Instagram followers: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी वापरा या ‘चार’ स्ट्रिक आणि हजारो रूपये कमवा..

Instagram followers: इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जगभरात 2 अब्जापेक्षा जास्त इंस्टाग्रामचे सक्रिय युजर्स आहेत. Instagram आता फक्त मनोरंजनाचे साधन राहिले नाही. Instagram रील्सच्या माध्यमातून असंख्य जण लाखों रुपये देखील कमवतात. जर तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर आपले फॉलोअर्स वाढवायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. इंस्टाग्रामवर आपले फोलोअर्स वाढवून तुम्ही देखील लाखो रुपये कमवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

आजकाल असंख्य लोक इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातूनही पैसे कमवत असले, तरी त्यासाठी काही महत्वाच्या स्ट्रिक देखील आहेत. तसं पाहायला गेलं तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून पैसे कमावणे फारसं अवघड नाही. यासाठी काही बेसिस गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. Insta reels च्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्स मिळवणे, ही खरोखरीच कठीण गोष्ट आहे. मात्र आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामवर झटपट फॉलोअर्स कसे वाढवायचे? या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. काही बेसिक गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवू शकता.

उत्तम मथळा आणि योग्य हॅशटॅग वापरा

तुमचा मथळा आणि हॅशटॅग हा तुमच्या विषयाचे वर्णन करणारा असेल, तर तुमच्या पोस्टला अधिक व्ह्यूज मिळू शकतात. याशिवाय तुम्ही फॉलोअर्सना देखील आपल्याकडे आकर्षित करू शकता. जर तुम्ही विषयाला अनुसरून हॅशटॅग वापरले, तर नवीन फॉलोअर पर्यत देखील तुमचा विषय पोहचतो‌. वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या चाहत्यांना किंवा फॉलोअर्सना काँटेंडच्या खाली कमेंट करायला सांगू शकता. या एका प्रकारे तुम्ही तुमच्या Instagram चे फॉलोअर्स सहजरीत्या वाढवू शकता.

प्रेक्षकांना गुंतवून ठेवा

इंस्टाग्रामवर जर तुम्हाला अधिक पॉप्युलर व्हायचे, असेल, तर प्रेक्षकांना तुमच्या रिल्सवर अधिक काळ गुंतवून ठेवावे लागेल. तुमच्या पोस्ट किंवा रील्सवर कमेंट येणे आवश्यक आहे. जर तुमच्या पोस्टवर कमेंट येत असतील, तर तुम्ही त्या कमेंटला प्रतिउत्तर देणे आवश्यक आहे. प्रत्येकाला उत्तर देणे शक्य नसेल, तर तुम्ही त्यांची कमेंट किमान लाईक करणे आवश्यक आहे. यामुळे वापरकर्ते नेहमी तुमच्याशी जोडले जातात. आणि तुमचे फॉलोअर्स वाढण्यास मदत होते.

दररोज पोस्ट करणे आवश्यक

इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढण्यासाठी इंस्टाग्रामवर सक्रिय असणे फार आवश्यक आहे. तुम्ही दररोज किमान एक तरी पोस्ट करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर सक्रिय आहात, हे तुमच्या फॉलोअर्सना समजते. आणि ते तुम्हाला फॉलो करतात. जर तुम्हाला दररोज पोस्ट करणे शक्य नसेल, तर तुम्ही तुमची Instagram स्टोरी टाकणे आवश्यक आहे.

हे देखील वाचाMSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..

WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Lifestyle: या चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.