Skin Care Tips: नियमित कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवल्यास होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे..

Skin Care Tips: इतरांपेक्षा आपल्या चेहऱ्यावरची त्वचा तरुण आणि ताजी दिसावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकजण यासाठी हजार रुपये खर्च देखील करतात. मात्र केमिकल युक्त प्रॉडक्टमुळे चेहऱ्यावरचा ताजेपणा हळूहळू कमी होत जातो. आणि सुंदर चेहऱ्यावर पुरळ, तेलकटपणा, काळे डाग येण्यास सुरुवात होते. या समस्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उद्भवताना पाहायला मिळतात. बाजारात मिळणाऱ्या केमिकल युक्त अनेक प्रॉडक्ट वापरल्यामुळे या समस्या अधिकतेने जाणवत असल्याचं समोर आलं आहे. तुम्ही देखील अशा समस्याने त्रस्त असाल, तर आता घरगुती उपाय करून या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. (Washing Face With Neem Benefits)

सुंदर दिसण्यासाठी अनेक जण महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अनेकदा वेगवेगळ्या ब्रँडच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यामुळे देखील चेहऱ्यावर काळे डाग, पुरळ, तेलकट त्वचा अशा समस्या उद्भवतात. सुंदर आणि तरुण त्वचा हवी असेल, तर जेवढे शक्य होईल, तेवढे केमिकल युक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळणे आवश्यक आहे. अनेकांना बाहेर जाताना चेहऱ्यावर मेकअप करण्याची सवय असते. मात्र कालांतराने यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. जेवढं शक्य आहे, तेवढं नॅचरल राहणं आरोग्यासाठी कधीही उत्तम ठरतं.

महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील तुमच्या चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि तरुण ठेवू शकता. कडुलिंबाचा मोहर आणि पाला हा खूप गुणकारी आहे. कडुलिंबाचा पाला पाण्यात टाकून आंघोळ करावी, असं आपली वडीलधारी मंडळी बोलताना तुम्ही अनेकदा ऐकलं देखील असेल. त्वचेच्या अनेक समस्यांवर कडुलिंबाचा पाला आणि मोहर रामबाण उपाय आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

त्वचेच्या ऍलर्जीपासून होते मुक्तता

कडुलिंबाचा पाला पाण्यात मिसळून त्या पाण्याने जर आपला चेहरा धुवला तर, एलर्जीची समस्या दूर होते. कडुलिंबाच्या पाल्यामध्ये बॅक्टेरियावर मात करणारा पदार्थ असतो. आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या घातक बॅक्टेरियाशी सामना करण्यासाठी कडुलिंबाचा पाला खूप प्रभावी माध्यम आहे. कडुलिंबाचा पाला पाण्यात मिसळून पाण्याने सतत चेहरा धुतल्यास एनर्जीबरोबरच पुरळ, खाज इत्यादी समस्यांपासून मुक्तता मिळते.

पुरळ नष्ट होते

नेहमी वेगवेगळ्या ब्रँडच्या सौंदर्यप्रसाधनाचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येते. चेहऱ्यावर आलेली पुरळ घालवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी उपाययोजना करतात. मात्र तरी देखील पूर्णतः पुरळ नष्ट होत नाही. मात्र लिंबाचा पाला आणि मोहर पाण्यात मिसळून चेहरा सतत धुवल्याने, चेहऱ्यावर असणारी पुरळ नष्ट व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर असणारे मुरुमे देखील नष्ट होतात. अनेकदा आपण पाहतो, चेहऱ्यावर घाम आल्यास चेहऱ्याची जळजळ होते. मात्र लिंबाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास ही समस्या देखील नाहीशी होते.

तेलकट, कोरड्या त्वचेवर रामबाण उपाय

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही अनेकदा नीम फेस वॉश वापरता. अनेक जण चेहऱ्यासाठी ‘निम’ हा फेसवॉश उत्तम असल्याचे सांगतात. मात्र कंपनी तुम्हाला फेसवॉशमध्ये निम आहे, हे सांगत असली तरी देखील त्यामध्ये खरंच किती प्रमाणात निम म्हणजेच, लिंबाच्या पानाचा वापर केला आहे? किंवा केला आहे की नाही? हे ठामपणे सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्ही लिंबाच्या पानांचा वापर करणे आवश्यक आहे. लिंबाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट तसेच अंटीसेप्टिक हे गुण असतात. हे चेहऱ्यावर असणाऱ्या बॅक्टेरिया दूर करण्याचे काम करतात. साहजिकच यामुळे चेहऱ्यावर असणारा तेलकटपणा कमी होऊन त्वचा मुलायम बनण्यास मदत होते.

काळे डाग नष्ट होतात.

चेहऱ्यावर असणारा तेलकटपणा पुरळ भेगा याबरोबरच कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा सतत धुतल्याने, चेहऱ्याचा रंग देखील उजळतो याबरोबरच चेहऱ्यावर असणारे काळे डाग देखील नष्ट होतात. लिंबाच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असल्याने लिंबाचा पाला चेहऱ्यावर असणाऱ्या विषाणूंचा सहजरीत्या सामना करते. बाहेरील वातावरणामधील कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन चेहऱ्यावर होण्यापासून लिंबाचा पाला संरक्षण करते. याचा परिणाम म्हणून, चेहऱ्यावर असणारे काळे डाग देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते.

हे देखील वाचा Viral Video: ट्रेनमध्ये मुला-मुलीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही जाल चक्रावून; नक्की काय केले या दोघांनी पाहा तुम्हीचं..

Jio prepaid plan: Jio चा हा प्लॅन 200 रुपयांनी झाला स्वस्त; ऑफरचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम..

Best partner Zodiac Sign: या तीन राशींच्या मुलांकडे मुली होतात आकर्षित; पती बनवण्यासाठी देखील असतात उत्सुक..

Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..

Fig Benefits For Men: विवाहित पुरुषांची ताकद वाढवण्याचे काम करतो हा पदार्थ; नियमित सेवन केल्यास, होतील हे जबरदस्त फायदे..

Kitchen tips: हिरवे झालेले बटाटे खात असाल, तर सावधान! होतायत हे गंभीर आजार..

infosys recruitment 2022: Infosys ने काढली ५५ हजारांची महाभरती! अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज..

Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

WhatsApp Update: WhatsApp ने ग्रुप ॲडमिनला बनवले सुपर पॉवर; आता ग्रुप मधील सदस्यांचे मेसेज करता येणार डिलीट..

Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.