Hardik Pandya: हार्दिक पांड्याने ‘या’ चिमुकल्या ‘बेस्ट फ्रेंड’ सोबत वाढदिवस केला साजरा; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

भारताचा स्टार खेळाडू आणि ‘ऑल राऊंडर’ हार्दिक पांड्याने आपला 28 वा वाढदिवस काल सोमवारी साजरा केला. वाढदिवस साजरा करताना हार्दिक पांड्याने,माझ्या आयुष्यातील नवीन वर्ष मी माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत साजरं करत असल्याचं म्हटलं. सोबत त्याने आपल्या ‘बेस्ट फ्रेंड’ बरोबचा फोटो ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. हार्दिक पांड्याचा चिमुकला बेस्ट फ्रेंड पाहून,अनेकांनी हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोला क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स बरोबरच’हार्दिक पांड्या’चा देखील या आयपीएलमध्ये खराब परफॉर्मन्स क्रिकेट चाहत्यांना पाहिला मिळाला. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा विषय असल्याचे बोललं जात आहे. पाठीच्या दुखापतीनंतर हार्दिक पांड्याने गोलंदाजी करण्याचं टाळल्याने त्याचे फक्त फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान बनते का? असा सवाल अनेकांनी उठवला असून सध्या याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे.

हार्दिक पांड्याच्या फॉर्म विषयी भारतीय क्रिकेट तसेच चाहते देखील चिंतेत आहेत. दुबईमध्ये होणाऱ्या t20 वर्ल्ड कप संघात हार्दिक पांड्याची निवड झाली आहे. मात्र त्याची दुखापत आणि खराब फॉर्म लक्षात घेता, भारतीय क्रिकेटने त्याचा ‘बॅकअप’ खेळाडू म्हणून ‘वेंकटेश अय्यर’ची रिझर्व्ह म्हणून निवड केली असल्याची माहिती आहे.

खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला भारतीय संघातून वगळले जाऊ शकते. अशा बातम्या देखील काल अनेक माध्यमात झळकल्याचे पाहायला मिळाले होते. एवढं सगळं होत असलं तरी मात्र, हार्दिक पांड्या आपल्या खाजगी आयुष्यात कमालीचा खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. काल त्याने आयुष्यातला 28 वा वाढदिवस आपल्या चिमुकल्या बेस्ट फ्रेंड सोबत साजरा केला. आता हा बेस्ट फ्रेंड नेमका कोण आहे? याची उत्सुकता तुम्हाला देखील असेल बरोबर ना? तर हा बेस्ट फ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून नकाशा आणि त्याचा मुलगा ‘अगस्त्य’ आहे.

हार्दिक पांड्याने त्याचा वाढदिवस आपल्या मुलासोबत साजरा करत आयुष्यातील नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. मुलगा ‘अगस्त्य’ सोबतचा एक फोटो शेअर करत त्याने म्हटले आहे, माझ्या आयुष्यातील नवीन वर्षाची सुरुवात मी माझ्या ‘बेस्ट फ्रेंड’ सोबत करीत आहे. वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद,असं देखील त्याने आपल्या शुभचिंतकांना म्हटलं आहे.

१ जानेवारीला हार्दिक पांड्याने ‘नताशा’सोबत एंगेजमेंट केली. दुबईमध्ये त्याने एका क्रुजमध्ये नताशाला प्रपोज करतानाचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या दोघांनी ३० जुलै २०२० ला एका गोंडस मुलाला जन्म दिला. या मुलाचं नाव अगस्त्य असं ठेवण्यात आलं आहे. हार्दिक पांड्या आपल्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असतो.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.