Health Tips: या तीन गोष्टी नियमित केल्यास आयुष्यभर लागणार नाही चष्मा; डोळ्याच्या आरोग्यासाठी या गोष्टी कराच…

Health Tips: माणसाच्याच नव्हे तर कोणत्याही प्राण्यांच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग म्हणजे डोळे. डोळ्यांशिवाय हे सुंदर जग पाहता येऊ शकत नाही. डोळ्यांचे आरोग्य उत्तम असेल, तरच तुम्ही तुमच्या भावनाही जिवंत ठेवू शकता. आणि म्हणून डोळ्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. खासकरून आजच्या युगात. अलीकडे बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे डोळ्यांचा समस्या फार मोठ्या प्रमाणात जाणवताना पाहायला मिळतात. जर तुम्हाला देखील डोळ्यांच्या काही समस्या असतील, तर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्यासंदर्भात अशा तीन गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचे डोळे निरोगी ठेवू शकता.

धावपळ, वेळेवर निरोगी आहार न मिळणे, त्याचबरोबर लॅपटॉप, मोबाईलच्या स्क्रिनबरोबर अधिक वेळ घालवणे अशा अनेक सवयींमुळे आपण आपल्या डोळ्यांच्या आजारांना निमंत्रण देतो. आपल्या या वाईट सवयी आपली दृष्टी हिरावून घेऊ शकतात, याची जराही कल्पना आपल्याला नसते. मात्र या गोष्टींचा परिणाम आपल्या डोळ्यावर होऊ शकतो. मोबाईल, लॅपटॉप याबरोबरच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील आपली दृष्टी कमी होताना पाहायला मिळते. अगदी पाच-सहा वर्षाच्या मुलांना देखील चष्मा लागल्याचं आपण पाहिलं असेल.

पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे दृष्टी कमी  

शरीरामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांची कमतरता भासल्याने, लहान मुलांना देखील चष्मा लागतो. मात्र आपल्या आहारात काही पोषक पदार्थांचा समावेश करून आपण लहान मुलांचा चष्मा घालवू देखील शकतो. अनेकांना यावर विश्वास बसणार नाही, मात्र काही पदार्थांचा तुमच्या आहारात समाविष्ट करून तुमची दृष्टी वाढू शकते. काही वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या एका अभ्यासक्रमामध्ये दृष्टी कमी होण्याची कारणे देण्यात आली होती, यामध्ये शरिरामधील लोह, विटामिन सी, तांबे, विटामिन ई, त्याचबरोबर बीटा, कॅरोटीन यांसारखे पदार्थ कमी झाले असतील, तर डोळ्यांचे आजार उद्भवतात असं सांगण्यात आलं होतं.

आपल्या शरीराला पोषक तत्वांची कमतरता भासल्यास त्याचे परिणाम म्हणून, डोळ्याची समस्या उद्भवते. अनेक जण डोळ्यांच्या समस्या उद्भवल्यास चष्म्याचा वापर करतात‌. मात्र हा डोळ्यांच्या आजारावर पर्याय झाला. मुळासकट डोळ्यांच्या आजाराला नष्ट करायचं असेल, तर यासाठी आहारामध्ये ओमेगा३ फॅटी ऍसिड, ल्युटीन तसेच बीटा, झेक्सॅन्थिन, कॅरोटीन अशा पोषक जीवनसत्वांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. आता आपण हे घटक कोणकोणत्या पदार्थांमुळे मिळतात, याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊया.

रेड बेलपेपर

जर तुम्हाला डोळ्यांच्या काही समस्या असतील, किंवा नसतील तरी देखील तुमच्या आहारामध्ये तुम्ही लाल मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. लाल मिरचीमध्ये विटामिन-सी मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही लाल मिरचीचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या रक्तवाहिन्या व्यवस्थित काम करतात. याशिवाय नियमितपणे लाल मिरचीचे सेवन केल्याने भविष्यात मोतीबिंदूचा होणारा धोका देखील कमी होतो. लाल मिरची पासून आणि ई जीवनसत्व मिळते. साहजिकच हे डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असते. आणि म्हणून तुम्ही रोजच्या आहारात लाल मिरची खाणे आवश्यक आहे.

मासे आहेत उपयुक्त

डोळ्यांच्या दृष्टीसाठी ओमेगा३ हा घटक खूप उपयुक्त ठरतो. ओमेगा३ हा घटक माशाचे सेवन केल्याने मिळतो. कदाचीत तुम्हाला मासे खाण्याचे अनेक फायदे माहिती असतील. ज्याप्रमाणे मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्याचप्रमाणे मासे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टीदेखील चांगली होते. जर लहान मुलांना चष्मा लागला असेल, तर लहान मुलांसाठी मासे खूप उपयुक्त ठरतात. लहान मुलांना चष्मा लागण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांच्या शरीरामध्ये ओमेगा३ हा घटक खूप कमी असतो. आणि म्हणून त्यांच्या रोजच्या आहारात मासे देणे आवश्यक आहे.

गाजर

जर तुमच्या शरीरामध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए हे दोन घटक असतील, तर समजून जा तुमच्या डोळ्यांची दृष्टी खूप उत्तम आहे. हे दोन घटक जर तुमच्या शरीरात कमी असतील, तर तुम्ही लगेच मोठ्या प्रमाणात गाजराचे सेवन करणे आवश्यक आहे. गाजरामध्ये हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. गाजरामुळे डोळ्याची दृष्टी देखील सुधारते, शिवाय गाजर डोळ्यांबरोबरच त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरते.

हे देखील वाचा WhatsApp Update: आता तुम्ही चॅटिंग केलेला स्क्रीन शॉट कोणालाही काढता येणार नाही; व्हाट्सअप ग्रुपवर असूनही दिसणार नाही..

मानसिक आरोग्य: डोक्यात सतत येणाऱ्या अविचाराने होतात हे परिणाम; वेळीच असे थांबवा अविचार अन्यथा..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.