Hairstyle: हेअर स्टाईल वरून समजते मुलींचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव..

Hairstyle: प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा जोडीदार प्रेमळ, सुंदर समजूतदार असावा असं वाटत असतं. माणूस प्रेमळ, समजूतदार आहे की नाही? हे समजण्यासाठी तुम्हाला त्याच्यासोबत काही वेळ स्पेंड करावा लागतो. मात्र अनेकदा असं होत जीवनाचा जोडीदार निवडताना एकमेकांना समजण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मुलांच्या किंवा मुलीचा संभाषावरून कपड्याच्या स्टाईलवरून, तिचा स्वभाव कसा असेल, हे समजतं, असं मोठी माणसे म्हणताना तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. याशिवाय मुलींचा स्वभाव, आवडी-निवडी काय आहेत, हे मुलींच्या हेअर स्टाईल वरून देखील अंदाज बांधता येतो. अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

आतापर्यंत तुम्ही हेअर स्टाईलवरून मुलगी स्टायलिश आहे की नाही, याचा अंदाज लावला असेल. मात्र हेअरस्टाईल वरून मुलीचा स्वभाव, पर्सनॅलिटी, आवडी निवडी काय आहेत, याचा देखील अंदाज लावता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दहा हेअर स्टाईल विषयी माहिती सांगणार आहोत, ज्यावरून मुलीचा स्वभाव पर्सनॅलिटी आणि आवडीनिवडी याचा अंदाज लावता येऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर.

डार्क काळ्या रंगाचे केस: मुली आपल्या सौंदर्याबाबत अधिक काळजी घेत असतात. अनेक मुलींचे सौंदर्य केसात लपलेलं असतं. हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या मुलींचे केस डार्क काळ्या रंगाचे असतात, अशा मुली नेहमी कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये मग्न असतात. अशा मुली वेगवेगळ्या गोष्टींचा नेहमी विचार करत असतात. अशा मुलींना कोणाशीही जास्त बोलणं आवडत नाही. त्या शांत स्वभावाच्या असतात.

लालसर रंगाचे केस: अलीकडच्या काळात मुली आपल्या केसाची अधिक काळजी घेताना दिसून येतात. ज्या मुलींना आपल्या केसाचा रंग नेहमी बदलावासा वाटतो, अशा मुली fun-loving, wild तसेच खूप बोल्ड स्वभावाच्या असतात. अशा मुली स्वतंत्र विचाराच्या असतात. अशा मुली जग काय म्हणेल, याकडे फारसे लक्ष देत नाहीत. अशा मुली स्वतःच आयुष्य आनंदाने जगण्याला महत्त्व देतात.

शॉर्ट हेअर असणाऱ्या मुली:

ज्या मुलींचे केस खूप कमी असतात, किंवा ज्या मुलींची हेअर स्टाईल खूप शॉर्ट केस असणारी असते, अशा मुली आत्मविश्वासाने खचून भरलेल्या असतात. अशा मुली खूप खेळकर आणि चपळ असतात. अशा मुलींमध्ये अधिक गांभीर्य असते. अशा मुलींना जगात कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. लांब केस असणाऱ्या मुली: ज्या मुलींना लांब केस ठेवायला आवडतं, अशा मुली कोणत्याही गोष्टींची चिंता करत नाहीत. अशा मुली बिंदासपणे जगणं पसंत करतात. लांब केस ठेवणाऱ्या मुलींचे वय जास्त असले, तरी त्या नेहमी तरुण दिसतात.

मधून भांग पाडणाऱ्या मुली: आपल्या केसाचा भांग हा ज्या मुली मधून पाडतात अशा मुली खूप शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागतात. मधून भांग पडणाऱ्या मुलींना आपल्या जबाबदारीची जाणीव असते. त्याचबरोबर आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये, असा देखील विचार या मुली नेहमी करतात. एकूणच सांगायचं झालं, तर अशा मुली सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात.

एका बाजूने भांग पाडणाऱ्या मुली: एका बाजूने भांग पाडणाऱ्या मुली ह्या इतर मुलींच्या तुलनेत अधिक दयाळू तसेच प्रेमळ असतात. या मुली आपल्या जवळच्या माणसांवर खूप प्रेम करतात. एका बाजूने भांग पाडणाऱ्या मुली कधीही कोणाचा द्वेष करत नाहीत. एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करतील, मात्र त्यामुळे स्वतःला त्रास करून घेत नाहीत.

कुरळे केस असणाऱ्या मुली

ज्या मुलींचे केस कुरळे असतात, अशा मुलींना अधिक राग येतो. कुरळे केस असणाऱ्या मुली कोणत्याही बाबतीत गांभीर्याने विचार करत नाहीत. कुरळे केस असणाऱ्या मुली नेहमी आपलं आयुष्य स्वतंत्र असावं, असा विचार करतात. अशा मुली आपली ज्या ठिकाणी किंमत केली जात नाही, त्या ठिकाणी जास्त काळ थांबत नाहीत. या मुली देखील fun-loving तसेच खूप wild आणि बोल्ड म्हणून ओळखल्या जातात. केसाला विविध रंग लावणाऱ्या मुली: आपली हेअर स्टाईल नेहमी बदलत राहणाऱ्या आणि डोक्यावरील केसांना वेगवेगळे कलर नेहमी ट्राय करणाऱ्या मुली ह्या अधिक मुक्त विचारांच्या असतात. अशा मुलींना नेहमी आव्हानात्मक आणि नवीन निर्णय घ्यायला अजिबात भीती वाटत नाही.

हे देखील वाचा Health Tips: या तीन गोष्टी नियमित केल्यास आयुष्यभर लागणार नाही चष्मा; डोळ्याच्या आरोग्यासाठी या गोष्टी कराच..

WhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..

मानसिक आरोग्य: डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने होतात हे परिणाम; वेळीच असे थांबवा अविचार अन्यथा..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.