अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..

अतिक्रमण: अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवर अतिक्रण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. एखाद्या जमिनीचा मालकी हक्क दुसऱ्याच्या नावावर असताना देखील त्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रकार तुमच्या आसपास किंवा तुमच्या बाबतीत देखील घडले असतील. अनेकदा अतिक्रमण हे सामान्य माणसाच्या जमिनीवर केले जाते. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा गावठाणाच्या पडीक जमिनीवर देखील अनेक जण अतिक्रमण करतात. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा नातेवाईच अतिक्रण करताना पाहायला मिळतात. आता अशा अतिक्रमणला हटवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

जमिनीचा मालक दुसराच आणि अतिक्रमण तिसराच व्यक्ती करतो. फक्त अतिक्रमणच नाही, तर लगेच बांधकामाला देखील सुरुवात करतो. अशा वेळी मूळ मालकाबरोबरच शेजाऱ्यांना देखील धक्का बसतो. जमिनीच्या किंमती कमालीच्या वाढल्या असल्याने, ही क्रूरता आता अनेकांमध्ये आली आहे. आता आपण जमिनीवर केलेले अतिक्रमण कसे हटवायचे? याची योग्य पद्धत काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊ. मात्र त्या पूर्वी आपण अतिक्रमण म्हणजे काय? हे देखील जाणून घेऊ.

अतिक्रमण म्हणजे काय?

कोणत्याही प्रकारचे कायदेशीर खरेदी खत किंवा व्यवहार न करता जमीन मालकाची इच्छा नसताना देखील त्याच्या जमिनीवर ताबा सांगणे म्हणजेच, अतिक्रमण केले असे कायदेशीर भाषेत सांगितले जाते. अतिक्रमणचे अनेक प्रकार आहेत, यामध्ये आपल्या मालकीची जमीन असतानाही शेतात बांध पोकरणे, त्याचबरोबर दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीचा काही भागावर बांधकाम करणे, अशा काही गोष्टी करणे असे अनेक प्रकार आहेत.

ही आहेत अतिक्रमणाची कारणे

दुसऱ्याच्या मालकी हक्कावर आपला हक्क सांगणे, किंवा अतिक्रमण करण्याला काही करणे देखील आहेत. जर एखाद्या जमिनीचा मालक काही ठराविक काळासाठी बाहेर कामानिमित्त शहरात गेला तरी देखील मोठ्या प्रमाणात त्याच्या जमिनीवर ताबा मिळवण्याची प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर अलिकड्याच्या काळात सातत्याने जमिनीच्या किंमती वाढत चालल्या आहेत. यामुळे देखील अतिक्रमणचे प्रकार होत असल्याचे पाहायला मिळते. खासकरून कुटुंबाच्या जमिनींना वारस नसल्याने देखील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर गरीब कुटुंबाच्या बाबतीत देखील हे प्रकार घडल्याचं दिसून येते. आता आपण अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची असते? हे देखील सविस्तर जाणून घेऊ. 

अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची?

अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची असते याविषयी तुम्ही सविस्तर जाणून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकांचा असा समाज आहे, तहसीलदार कलेक्टर किंवा प्रांत हे अतिक्रमण काढण्याचं काम करतात. मात्र अतिक्रमण काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे नसते. हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्याची संपूर्ण जबाबदारी जमीन मालकाचीच असते. त्यालाच या संदर्भात पावले उचलावी लागतात. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. याबाबत माहिती नसल्यामुळे, अनेकदा सरकारी कार्यालयामध्ये अतिक्रमण हटवण्यासंदर्भात अर्ज करण्याचे काम केले जाते. साहजिकच यामध्ये वेळ पैसा त्याचबरोबर मानसिकता देखील मोठ्या प्रमाणात खर्च होते. आता आपण अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया देखील जाणून घेऊ.  

काय आहे अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया?

तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालं असेल, तर प्रथम जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करणे आवश्यक आहे. पोलीस यासंदर्भात लगेच कारवाई करतील, असं अजिबात होत नाही. कारण जमिनीवर अतिक्रमण ही गोष्ट दिवाणी प्रकारची आहे. यासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसतात. जमिनीवर झालेल्या अतिक्रमणावर जर तुम्हाला न्याय हवा असेल, तर तुम्हाला दिवाणी न्यायालयातच या प्रकरणाचा खटला दाखल करावा लागतो. परंतु पोलीस स्टेशनमध्ये केलेली तक्रार न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येते. हा एक तुमच्या सोबत असणारा चांगला पुरावा आहे.

तुमच्या जमिनीचे जर तुम्ही मूळ मालक असाल, तर ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं. यासाठी तुम्हाला जमिनीचे कागदपत्र, जमीन मोजणीचा असणारा नकाशा, इत्यादी संबंधित कागदपत्रे दिवाणी न्यायालयात सादर करून तुम्ही अतिक्रमण संदर्भात न्याय मागू शकता. तुमच्या म्हणण्यानुसार, न्यायालय एक ‘कोर्ट कमिशन’ नेमतं. आणि या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या जमिनीची मोजणी करण्याचे काम होते. नंतर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे की नाही हे स्पष्ट होते, आणि तुम्हाला न्याय मिळतो. अतिक्रमण थांबवण्यासाठी काही उपाययोजना केला जाऊ शकतात, तेही पाहू. 

अतिक्रमण टाळण्यासाठी करा या उपाय योजना

तुम्ही कामानिमित्त बाहेर शहरात गेल्यानंतर, तुमच्या जमिनीची देखरेख तुम्ही गावातील एखाद्या विश्वासू किंवा सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींकडे देऊ शकता. त्याचबरोबर जमिनीच्या देखरेखीसाठी तुम्ही जमीन भाडेतत्त्वावर देखील देऊ शकता. मात्र भाडे करू नेमायचा झाल्यास तुम्ही याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये वेरिफिकेशन करणे आवश्यक ठरते. तुमच्या जमिनीच्या चारही बाजूने तुम्ही जाळी देखील लावू शकता. त्याचबरोबर तुमच्या जमिनी संदर्भात सातत्याने माहिती घेत राहणं, हा देखील अतिक्रमण टाळण्यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो.

हे देखील वाचा Yuzvendra Chahal: श्रेयस अय्यरला डेट करत असल्याची चहलच्या पत्नीची कबुली; चहलही म्हणाला आज पासून नवीन आयुष्य..

Second Hand Bike: १५ आणि २२ हजारांत विकली जातेय Bajaj Pulsar; जाणून घ्या कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Health Tips: डेंग्यूचा डास फक्त याच लोकांना चावतो; डेंगू पासून दुर राहायचं असेल तर करा हे काम..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.