Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

0

Jio Plans: Jio आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन ऑफर्स घेऊन येते. गेल्या काही दिवसांपासून jio ने आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर आणल्या आहेत. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त jio ने आणलेल्या (Jio Independence Offer) वर्षाचा प्लॅनची चर्चा जोरदार रंगली असतातच आता जिओच्या आणखी एका प्लॅनने ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. जर तुम्ही ओटीपी (OTT) प्लॅटफॉर्म (platform) पाहत असाल तर, आता तुम्हाला नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, डिस्ने + हॉटस्टार हे तिन्हीं ओटीपी प्लॅटफॉर्म कोणत्याही अतिरिक्त सबस्क्रीप्शन शिवाय पाहता येणार आहेत. Jio आपल्या ग्राहकांसाठी असे काही प्लॅन घेऊन आले आहे, ज्या प्लॅनने रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना या तीनही ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे.

अलीकडच्या काळात ओटीपी प्लॅटफॉर्म पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र ग्राहकांची मागणी वाढल्याने, हे प्लॅटफॉर्म देखील प्रचंड महाग झाले आहेत. साहजिकच यामुळे आता अनेकांना ओटीपी प्लॅटफॉर्मचचे सबस्क्रिप्शन घेणे परवडत नाही. ओटीपी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या वेब सिरीज, मुव्हीज तुम्ही देखील पाहू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही सबस्क्रीप्शन शिवाय तुम्ही पूर्वी करत असणाऱ्या रिचार्ज प्लॅन मध्येच तुम्हाला हे तिन्हीं प्लॅटफॉर्म पाहता येणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर.

ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना असल्याने, अलीकडे अनेकजण रिचार्ज करण्याच्या अगोदर आपल्याला कोणत्या प्लॅनमध्ये कोणकोणते ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येऊ शकतात, याची खारजमा करतात. मात्र असे कोणतेही प्लॅन सापडत नाहीत. मात्र आता Jio आपल्या ग्राहकांसाठी काही प्लॅन ऑफर करत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना Netflix, Amazon prime त्याचबरोबर डिस्ने + हॉटस्टार असे तीनही OTT Platform चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. विशेष म्हणजे, ग्राहकांना हे सबस्क्रिप्शन तब्बल एका वर्षासाठी मोफत मिळते. OTT Platform चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणारे असे कोणते रिचार्ज प्लॅन आहेत, जाणून घेऊया सविस्तर.

जिओच ३९९ 

जिओच्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानने ग्राहकांनी रिचार्ज केल्यास महिन्याला ७५ जीबी डाटा दिला जातो. ७५ जीबी डाटाच्या भन्नाट ऑफर बरोबरच तुम्हाला Jioच्या ३९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग त्याचबरोबर दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, या प्लॅनमध्ये वेगळं काय आहे. तर पूर्वी तुम्हाला या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime त्याचबरोबर Disney + Hotstar सारखे OTT Platform पाहायला मिळत नव्हते. आता या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला हे तीनही प्लॅटफॉर्म तब्बल एका वर्षासाठी मोफत पाहता येणार आहेत.

जिओचा ५९९ रुपयांचा

जियोच्या ५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनने रिचार्ज केला तर, ग्राहकांना तब्बल १०० gb डाटा देण्याचे काम जीओ करते त्याचबरोबर दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. याशिवाय तुम्हाला अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. जर तुमचा दिवसभराचा डाटा प्लॅन संपला असेल, तर तुम्ही दहा रुपयांच्या रिचार्जमध्ये एक जीबी डाटा देखील मिळवू शकता. जिओचा हा प्लॅन सर्वाधिक विक्री झालेला प्लॅन आहे. या प्लॅन बरोबरच ग्राहकांना नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, त्याचबरोबर Disney + Hotstar हे तीनही ओटीपी प्लॅटफॉर्म वर्षभरासाठी मोफत पाहता येणार आहेत.

जिओचा ७९९ 

जिओचा 799 रुपयाच्या पोस्टमध्ये रिचार्जमध्ये देखील ग्राहकांना अनेक भन्नाट ऑफर्स मिळत आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल दीडशे जीबी डाटा त्याचबरोबर या प्लॅनमध्ये अमर्यादित एसएमएस सुविधा दिली जाते. सोबतच अमर्यादित व्हाईस कॉलिंग देखील देण्याची सुविधा Jio ने या प्लॅनमध्ये केली आहे. जिओचा 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, नेटफिक्स, हॉटस्टार हे तीनही प्लॅटफॉर्म अगदी मोफत वर्षभरासाठी पाहता येणार आहेत.

हे देखील वाचा Hstrekha shastra: हातावरची शनि रेषा सांगते तुमच्या आयुष्यात किती पैसा आहे; जाणून घ्या कुठे असते ही रेषा..

Hairstyle: हेअर स्टाईल वरून समजते मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव..

Health Tips: या तीन गोष्टी नियमित केल्यास आयुष्यभर लागणार नाही चष्मा; डोळ्याच्या आरोग्यासाठी या गोष्टी कराच..

WhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..

मानसिक आरोग्य: डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने होतात हे परिणाम; वेळीच असे थांबवा अविचार अन्यथा..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.