Hstrekha shastra: हातावरची शनि रेषा सांगते तुमच्या आयुष्यात किती पैसा आहे; जाणून घ्या कुठे असते ही रेषा..

0

Hstrekha shastra: हिंदू धर्मामध्ये ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व आहे. अनेकजण आपले आयुष्य जगताना ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन जीवन जगतात. अनेकजण आपल्या आयुष्यात संपत्तीचा किती योग आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. अनेकांना या शास्त्रावर विश्वास नसेल, मात्र या शास्त्रानुसार जीवन जगणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळते. ज्योतिष शास्त्रामध्ये शनी ग्रहाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आलं आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनी ग्रहाला जितकं महत्त्व देण्यात आलं आहे, तितकंच महत्व हस्तरेषा क्षेत्रात तळहातावर असणाऱ्या शनि रेषेला देखील देण्यात आले आहे.

खरंतर कर्म हेच आपलं जीवन असतं. अनेकजण यावरच विश्वास ठेऊन आपल्या जीवनाची वाटचाल सुरू ठेवतात. मात्र तरीदेखील अनेकजण कष्ट करून देखील यश मिळत नाही, म्हणून ज्योतिष शास्त्राचा आधार घेतात. आणि स्वतःची आर्थिक स्थिती तपासतात. हस्तरेषा शास्त्रामध्ये माणसाचे आयुष्य आर्थिक स्थिती त्याचबरोबर यश, यावर सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. हस्तरेषा शास्त्रामध्ये हातावर असणाऱ्या रेषांना वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. आपण याविषयी सविस्तर माहिती यापूर्वी घेतली आहे. आज आपण शनी रेषा विषयी जाणून घेऊन आहोत.

ज्योतिष शास्त्रामध्ये हस्तरेषा शास्त्राला महत्त्व देण्यात आला आहे, तितकाच महत्व हस्तरेषा शास्त्रामध्ये शनी रेषेला देखील देण्यात आले आहे. हस्तरेषा शास्त्रामध्ये तळहातावर असणारी शनी रेषा मनुष्याचे आयुष्य, संपत्तीचा योग, यश, याविषयी सविस्तर माहिती देते. तळहातावर असणारी शनी रेषा मनुष्याचे एकूण आयुष्य कसे असेल, याविषयी सांगते. तळहातावर असणारी शनी रेषा जर शुभ असेल, तर अशा मनुष्याला जीवनात समाजाकडून खूप मान सन्मान मिळतो, असे देखील सांगितले आहे. आता आपण सर्व प्रथम शनी खुणांचा अर्थ समजून घेऊ.

शनि पर्वतावरील खुणांचा अर्थ

हस्तरेषा शास्त्रात शनि रेषाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. शनि रेषा आपल्या तळहातावर असणाऱ्या मधल्या म्हणजेच, सगळ्यात मोठ्या बोटाखाली असते. तुमच्या लक्षात येण्यासाठी खालील फोटो पाहा. तळहातावरील मोठ्या बोटाच्या खाली ही रेषा उंच गेलेली असेल, तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनती, इमानदार आहात असंही हस्तरेषा शास्त्रात सांगितले आहे. जर तुमची रेषा उंच गेली असेल, तर तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्यक्ती होता.

हस्तरेषा शास्त्रामध्ये जर शनि रेषा अत्यंत स्पष्ट आणि उंच विकसित झालेली असेल, तर त्या मनुष्याच्या आयुष्यात संपत्ती, वैभव, कीर्तीचा खूप मोठा योग असल्याचं सांगण्यात आलं आहे. शनी रेषा उत्तम असणाऱ्या व्यक्ती आयुष्यात खूप काही मिळवतात. मात्र अशा व्यक्तींच्या आयुष्यात वैवाहिक जीवनात खूप अडचणी येण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. शनि उत्तम असणाऱ्या व्यक्तींना कामामुळे आपल्या कुटुंबाला वेळ देखील देताना कसरत करावी लागते.

या व्यक्तीच्या आयुष्यात असतो त्रास

हस्तरेषा शास्त्रामध्ये तळहातावर असणाऱ्या शनि रेषा शुभ नसेल, म्हणजेच शनि रेषा क्रॉस तसेच बेटाचे चिन्ह पाहायला मिळत असेल, तर अशा मनुष्यांच्या आयुष्यात खूप त्रास असतो. असे मनुष्य आपले जीवन, हे अनेक गोष्टी शिवाय जगतात. प्रचंड मेहनत केली तरी देखील अशा मनुष्यांच्या आयुष्यात संपत्तीचा देखील योग फारसा येत नाही. ज्या मनुष्यांच्या हातावरील शनि रेषा शुभ नसेल, असे मनुष्य या त्रासातून स्वतःला वाचवू देखील शकतात. आपण ते देखील जाणून घेऊ

शनीच्या त्रासातून असे वाचवा स्वतःला

हस्त रेषा शास्त्रानुसार ज्या मनुष्याच्या हातावर असणाऱ्या शनी रेषेची स्थिती शुभ नसेल, अशा मनुष्यांनी शनीच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी शनि देवाचे उपवास करावेत. याबरोबरच शनिवारी शनि मंत्राचा जप देखील केल्याने तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. याबरोबरच शनी संबंधी असणाऱ्या वस्तूंचे दान करणे देखील उचित राहते. टीप: ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे याच्याशी महाराष्ट्र लोकशाही सहमत असण्याचे कारण नाही.

हे देखील वाचाWhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..

Hairstyle: हेअर स्टाईल वरून समजते मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव..

Health Tips: या तीन गोष्टी नियमित केल्यास आयुष्यभर लागणार नाही चष्मा; डोळ्याच्या आरोग्यासाठी या गोष्टी कराच..

मानसिक आरोग्य: डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने होतात हे परिणाम; वेळीच असे थांबवा अविचार अन्यथा..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.