WhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..

0

WhatsApp Update: जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप (messaging app) व्हाट्सअप (whatsapp) आपल्या ग्राहकांच्या प्रायव्हसीसाठी नवनवीन फिचर्स (features) घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार व्हाट्सअपमध्ये नवीन फीचर्स ऍड होताना पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या सिक्युरिटीसाठी आता पुन्हा एकदा व्हाट्सअपने काही भन्नाट फीचर्स ॲड केले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी व्हाट्सअपने आपल्या ग्रुप सदस्यांची संख्या वाढवली. त्याचबरोबर चुकीचा सेंड झालेल्या मेसेज डिलीट करण्याची वेळ देखील काही दिवसांपूर्वी वाढवली. आता पुन्हा एकदा व्हाट्सअपने तीन नवीन भन्नाट फीचर्स ॲड केले आहेत. या नवीन फीचर्स संदर्भातली माहिती मेटाचे (meta) सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी दिली आहे. जाणून घेऊया या फीचर्स बाबद सविस्तर.

जगभरात व्हाट्सअप वापरण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्हाट्सअप हे फक्त आता मेसेजिंग ॲप राहिले नसून, या ॲपच्या मदतीने ग्रुप व्हिडिओ कॉल, व्हाट्सअप ग्रुप चॅटिंग, त्याचबरोबर महत्त्वाची डॉक्युमेंट्स, व्हिडिओ, फोटो इत्यादी साधने पाठवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात WhatsApp चा उपयोग होतो. व्हाट्सअपचा वाढता वापर लक्षात घेऊन, कंपनीने ग्राहकांच्या प्रायव्हसी संदर्भात अधिक काळजी घेत व्हाट्सअपमध्ये नवनवीन फीचर्स ॲड केले आहेत. आता आणखी काही नवीन फीचर्स व्हाट्सअप आपल्या युजर्सकरिता घेऊन आलं आहे.

गरजेनुसार, व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स व्हाट्सअपमध्ये ऍड करत आहे. मात्र या फीचर्स संदर्भात ग्राहकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. आज आपण अशाच तीन फीचर संदर्भात जाणून घेणार आहोत, ज्याची तुम्हाला देखील माहिती नसेल. ग्राहकांची प्रायव्हसी लक्षात घेऊन, व्हॉट्सॲपने आता चॅटिंग केलेल्या व्हाट्सअपचा स्क्रीन शॉट इतर कोणालाही काढता येणार नाही. त्याचबरोबर एखाद्या व्हाट्सअप ग्रुप मधील सदस्यांना आपला नंबर देखील लपवून ठेवत येणार आहे. याशिवाय एखाद्याने व्हाट्सअप ग्रुप सोडला, तर आपण लेफ्ट झालो आहे, हे इतर कोणाला समजणार देखील नाही. हे नवीन तीन फिचर्स व्हॉट्सॲपने आणले आहेत. हे तीन फीचर्स कसे काम करतात? याचा वापर कसा वापर करायचा? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

हे आहेत व्हॉट्सॲपचे नवे प्रायव्हसी फिचर्स

जारी केलेल्या तीन नवीन फीचर्समुळे ग्राहकांनी व्हाट्सअप ग्रुप सोडला तरी कोणालाही कळणार नाही. आपण कोणालाही ऑनलाईन असल्याचं पाहता येणार नाही. आपण ऑनलाईन आहे, की नाही हे ज्यांना दाखवायचं आहे, त्यांनाच आपण दाखवू शकतो. त्याचबरोबरच ज्यांच्यासोबत आपण चॅटिंग करत आहोत, त्या लोकांना आपल्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट देखील काढता येणार नाही. मात्र त्यासाठी आपल्याला समोरच्याशी ‘व्ह्यू वन्स मेसेज’मधून चॅटिंग करावी लागणार आहे. आता आपण ‘व्ह्यू वन्स मेसेज’ म्हणजे काय आणि तो कसा पाठवायचा याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ.

व्ह्यू वन्स मोडमध्ये मेसेज फोटो-व्हिडिओ पाठवण्याची पद्धत

व्ह्यू वन्स मेसेज मोडमधून केलेली चॅटिंग किंवा पाठवलेले फोटो उघडल्यानंतर वापरकर्त्यांना ते पाहता येणार नाहीत. पाठवलेले मेसेजवरआणि व्हिडिओवर टॅप केल्यानंतरच, फोटो आणि चॅटिंग व्हिडिओ दिसतील. साहजिकच यामुळे तुम्ही त्यावरील बोटाचा स्पर्श काढल्यानंतर, फोटो बंद होतो. आणि Opened हा पर्याय पाहायला मिळतो. साहजिकच यामुळे तुम्हाला या चॅटिंगचा तसेच व्हिडिओचा, स्क्रीनशॉट काढता येत नाही. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, व्ह्यू वन्स मेसेज कसा करायचा? तर ते देखील जाणून घेऊ.

या पद्धतीने करा व्ह्यू वन्स मेसेज 

व्ह्यू वन्स मेसेज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ज्याच्या सोबत चॅटिंग करायची आहे, त्याच्या व्हाट्सअप चॅट विंडोवर जाणं आवश्यक आहे. त्यानंतर मेसेज बॉक्सवर टाईप करायचं आहे. नंतर attachment हा पर्याय दिसेल, तुम्ही त्यावर क्लिक करायचं आहे. attachment वर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमच्या गॅलरीत असणारे फोटो पाठवू शकता. तसेच चॅटिंग करू शकता.

ग्रुपमधून असा लपवा तुमचा नंबर

अनेक जण आपला नंबर व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील करतात. मात्र असे काही व्हाट्सअप ग्रुप असतात, ज्यामधील सदस्य आपल्या ओळखीचे देखील नसतात. साहजिकच यामुळे अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. अनेक जण आपला नंबर सेव करून मेसेज पाठवतात. व्हाट्सअपने नवीन फीचर्स उपलब्ध केल्याने, कोणत्याही व्हाट्सअप ग्रुपमध्ये आपला नंबर असेल, तर तो लपवता येणार आहे. म्हणजेच आपला नंबर ग्रुप मधील कोणत्याही सदस्यांना पाहता येणार नाही. हे फीचर्स काही दिवसांतच युजर्सना वापरता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे देखील वाचा मानसिक आरोग्य: डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने होतात हे परिणाम; वेळीच असे थांबवा अविचार अन्यथा..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Health Tips: पुरुष आपल्या कमरेला कडदोरा का बांधतात? कारण जाणून तुम्हीही धराल डोकं..

Health Tip हे पाच पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट, आतडी, डोळे, मेंदू, हृदयाच्या समस्या होतात दूर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.