Monsoon Update: पंजाबराव डख यांच्या 11 ऑगस्ट पर्यंतच्या हवामान अंदाजाने शेतकरी चिंतेत; राज्यात या भागात होणार अतिवृष्टी..

Monsoon Update: दोन आठवडे पावसाने उघडीप दिल्यानंतर, शेतकरी सुखावला होता. मात्र काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात दुबार पेरण्या सुरू आहेत. अशातच पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला आहे. शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास असणाऱ्या आणि स्वतःला हवामान अभ्यासक समजणाऱ्या पंजाबराव ढग यांनी आता शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारा हवामान अंदाज वर्तवला आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj) पंजाबराव डक (Panjabrao Dakh) बरोबरच भारतीय हवामान विभागाने देखील आपला हवामान अंदाज सांगितला आहे.

हवामान विभागाने आज म्हणजेच, सोमवारी राज्यातील अनेक भागामध्ये अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने, शेतकरी चांगलाच चिंतेत पडला आहे. भारतीय हवामान विभागाने 12 तारखेपर्यंत अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर पंजाबराव डख यांनी देखील ११ ऑगस्ट पर्यंत आपला अंदाज शेतकऱ्यांना सांगितला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचा हवामान विभागाने आपला हवामान अंदाज वर्तवला आहे.

तसं पाहायला गेलं तर, अनेक शेतकऱ्यांचा हवामान विभागावर विश्वास नसल्याचे पाहायला मिळते. मात्र शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी पुत्र आणि स्वतःला हवामान तज्ञ समजणारे, पंजाबराव डख यांच्यावर असल्याचे पाहायला मिळतं. पंजाबराव डख यांनी देखील शेतकऱ्यांना काळजी करायला लावणाराच हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी 11 ऑगस्ट पर्यंतचा आपला हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात त्यांनी 11 तारखेपर्यंत राज्यात सर्व भागात पाऊस पडणार असल्याचं म्हटले आहे.

पंजाबराव डख यांनी 11 ऑगस्ट पर्यंत वर्तवलेल्या हवामान अंदाजामध्ये उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रमधील धुळे नंदुरबार, तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना आपल्या शेतीची आणि पशुधनाची देखील काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 11 ऑगस्ट पर्यंत विजांचा मोठ्या प्रमाणात कडकडाट होणार असल्याचे, देखील म्हंटले डख यांनी म्हटले आहे. 11 ऑगस्ट पासून जोरदार पाऊस पडणार असल्याने पावसाचे वातावरण झाल्यानंतर, शेतकऱ्यांनी पाऊस आता कोसळणारच असा अंदाज बाळगून उपाययोजना कराव्यात, असा देखील सल्ला पंजाबराव डख यांनी दिली आहे.

पंजाबराव डख यांनी अलीकडच्या काळात वर्तवलेले हवामान अंदाज बहुतांश वेळा फेल ठरल्याचे पाहायला मिळते. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हवामान अंदाजावर अजूनही विश्वास असल्याचे देखील पाहायला मिळतं. बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने पंजाबराव यांना तुम्ही हवामान अंदाज कशाचा आधारावर वर्तवता, या संदर्भात काही प्रश्न विचारले होते. मात्र पंजाबराव यांना या संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नव्हती. हवामान अंदाज वर्तवण्याचे कोणतेही साधन पंजाब यांच्याकडे नाही.

हे देखील वाचा Health Tips: हे पाच पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट, आतडी, डोळे, मेंदू, हृदयाच्या समस्या होतात दूर..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Farmer Scheme: तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Health Tips: पुरुष आपल्या कमरेला कडदोरा का बांधतात? कारण जाणून तुम्हीही धराल डोकं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.