scientific reason: या वेळेस नखे, केस कापल्यास होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या या पाठीमागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण..

scientific reason: आपले पूर्वज किंवा वडीलधारी मंडळी आपल्याला काही गोष्टी करण्यापासून नेहमी रोखत असतात. हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा संबंध धर्माशी जोडला जातो. तुम्हाला देखील अनेक गोष्टी करण्यापासून तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी रोखलं असेल. आज आपण अशाच एका विषया बद्दल जाणून घेणार आहोत. तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी कधी संध्याकाळच्या वेळी नखे आणि केस कापण्यापासून रोखलं आहे का? अनेकांना संध्याकाळच्या वेळी ही महत्त्वाची दोन कामे करण्यापासून रोखलं असेल. असं करण्यापासून का रोखले जाते? याची देखील अनेक कारणे तुम्हाला सांगितली गेली असतील. मात्र याचे खरं कारण जाणून, तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

धार्मिक कारण

अनेकदा आपल्या घरातील मोठी माणसे संध्याकाळच्या वेळी केस आणि नखे कापू देत नाहीत. साहजिकच यामुळे अनेकांचा संताप होतो. मात्र आपल्याला समजवण्यासाठी अनेक जण धर्माचा आधार घेतात. आणि आपल्याला भीती घातली जाते. संध्याकाळी नखे आणि केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीचा वास होत नसल्याचे, सांगितले जाते. याविषयी आपल्याला फारसं समजत नसल्याने, आपण देखील घाबरतो. आणि वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेलं आपल्याला देखील पटू लागतं. मात्र याचं खरं आणि शास्त्रीय कारण वेगळंच आहे. जाणून घेऊया सविस्तर.

वैज्ञानिक कारण

संध्याकाळी केस का कापत नाहीत? याचं धार्मिक कारण वाचून अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार, आयुष्य जगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, अनेक जण आजही या विचाराला बळी पडल्याचं पाहायला मिळतं. वास्तविक पाहता संध्याकाळी केस आणि नखे कापण्याचा आणि धर्माचा काहीही संबंध असेल, असं महाराष्ट्र लोकशाही मानत नाही. असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. तर रात्रीच्या वेळी केस आणि नखे कापू नये, असं सांगण्यापाठीमागे एक शास्त्रीय कारण आहे.

रात्रीच्या वेळी केस आणि नखे कापू नये, असं आपले वडीलधारी मंडळी सांगण्यापाठीमागे एक शास्त्रीय कारण दडलेले आहे. रात्रीच्या वेळी, आपण नेहमी जेवण करून थोड्याफार प्रमाणात चालून झोपत असतो. खरंतर यातच शास्त्रीय कारण दडलं आहे. केस कापून आल्यानंतर, आपण जेवण करून शतपावली करून लगेच झोपी जातो, मात्र यामुळे जेवण करत असताना आपण कापलेले केस जेवणाद्वारे आपल्या पोटात देखील जाण्याची शक्यता असते.

सकाळच्या वेळी आपण नेहमी केस कापून आल्यानंतर, आंघोळ करतो. मात्र रात्री केस कापल्यानंतर आपण अंघोळ करेलच असं नाही. साहजिकच केस कापून आल्यानंतर जेवणाद्वारे, आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. याबरोबरच झोपल्यानंतर, कापलेले केस आपल्या शरीरावर पडलेले देखील असतात. यामुळे आपल्या शरीराला हे केस टोचले जातात, आणि आपल्याला व्यवस्थितरित्या झोप देखील लागत नाही. हे देखील रात्री केस न कापण्याचं एक महत्वाचं कारण आहे.

रात्री केस न कापण्याचं शास्त्रीय कारण आपण जाणून घेतलं. याच पद्धतीने रात्री नखे देखील न कापण्यापाठीमागे शास्त्रीय कारण आहे. नखे कापत असताना, नेहमी काळजीपूर्वक कापावी लागतात. कधी-कधी नखे कापत असताना, बोट देखील कापण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात याला जिभाळी लागणे, असेही म्हणतात. सूर्यास्त झाल्यानंतर, उजेडाच्या तुलनेत डोळ्यांना कमी दिसते. आणि म्हणून, कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, यासाठी नखे ही नेहमी दिवसाच्या प्रकाशात कापली जावीत, असं म्हटलं जातं. आणि हेच याचं मुळ तसेच शास्त्रीय कारण आहे.

हे देखील वाचा Lifestyle: या आठ गोष्टी घरात आणतात नेहमी नकारात्मकता; जाणून घ्या सविस्तर..

Lifestyle: या चार कारणांमुळे मुली नेहमी वयाने जास्त असणाऱ्या पुरुषांकडे होतात आकर्षित..

Electricity bill: आता घरातील वीजबिल येणार निम्म्यावर, फक्त वापर ही स्ट्रिक..

Relationship tips: या तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

Women and Child Development: महिला व बाल विकास विभागात मेगा भरती! बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

OTT Platform: Amazon prime, Netflix, Disney+hotstar आता पाहता येणार मोफत; वापरा फक्त ही स्ट्रिक..

Swastika Sign: मुख्य प्रवेशद्वार, लग्न, महत्त्वाच्या समारंभात स्वस्तिक का काढले जाते? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.