Haldi Ceremony : म्हणून लग्नापूर्वी वधू-वराला लावतात हळद; लग्न करण्यापूर्वी हळदीचे हे रहस्य माहिती असायलाच हवं..

0

Haldi Ceremony : लग्न (marriage) हा माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. प्रत्येकाने आपापल्या लग्नाची कल्पना केलेली असते. भारतीय संस्कृतीमध्ये लग्न करताना अनेक विधी केल्या जातात. लग्न करणार प्रत्येक जण या विधी मधून जातो. मात्र प्रत्येकाला विधीचे महत्त्व आणि विधी नेमके का केले जातात? याविषयी पुरेशी माहिती नसते. लग्नापूर्वी हळद लावली जाते, हे प्रत्येकाला माहिती आहे. मात्र हळद नेमकी का लावली जाते? याविषयी अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊया, लग्न करण्यापूर्वी वधू आणि वराला हळद का लावली जाते.

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. असं म्हटलं जातं लग्नानंतर आयुष्याची नवी इनिंग सुरू होते. लग्न हा प्रचंड आनंददायी सोहळा असल्याने, घरातील मंडळी नातेवाईक खूप मोठ्या प्रमाणात आनंदी असतात. लग्न करताना लग्नामध्ये कोणतीही बाधा येऊ नये, याची खबरदारी अनेक जण घेतात. लग्नाचे विधी देखील पारंपारिक आणि शास्त्रानुसार पार पडतात की नाही हे तपासण्यासाठी देखील अनेक जणांची नेमणूक केली जाते. लग्नापूर्वी वधू-वराला हळद लावून आंघोळ घालणे , हा देखील खूप महत्त्वाचा विधी मानला जातो.

लग्नापूर्वी हळद लावून आंघोळ घालणं हा खूप महत्त्वाचा विधी असला तरी अनेकांना याविषयी माहिती नसल्याचं पाहायला मिळते. खरंतर लग्नापूर्वी हळद लावून आंघोळ करण्याला दोन कारणे आहेत. एक शास्त्रीय कारण आहे, आणि एक धार्मिक कारण देखील आहे. लग्नापूर्वी हळद लावून का अंघोळ करतात? हे जर तुम्हालाही माहिती नसेल, तर वाचा सविस्तर.

हळद प्रचंड गुणकारी आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. चेहरा उजळवण्यासाठी हळदीचा वापर करणाऱ्यांचीही संख्या पुष्कळ प्रमाणात आहे. हळद केवळ चेहऱ्याला लावली जात नाही, तर दुधामध्ये हळद टाकून दूध देखील प्यायले जाते. दुधात हळद टाकल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. लग्नापूर्वी प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार दिसायचं असतं. लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावल्याने चेहरा उजळला जातो, असंही बोललं जातं. म्हणून देखील चेहऱ्याला हळद लावली जाते.

चेहरा सुंदर दिसावा यासाठी, लग्नापूर्वी हळद लावली जाते. हे धार्मिक आणि रूढी परंपरेनुसार चालत आलेले कारण असलं तरी शरीराला हळद लावण्याचे शास्त्रीय कारण देखील आहे. लग्नापूर्वी वधू- वराला आरोग्याची कोणतीही समस्या उद्भवू नये, याची देखील काळजी घेतली जाते. शरीराला हळद लावल्याने शरीरावर असणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. म्हणून देखील लग्नापूर्वी वधू-वरांना हळद लावली जाते.

हे देखील वाचा ENG vs IND 3rd test : 445 धावा करूनही इंग्लंड ड्रायव्हिंग सीटवर; ..तर सामना वाचवणं भारतासाठी अवघड..

Manoj jarange Maratha Reservation : मुंबईत जाऊन गुलाल उधळला, मग आता उपोषण का करतायत जरांगे पाटील? वाचा सविस्तर..

Virat Kohli T20 World Cup : विराट कोहली सोबत षडयंत्र? रोहित T20 संघात; मग विराट कोहली का नाही..

Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.