Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

0

Shreyas Iyer vs BCCI : बीसीसीआय (BCCI) आणि नवीन खेळाडूंमध्ये वाद होतानाच्या घटना वारंवार पुढे येत आहेत. ईशान किशन नंतर आता श्रेयस अय्यर आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. खराब फॉर्ममुळे श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) इंग्लंड विरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यातून डच्चू देण्यात आला आला. इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरल्यानंतर, त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळतात. संघातून वगळल्यानंतर अगदी फॉर्ममध्ये परतण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळून अनेक खेळाडू स्वतःला सिद्ध करतात. अगदी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील आपल्या कारकिर्दीच्या अखेर पर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.

अलीकडे मात्र नवीन खेळाडू देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकतेच एक पत्रक जारी करून देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. एकीकडे बीसीसीआयने पत्रक जारी केलं असलं तरी दुसरीकडे मात्र खेळाडू याला फारसं महत्त्व देताना दिसत नाहीत. ईशान किशन (ishsn kishan) नंतर श्रेयस अय्यरने देखील एकप्रकारे BCCI ची खिल्ली उडवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.

उद्यापासून मुंबई आणि बडोदा (mumbai vs badoda) यांच्यामध्ये रणजी ट्रॉफीचा ranji trophy) क्वार्टर फायनल सामना खेळण्यात येणार आहे. रणजीचा हा सामना खेळण्याचा सल्ला बीसीसीआयने श्रेयस अय्यरला दिला होता. मात्र श्रेयस अय्यरने कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे कारण दिले. आणि या सामन्याकडे आणि BCCI सचिव (BCCI Secretary) जय शहा (jay shah) यांनी काढलेल्या पत्रकाचा देखील अपमान केला. श्रेयस अय्यरला कुठलीही दुखापत नसल्याचा रिपोर्ट नॅशनल क्रिकेट अकादमीने (NCA) बीसीसीआय दिला आहे.

श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असल्याचा रिपोर्ट नॅशनल क्रिकेट अकादमीने बीसीसीआयला दिल्याने श्रेयस अय्यर उघडा पडला आहे. ईशान किशन नंतर श्रेयस अय्यरने देखील थेट BCCI शी पंगा घेतला आहे. श्रेयस अय्यरने बीसीसीआयशी घेतलेला पंगा आता त्याला महागात पडणार असल्याचं बोललं जात आहे. ईशान किशनला रणजी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केलं. ईशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईचा भाग म्हणून तो भारतीय संघापासून सध्या दूर आहे. श्रेयस अय्यरला देखील आता याच कारवाईचा सामना करावा लागणार आहे.

हे देखील वाचा  IND vs ENG 4th test in Ranchi : रोहित शर्माला नाईलाजाने करावे लागणार संघात दोन बदल; असा असेल चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

IND vs ENG Ranchi test: रांचीच्या खेळपट्टीमुळे भारताची उडाली भांबेरी; इंग्लंडचा तगडा प्लॅन समोर, जाऊन घ्या उद्या होणाऱ्या चौथ्या कसोटीची स्थिती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.