OTT Platform: Amazon prime, Netflix, Disney+hotstar आता पाहता येणार मोफत; वापरा फक्त ही स्ट्रिक..

OTT Platform: ॲमेझॉन प्राईम (Amazon prime) नेटफ्लिक्स (Netflix) डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+hotstar) सारखे ओटीपी प्लॅटफॉर्म दिवसेंदिवस लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहेत. या ओटीपी प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदार वेब सिरीज येत असल्याने, या प्लॅटफॉर्मचा रिचार्ज देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेकांना या तीनही ओटीपी प्लॅटफॉर्मचे (OPT platform) वेड लागल्याचे दिसून येते. हे तीनही प्लॅटफॉर्म पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या तीनही प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन खूप महाग असल्याने, अनेकजण मित्रांच्या सबस्क्रीप्शन वरच आपलं काम चालवतात. मात्र अनेकांना या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या वेब सिरीज (web series) सबस्क्रीप्शन (subscription) महाग असल्याने पाहता येत नाहीत.

ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन महाग असल्याने, अनेकजण या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या वेब सिरीज पाहण्यापासून वंचित राहतात. अनेकांना मनोरंजनाची आवड असून देखील आपल्या आवाक्याबाहेर सबस्क्रीप्शन असल्याने, यावर येणाऱ्या वेबसिरिजचा आनंद घेता येत नाही. मात्र आता हे तीनही ओटीपी प्लॅटफॉर्म पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. हे तीनही ओटीपी प्लॅटफॉर्म तुम्हाला मोफत पाहता येणार आहेत. जर तुम्हाला देखील हे प्लॅटफॉर्म मोफत पाहायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आम्ही अशी एक स्ट्रिक घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला हे तीनही प्लॅटफॉर्म कोणतेही शुल्क न आकारता मोफत पाहता येणार आहेत.

अमेझॉन प्राईम Disney + Hotstar Netflix या OTP प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन हवे असेल, तर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या डाटा प्लान पेक्षा वेगळा डाटा प्लॅनने रिचार्ज करावा लागेल. तुम्ही प्रत्येक महिन्याला जो डाटा प्लानने रिचार्ज करता, त्यापेक्षा थोडा वेगळा हा डाटा प्लॅन असेल. यात एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे, तुम्ही करत असलेल्या डाटा प्लान पेक्षा तुम्हाला अधिक पैसे देण्याच्या आवश्यकता नाही. त्याच किंमतीत तुम्हाला वेगळा डाटा प्लॅनने रिचार्ज करायचा आहे. असे कोणते डाटा प्लॅन्स आहेत, ज्यात तुम्हाला या तीनही ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे, याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत, जाणून घेऊया सविस्तर.

Airtel 499 पोस्टपेड प्लॅन

जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर तुम्हाला 499 च्या पोस्टपेड प्लॅनने रिचार्ज करावा लगणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डाटा प्लॅन बरोबरच ॲमेझॉन प्राईम आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही यावर असणाऱ्या मूव्हीज आणि वेब सिरीज मोफत पाहू शकता. एवढंच नाही, तर तुम्हाला एअरटेल ‘एक्स्ट्रीम ॲपचा’ देखील अगदी आनंद घेता येणार आहे. याशिवाय तुम्हाला दररोज शंभर एसएमएस देखील मिळणार आहेत. म्हणजेच, तुम्ही करत असलेल्या प्लॅनचे सर्व बेनिफिट्स या प्लॅनमध्ये मिळणार आहे.

एअरटेल ९९९ पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या 999 पोस्टपेड प्लॅनने रिचार्ज केल्यावर देखील तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनने रिचार्ज केला, तर तुम्हाला ॲमेझॉन प्राईम याबरोबरच Diney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्वीसारखेच अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. याशिवाय दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला ‘एअरटेल एक्स्ट्रीम ॲप’चा लाभ मिळणार आहे. एअरटेलचा हा सर्वाधिक खप असणारा रिचार्ज आहे. या प्लॅनने रिचार्ज करून अनेक जण मनोरंजनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात.

Airtel 1199 पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनने विक्रम केला आहे. देशभरात सर्वाधिक विक्री झालेला हा प्लॅन आहे. एअरटेलच्या अकराशे 99 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन ने रिचार्ज केल्यानंतर, ग्राहकांना ॲमेझॉन प्राईम Disney + Hotstar याबरोबरच Netflix चे देखील मोफत सबस्क्रीप्शन मिळते. यामध्ये ग्राहकांना तब्बल दीडशे जीबी डाटा दिला जातो. तुम्ही करत असलेल्या प्लॅनमध्ये जे बेनिफिट्स मिळतात, ते सर्व बेनिफिट्स या रिचार्जमध्ये देखील मिळत आहेत. याबरोबरच हे तीनही प्लॅटफॉर्म तुम्हाला अगदी मोफत पाहता येणार असल्याने, एअरटेलचा हा प्लॅन तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतो.

हे देखील वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.