Best partner Zodiac Sign: या तीन राशींच्या मुलांकडे मुली होतात आकर्षित; पती बनवण्यासाठी देखील असतात उत्सुक..

Best partner Zodiac Sign: वैवाहिक जीवन (marriage life) असो किंवा लव लाईफ (Love life) असो, आपल्याला देखील सर्वोत्तम जोडीदार (best partner) असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्येकाला आपल्या मनासारखा जोडीदार किंवा मनासारखा पती-पत्नी मिळेलच असं नाही. मुलाला नेहमी सुंदर आणि सुशील पत्नी मिळावी, असं वाटत असतं. तर मुलीला देखील आपला पती हा आपल्याला समजून घेणारा आणि काळजी करणारा असावा, असं वाटत असतं. यासाठी अनेक जण विविध देव-देवतांचे उपवास देखील ठेवतात. अनेकदा लग्न जमवताना पत्रिका पाहूनच लग्न जमवलं जातं. मुलाचे किंवा मुलीचे गुणदोष स्वभाव पाहूनच लग्न जमवलं जातं. जोतिषशास्त्रामध्ये या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक राशीचे गुणदोष आणि स्वभावदोष असतात. जोतिषशास्त्रामध्ये या संदर्भात सविस्तर माहिती दिली असून, अनेक जण याचा अभ्यास करूनच, आयुष्याशी निगडित निर्णय घेतात. खासकरून विवाहाच्या वेळी या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आणि लग्न कमावले जाते. आज आपण अशा तीन राशी विषयी जनऊन घेणार आहोत, ज्या मुलींसाठी खूप खास असतात. या तीन राशीचे पुरुष ज्या महिलांच्या किंवा मुलीच्या आयुष्यात येतात, त्या मुलींचे आयुष्यच बदलून जाते. एकूणच काय तर त्या मुली खूप भाग्यवान असतात. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर. (Which Zodiac sign makes the best partner)

वृषभ

जोतिषशास्त्रामध्ये राशीवरून मुलामधील गुणदोष किंवा स्वभाव कसा आहे, याचे वर्णन केले आहे. अनेकदा मुलांच्या आयुष्यात काय घडणार आहे? हे देखील मुलाच्या रशीवरून सांगितले जाते. अनेकांना यावर विश्वास नसेल, मात्र जोतिषशास्त्रानुसार आपले आयुष्य जगणारा मोठा वर्ग समाजात पाहायला मिळतो. वृषभ’राशी विषयी वर्णन करताना ज्योतिषशास्त्रात काही महत्वाच्या गोष्टींचा उलघडा केला आहे. वृषभ राशीच्या स्वामीचा विचार करायचा झाल्यास, या राशीचा स्वामी हा शुक्र आहे. जो विलास त्याचबरोबर आकर्षकतेसाठी फायदेशीर मानला जातो.

या राशीचा स्वामी हा शुक्र असल्याने विलास तसेच आकर्षकतेसाठी फायदेशीर असतो. साहजिकच यामुळे ‘वृषभ’ ही रास असणाऱ्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात. या राशीचे पुरुष आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतात. एवढंच नाही, तर घरातील कामात देखील मदत करतात. वृषभ या राशीचे पुरुष नेहमी आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिलांसोबत वेळ घालवणे पसंत करतात. मग ती पत्नी असो किंवा प्रेयसी.

वृषभ रास असणारे पुरुष हे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या महिलांची अधिक काळजी घेतात. त्यांच्या खिशात असणाऱ्या महिलांना ते नेहमी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. या राशीचे पुरुष महिलांना समजून घेण्यास इतर पुरुषांच्या तुलनेत अग्रेसर असतात. आपल्या पत्नीच्या किंवा प्रेयसीच्या पाठीमागे हे पुरुष खंबीरपणे उभे राहतात. या राशीचे पुरुष इतर पुरुषांच्या तुलनेत अधिक जबाबदारीने वागतात. या राशीच्या पुरुषांना आपल्यामुळे आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिला दुःखी होऊ नयेत, असं नेहमी वाटतं असतं.

‘धनू’रास

धनु रास असणारे पुरुष देखील आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिला कशा आनंदी राहतील, याचा नेहमी विचार करत असतात. धनु रास असणारे पुरुष हे स्वभावाने खूप शांत असतात. धनु या राशीचा स्वामी हा बृहस्पति आहे. या राशीच्या पुरुषांना अध्यात्माची खूप मोठ्या प्रमाणात आवड असते. या राशीचे पुरुष बाहेरून स्ट्रॉंग वाटतात, मात्र आतून खूप मवाळू आणि हळवे असतात. इतर पुरुषांच्या तुलनेत या राशीचे पुरुष महिलांची अधिक काळजी घेतात. साहजिकच यामुळे महिला देखील अशा पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात.

‘कर्क’रास

अनेकदा आपण पाहतो, पुरुषांना लग्न झाल्यानंतर देखील जबाबदारीची जाणीव होत नाही. आपण एक पती आहोत, या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला असतो. मात्र ‘कर्क’ रास असणाऱ्या पुरुषांना नेहमी आपण एक पती आहोत, आणि सर्वोत्तम पती होण्यासाठी या राशीचे पुरुष सातत्याने प्रयत्न देखील करतात. आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिलांना सुखी ठेवण्यासाठी या राशीचे पुरुष नेहमी त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी आणून देतात. या राशीचे पुरुष काही कारणांमुळे वाद-विवाद झाले तरी देखील सांभाळून घेतात. अनेकदा चुकी नसताना, स्वतःहून आपल्या जोडीदाराची माफी देखील मागतात.

हे देखील वाचा Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

infosys recruitment 2022: Infosys ने काढली ५५ हजारांची महाभरती! अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज..

Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Instagram followers: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी वापरा या चार स्ट्रिक आणि हजारो रूपये कमवा..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

Lifestyle: या चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.