Eye Care Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी 20-20-20 फॉर्म्युला लागलीच फॉलो करा; होय अन्यथा येईल अंधत्व..

0

Eye Care Tips : डोळे (eye) हा आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. अलीकडे मोबाईल, कॉम्प्युटरच्या वापरामुळे डोळ्यांच्या खूप मोठ्या समस्या उद्भवताना पाहायला मिळतात. अनेकांच्या लक्षात देखील येत नाही, आपण अनेक तास स्क्रीन पाहत बसलो आहोत. तुमच्या या सवयीमुळे दृष्टी हळूहळू कमी होत जाते. एक दिवस अंधत्व येण्याची देखील शक्यता असते. असं असलं तरी याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाहीत. जर तुम्हाला देखील दीर्घकाळ डोळे निरोगी (eye health) ठेवायचे असतील, तर तुम्हाला 20-20-20 हा फॉर्मुला (20-20-20 formula) माहिती असणे, आणि तो फॉलो करणे फार आवश्यक आहे.

काय आहे 20-20-20 फॉर्मुला

सर्वप्रथम आपण 20-20-20 फॉर्मुला काय आहे हे समजून घेऊ. जर तुम्ही कधी डोळे चेकिंग करायला गेला असाल, तर तुम्हाला या फॉर्मुल्याची नक्की माहिती असेल. 20-20-20 म्हणजे, मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीन तुम्ही पाहत असाल, तर दर 20 मिनिटानंतर तुम्ही 20 सेकंद 20 फूट दूर अंतर पाहायला हवं. यालाच 20-20-20 फॉर्मुला म्हंटले जाते. या फॉर्मुल्याचा तुम्ही नियमितपणे वापर केल्यास, तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो. जाणून घेऊया डोळ्यांच्या अरमासाठी आणखी काय उपाययोजना करणे आवश्यक आहेत..

डोळ्यावर ताण येत असेल, तर तो केवळ डोळ्यांवर मर्यादित राहत नाही. डोळ्यांमुळे तुम्हाला डोखेदुखी, लक्ष केंद्रित करण्यास अडचण, डोळ्यांवर ताण येत असेल तर मान देखील दुखली जाते. जर तुम्ही कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नसाल, लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचण येत असेल, तर तुमच्या डोळ्यांवर ताण येत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील, तर दर 20 मिनिटांनंतर मोबाईल, कॉम्प्युटर स्क्रीन पासून तुम्ही किमान एक मिनिटाचा ब्रेक घेणे आवश्यक आहे. याशिवाय एका मिनिटांमध्ये तुम्ही किमान 30 वेळा तुमचे डोळे चमकवणे देखील आवश्यक आहे. तुमच्या या नियमित क्रियाशीलतेमुळे डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. डोळे नेहमी ओलसर राहणे आवश्यक आहेत. डोळे कोरडे पडले आहेत, असं वाटल्यास तुम्ही डोळ्यांवर पाणी देखील मारू शकता.

हायड्रेशनसाठी दिवसभरातून भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. डोळे जळजळ करत असतील, तर काकडी किसून काकडीचा लेप डोळ्यांवर नियमितपणे लावणे देखील आवश्यक आहे. कापसावर गुलाल जल लावून तुम्ही डोळ्यांवर देखील कापूस ठेवून जळजळ दूर करू शकता. अजूनपर्यंत जर तुम्हाला डोळ्यांची कोणतीही समस्या नसेल, तरीदेखील तुम्ही 20-20-20 हा फॉर्म्युला अमलात आणणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला डोळ्यांच्या समस्यांचा सामना हमखास करावा लागू शकतो.

हे देखील वाचा Virat Kohli Son Citizenship : विराट कोहलीचा मुलगा अकाय कोहली होणार इंग्लंडचा नागरिक? हा आहे इंग्लंडच्या नागरिकत्वचा नियम..

Love tips : मुलगी तुमच्यावर फिदा असल्यावर देते हे चार इशारे..

Ishan Kishan Shreyas Iyer : BCCI ने श्रेयस अय्यर ईशान, किशनला करारातून वगळले; एक वर्ष संधीही नाही, निर्णयाची अंमलबजावणी बाकी..

Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.