Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

0

Ishan Kishan vs BCCI : ईशान किशन (ishan Kishan) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर, ईशान किशन आणि BCCI यांच्या मधील वादाला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून ईशान किशनने मानसिक थकव्याचे कारण देत माघार घेतली. तेव्हापासून ईशान किशन भारतीय संघातून बाहेर आहे. भारतीय संघाचे कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) ईशान किशनला रणजी खेळण्याचे आवाहन केले होते. मात्र द्रविडचे हे आवाहन ईशान किशनने धुडकावून लावले. आता ईशानने थेट बीसीसीआय सचिव जय शहा (jay shah) यांना देखील आव्हान दिले आहे.

दोन दिवसापूर्वी BCCI चे सचिव जय शहा यांनी नवीन खेळाडूंसाठी एक पत्र काढले. या पत्रामध्ये त्यांनी आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना एक प्रकारे सुनावलं. पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना जय शहा म्हणाले, नवीन खेळाडूंना मी आवाहन करतो, देशांतर्गत क्रिकेटकडे खेळाडूंनी लक्ष द्यावे.

देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करून आयपीएलला (IPL) प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना मी सांगू इच्छितो, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच भारतीय संघात संधी देणे हा आमचा प्राधान्यक्रम असणार आहे. आयपीएल हा निवडीचा सर्वोच्च बिंदू नसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जय शहा (jay Shah) यांच्या या भूमिकेनंतर आता ईशान किशनने (Ishan Kishan) देखील प्रतिउत्तर दिले आहे.

अहवालानुसार, इशान किशनने भारतीय टीम मॅनेजमेंटच्या थिंक टँक वरिष्ठ अधिकाऱ्याला रणजी क्रिकेट खेळण्यासंदर्भात माहिती दिली आहे. ईशान किशन म्हणाला, सध्या मी बॅटिंगच्या अनेक तांत्रिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे. मी माझ्या टेक्निकमध्ये आणखीन सुधारणा करू इच्छित असल्याने, मी रणजी क्रिकेट खेळू शकत नाही. सध्या मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार नसल्याचे मला वाटते. मी सध्या टी-ट्वेंटी क्रिकेटची तयारी करण्याच्या दृष्टीने सराव करत असल्याचंही तो म्हणाला आहे.

आगामी डी वाय टी-20 स्पर्धेमध्ये देखील ईशान किशन भाग घेणार असल्याची माहिती आहे. एकप्रकारे ईशान किशनने देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेटकडे आपण गांभीर्याने पाहत नसल्याचा इशारा देखील जय शहा यांना दिल्याचे बोलले जात आहे. आपण कसोटी क्रिकेटला गांभीर्याने पाहत नाही, हेच ईशान किशन दर्शवले असेही बोललं जात आहे. साहजिक त्यामुळे भारतीय संघात ईशान किशनच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आणखी लांबीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा  IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

Jay Shah on Ishan Kishan: पत्र लिहून ईशान किशनला खडसावत जय शाहने दिली शेवटची वॉर्निंग; म्हणाले..

Haldi Ceremony : म्हणून लग्नापूर्वी वधू-वराला लावतात हळद; लग्न करण्यापूर्वी हळदीचे हे रहस्य माहिती असायलाच हवं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.