Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..

Ration Card: रेशन कार्ड हे प्रत्येक गरीबाचं जगण्याचं साधन आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून दर महिन्याला मिळणाऱ्या अन्नधान्यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत असल्याचे आपण पाहतो. याशिवाय रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून देखील महत्त्वाचं कागदपत्र आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा उपयोग होतो. त्यामुळे प्रत्येकाकडे रेशन कार्ड असणं फार आवश्यक आहे. आता आपण रेशन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा अर्ज करायचा? त्याचबरोबर नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

नवीन रेशनकार्ड बनवण्यासाठी आवश्यक पात्रता

नवीन शिधापत्रिका बनवण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. जर तुमचं वय18 पेक्षा कमी असेल, तर रेशन कार्डमधील कुटुंबप्रमुख तुमचं नाव समाविष्ट करू शकतो. त्याचबरोबर जर तुमचे वय 18 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी अर्ज देखील करू शकता. नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावे यापूर्वी रेशन कार्ड नसणे आवश्यक आहे. नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती आयकरदाता नाही पाहिजे. शस्त्र परवाना असेल, तरी देखील चालेल, मात्र एकापेक्षा जास्त नको. त्याचबरोबर चार चाकी कोणतीही गाडी, नसणे आवश्यक आहे. आता आपण नवीन रेशन कार्डसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे पाहू.

नवीन रेशनकार्डसाठी ही कागदपत्रे आवश्यक 

जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहे. यामध्ये तीन पासपोर्ट साईजचे फोटो उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्डमध्ये ज्या सदस्यांची नावे समाविष्ट करायची आहेत, अशा सर्वांच्या आधारकार्ड झेरॉक्स, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याचबरोबर मतदान ओळखपत्र, घरात एलपीजी गॅस असेल, तर त्याची देखील झेरॉक्स आवश्यक आहे, महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या जॉब कार्डची झेरॉक्स, इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आता आपण सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे पाहू.

असा करा ऑनलाईन अर्ज 

नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाइल मधील क्रोमेवर जाऊन mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाइट ओपन होईल, वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्ही “अप्लाय ऑनलाईन फॉर्म रेशन कार्ड” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. “अप्लाय ऑनलाईन फॉर्म रेशन कार्ड” पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला खाली विचारलेली सविस्तर माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्ही आवश्यक असणारी कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे. सविस्तर कागदपत्रांची माहिती दिल्यानंतर, तुम्हाला पाच ते 45 रुपये असे शुल्क भरावे लागणार आहे.

तुम्ही शुल्क भरल्यानंतर, संबंधीत यंत्रणांकडून फील्ड व्हेरिफिकेशन केलं जाईल, तुमचा अर्ज योग्य असेल, तर तुम्हाला रेशन कार्ड मिळेल. तुम्ही ऑनलाईन केलेल्या अर्जाची स्थिती देखील तपासू शकता. आपण ते देखील जाणून घेऊ. ऑनलाइन केलेल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ‘Citizen Corner’ या सेक्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही ‘Track Food Security Application’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इत्यादी प्रोसेस सविस्तर केल्यानंतर, तुम्ही तुमच्या ऑनलाईन केलेल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

आपण नवीन रेशन कार्डसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा हेही पाहू. 

नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला, अन्न विभागाच्या ऑफिसमधून, किंवा ऑनलाईन देखील तुम्ही अर्ज डाऊनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या गावातील रेशन दुकानावर देखील नवीन रेशन कार्ड मिळवण्यासंदर्भातला अर्ज मिळू शकतो. अर्ज मिळाल्यानंतर तुम्ही, तो अर्ज अचूक भरणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला अर्जदाराचे नाव, घरातील सर्व सदस्यांची नावे, सर्व सदस्यांचे आधार क्रमांक आणि अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटा, इत्यादी माहिती भरणं आवश्यक आहे.

अर्जाचा शेवटी अर्जदाराची सही देखील करणं आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर, या अर्जाला संबंधित सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही भरलेला अर्ज रेशन दुकानदार किंवा अन्नपुरवठा विभागात जमा करणं आवश्यक आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे तुम्ही आवर्जून पोचपावती तुमच्याजवळ ठेवणे आवश्यक आहे.

असे दिले जाते नवीन रेशन कार्ड

अन्नपुरवठा विभागामध्ये तुम्ही भरलेला अर्ज जमा केल्यानंतर, संबंधित अधिकारी त्या अर्जाची छाणनी करतात. छाणनी केल्यानंतर जर तुमचा अर्ज बरोबर आहे, हे सिद्ध झालं तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड दिलं जातं. रेशनकार्ड मिळाल्यानंतर, तुम्ही अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. सोबतच तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानातून रेशन मिळण्यास सुरुवात देखील होईल.

हे देखील वाचा Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..

Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर..

Voting card: मतदान यादीत नाव लावायचंय? असा करा घरबसल्या पाच मिनिटांत अर्ज; मतदान ओळखपत्रही मिळेल घरपोच..

Aadhar card update: लग्नानंतर बदललेलं नाव आधारकार्डवर अपडेट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

E Shram Card: केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये..

Astrological sign: मुलींसाठी या राशीचे लोकं असतात खूपच रॉयल; प्रत्येक गोष्ट ठेवतात हृदयात जपून..

Yuzvendra Chahal: श्रेयस अय्यरला डेट करत असल्याची चहलच्या पत्नीची कबुली; चहलही म्हणाला आज पासून नवीन आयुष्य..

Geological Survey of India Recruitment: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.