Health Tips: हे चार घरगुती उपाय केल्यास मानेवरचा काळसरपणा क्षणात होता दूर..

0

Health Tips: तुमच्या नीटनेटकेपणाचा थेट संबंध तुमच्या कॉन्फिडन्सशी जोडलेला आहे. जर तुम्ही नीटनेटके राहत नसाल, तर समोरच्या व्यक्तीचे तुमच्यावर परिणाम होतात. फक्त समोरच्या व्यक्तीचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलत नाही, तर तुम्ही स्वतः तुमचा कॉन्फिडन्स देखील गमावता. आणि म्हणून नेहमी तुम्ही शरीराबाबत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकांचे चेहऱ्याच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष असतं. मात्र चेहऱ्याखालील मानेकडे मात्र अनेक जण दुर्लक्ष करतात. आणि मानेवर काळेपणा येतो. जर तुमच्याही मानेवर काळेपण असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

कोणतीही व्यक्ती प्रथमतः चेहराकडेच पाहत असते. साहजिकच चेहऱ्याचे सौंदर्य अनेकांना प्रसन्न करण्याचं काम करत असतं. तुमच्या चेहऱ्यावरचे तेज, हसरा चेहरा अनेकांचे मन जिंकू शकतो. हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र त्याच वेळी समोरच्याची नजर तुमच्या काळेपणा असणाऱ्या मानेकडे गेल्यानंतर समोरच्याची निराशा होऊ शकते. अनेकदा समोरच्याला तुमच्या मानेवर खूप मळ साचलेला आहे असे देखील वाटू शकतं. याचाच अर्थ तुम्ही व्यवस्थित अंघोळ करत नाही असा अनेकांचा समज होतो. आणि म्हणून मानेची तुम्ही काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जर तुमच्याही मानेवर काळेपणा असेल, तुम्ही तो काही घरगुती उपाय योजना करून घालवू शकता. जाणून घेऊया सविस्तर.

लिंबाचा गुलाब पाणी मिसळून

काही घरगुती उपाययोजना करून तुम्ही मानेवर असणार काळेपणा कायमचा दूर करू शकता. मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त ठरते. एका लिंबाच्या रसामध्ये तुम्ही गुलाब पाणी मिसळा. ते मिश्रण तुम्ही रात्री झोपताना मानेवर व्यवस्थितरित्या लावून झोपा. लिंबू आणि गुलाब पाण्यात अनेक उपयुक्त घटक असल्याने मानेवर असणारा काळसरपणा दूर होण्यास मदत होते. साधारणता हे मिश्रण तुम्ही चार-पाच वेळा लावल्यानंतर मानेवर असणारा संपूर्ण काळसरपणा दूर होतो आणि तुमची त्वचा अधिक बहरते.

मध आणि लिंबू

मधाचे आणि लिंबाचे मिश्रण देखील मानेच्या काळसरपणाला दूर करण्यास मदत होते. एका लिंबाच्या रसामध्ये तुम्ही एक चमचा मधाचे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही मानेची मसाज करा. मानेची मसाज केल्यानंतर तुम्ही या दोन्ही मिश्रणाचा लेप अर्धा तास मानेवर तसाच ठेवायचा आहे. अर्ध्या तासानंतर मान धुवल्यानंतर तुमच्या मनावर असणारा काळसरपणा दूर झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. जर एका वेळेस माने सकाळ सरपणा दूर झाले नाही, तर तुम्ही हे मिश्रण दोन-तीन वेळा लावलं तरी देखील चालू शकतं.

हळकुंड बारीक करून..

मानेचा काळसरपणा दूर करण्यासाठी हळकुंड बारीक करून त्याची पावडर करून घेणे आवश्यक आहे. पावडर केल्यानंतर, तुम्ही या पावडरमध्ये एका लिंबाचा रस मिसळायचा आहे. या दोन्हींची व्यवस्थित पेस्ट करून तुम्ही मानेवर पंधरा ते वीस मिनिट लावून ठेवायची आहे. पंधरा मिनिटाने हा लेप तुम्ही व्यवस्थित धुवू शकता. हे मिश्रण तुम्ही चार ते पाच वेळा लावल्यानंतर मानेवरचा सर्व काळेपणा मुळासकट नष्ट होतो.

टोमॅटो: एका वाटीमध्ये तुम्ही टोमॅटोचा रस घ्या टोमॅटोच्या रसामध्ये तुम्ही ओट्स मिसळून दोन्हींचे मिश्रण व्यवस्थित करून घ्या. या दोन्हींचे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर, स्क्रब तयार होईल हे स्क्रब तुम्ही काळसर मानेवर व्यवस्थित लावून घ्या. काही वेळानंतर धुवा काळसर पणा दूर होईल.

काकडी; मानेचा काळसरपणा दूर करण्यासाठी काकडी देखील खूप उपयुक्त ठरते. मानेचा काळसरपणा दूर करण्यासाठी काकडीचा बारीक किस करून तुम्ही यामध्ये गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण तुम्ही मानेवर लावून घ्या, आणि अर्ध्या तासानंतर धुवा. हे मिश्रण तुम्ही चार-पाच वेळा लावल्यानंतर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आलेला पाहायला मिळेल.

हे देखील वाचा Second Hand Bike: १५ आणि २२ हजारांत विकली जातेय Bajaj Pulsar; जाणून घ्या कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Hardik Pandya: या बॉलिवुड अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगमुळे पांद्याच्या वैवाहिक जीवनात भूकंप; असा झाला खुलासा..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.