Health Tips: डेंग्यूचा डास फक्त याच लोकांना चावतो; डेंगू पासून दुर राहायचं असेल तर करा हे काम..

Health Tips: पावसाळा सुरू झाल्यानंतर, अनेक आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. इतर ऋतूपेक्षा पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यामध्ये रोगराई पसरते, जिवाणूंना वावरण्यासाठी पोषक वातावरण पावसाळ्यामध्ये निर्माण होते. शिवाय पावसाळ्यामध्ये पचन व्यवस्था देखील व्यवस्थित राहत नसल्याने, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि म्हणून इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात आजारी पडण्याचा प्रमाण अधिक असते.

पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूत जरी आपण आजारी पडलो, तरी फारशी चिंता करण्याची गरज नसते. मात्र पावसाळ्यामध्ये तुम्हाला आजारी पडल्यानंतर, विशेष काळजी घ्यावी लागते. रक्त लघवी चेक करून तुम्हाला डेंग्यू सारख्या आजारांचा लक्षण तर नाही ना, हे देखील चेक करावं लागतं. कारण पावसाळ्यामध्ये डेंग्यूचे डास मोठ्या प्रमाणात तयार होतात. डेंग्यूच्या डासापासून आपण काळजी घेतली नाही, तर डेंग्यूची लागण होऊ शकते. मात्र हे जरी खरं असलं, तरी डेंगू फक्त काही विशेष लोकांनाच आपली शिकार बनवतात. हे तुम्हाला माहीत आहे. का?

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र डेंग्यू फक्त ठराविक लोकांनाच चावतात. त्याचबरोबर डेंग्यूचा डास चावला तरी देखील काहींना डेंग्यू होत नाही? या सगळ्याचा नक्की काय संबंध आहे? डेंग्यूचा डास चावला तरी डेंग्यू न होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? आज आपण या लेखात या संदर्भातच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण डेंग्यूचा डास आपली शिकार कोणत्या प्रकारच्या लोकांना बनवतो, हे पाहू.

या लोकांकडे डेंग्यूचा डास होतो आकर्षित

जसं प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असते, तसेच डासाच्या बाबतीत देखील आहे. डासाला देखील आपली चव माहित असते. आणि आपल्या चवीनुसार डास आपला चावा घेतात. वैद्यकीय शास्त्राच्या अहवालानुसार, ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप हा ‘ओ’ असतो, अशा व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होतात. त्यानंतर ‘ए’ रक्तगट नंतर ‘बी’ आणि ‘एबी’ अशाप्रकारे डासांचा चावा घेण्याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो. ज्या व्यक्तींचा रक्तगट ‘ओ’ आहे, अशा व्यक्तींना डास चावला, तरी देखील डेंग्यू होण्याची शक्यता फार कमी असते. आता आपण डेंग्यूचा डास चावला तरीदेखील डेंगू होऊ नये, यासाठी काय करणे आवश्यक आहे? हे सविस्तर जाणून घेऊ.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ

कोणत्याही आजाराचा सामना करायचा असेल, तर आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणे आवश्यक असतं. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर तुम्ही अनेक आजारांवर सहज मात करू शकता. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या आहारात आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन नियमित करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात खास करून मांसाहारी जेवण टाळणं गरजेचं आहे आपल्याला पचेल असं जेवण आणि पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यामध्ये हवेत आद्रता मोठ्या प्रमाणात असते. आणि म्हणून या काळात अन्न पचण्यास वेळ लागतो. आता आपण रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे कोणकोणते पदार्थ आहेत हे देखील जाणून घेऊ.

पालक

डेंगू पासून बचाव करायचा असेल, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती पालक या पालेभाजीमधून खूप मोठ्या प्रमाणात मिळते. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट लोह त्याचबरोबर बीटा कॅरोटीन असते. हे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवते. यामुळे तुम्हीला जरी डेंग्यूचा डास चावला तरी देखील लगेच डेंग्यू होत नाही.

नट्स

प्रतिकार वाढवण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारामध्ये बदाम, काजू, ओट्स, शेंगदाणा गुळाचे लाडू इत्यादी प्रकारचे नट्स समाविष्ट करणे आवश्यक आहे. नट्स खाल्ल्याने तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय तुम्हाला पचनाचा देखील त्रास जाणवत नाही. लसूण आणि आले: लसूण आणि आले देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. लसणामध्ये अँटीव्हायरस गुणधर्म असल्याने आपल्या शहराचे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. लसूण आणि आले कोणत्याही वायरल इन्फेक्शन पासून आपला बचाव करतात.

मध आणि फ्लॉवर

मध आणि फ्लॉवर हे दोन पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. फ्लॉवरमध्ये असणारे घटक रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करतात. आठवड्यातून किमान दोन वेळा फ्लॉवरची भाजी करणे खूप आवश्यक आहे. वरील सर्व उपाययोजना तुम्ही व्यवस्थितरीत्या केल्या, तर तुम्हाला या पावसाळ्यात डेंग्यू त्याचबरोबर इतर आजार देखील होणार नाहीत.

हे देखील वाचाHealth Tips: केळाचं नियमित सेवन केल्याने शरीरावर होतात हे पाच महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे तोटे..

Health Tips: हे चार घरगुती उपाय केल्यास मानेवरचा काळसरपणा क्षणात होता दूर..

Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..

Second Hand Bike: १५ आणि २२ हजारांत विकली जातेय Bajaj Pulsar; जाणून घ्या कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने या चिमुकल्या बेस्ट फ्रेंड सोबत वाढदिवस केला साजरा; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Bank of india recruitment: 8 वी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..

Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.