केले.

जागतिक पदवीधर भरती ग्लोबल ग्रॅज्युएटवर बोलताना या कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, जगभरातील बड्या उद्योगांकरिता डिजिटल परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेत, नेव्हिगेटसाठी मदत म्हणून Infosys या कंपनीत सहभागी होणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या गुणवत्तेसंदर्भात नेहमी शिकत राहणं आवश्यक आहे. तरच तुमची प्रगती होणार आहे. आणि म्हणून आम्ही यासाठी प्लॅटफॉर्म तयार करत आहोत असं देखील या प्रोग्राममध्ये सांगण्यात आलं.

या क्षेत्रात अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तसेच नवीन कर्मचाऱ्यांचे देखील कंपनी अर्ज मागवत आहे. भारतामध्ये असणाऱ्या बेंगलोर, भुवनेश्वर, चेन्नई, जयपुर मैसूर, हैदराबाद, अशा काही शहरातील शाखांसाठी नोकरीचे अर्ज मागवण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला देखील या संधीचा फायदा घ्यायचा असेल, तुम्ही यावर क्लिक करणं आवश्यक आहे.

इंटर्नशिप

अनुभवी आणि नवीन कर्मचाऱ्यांबरोबरच इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांसाठी देखील कंपनीने वर्कशॉप आयोजित केले आहेत. इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठात देखील कंपनीच्या कामाविषयी माहिती देण्याचं काम करण्यात येत आहे. मशीनलर्निंग पासून ते मानवी कामाच्या प्रकल्पामध्ये व्यवस्थापन, तंत्रज्ञान, आणि उदारमतवादी कला, यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या कंपनीत इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना जॉब मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी आणि सुवर्णसंधी असणार आहे. Internship साठी यावर क्लिक करा इंटर्नशिप करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Lifestyle: या चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..

Flipkart Big Bachat Dhamaal: फ्लिपकार्टचा धमाका! Smartphone तसेच electronic वस्तूंवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.