Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

0

Rohit Sharma T20 World Cup captain: गेल्या दोन वर्षापासून टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असेल, याविषयी मोठ्या प्रमाणात संभ्रमता होती. 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या सुमार कामगिरीचा फटका रोहित शर्माला (rohit sharma) बसला. 2022 नंतर खेळल्या गेलेल्या अनेक t20 मालिकांमधून रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat kohli) केएल राहुल (kl Rahul) यांना वगळण्यात आले. आणि हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) t20 संघाच्या कर्णधार पदाची धुरा देण्यात आली. आता मात्र पुन्हा एकदा यावर्षी होणाऱ्या t20 विश्वचषक संघाचा रोहित शर्मा कर्णधार असणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (jay shah) यांनी काल एका कार्यक्रमामध्ये आगामी t20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार असल्याचे जाहीर केले. वेस्टइंडीजमध्ये होणाऱ्या t20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याचे जय शहा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, अनेकांना मी टी-ट्वेंटी वर्ल्डकप विषय का बोलत नाही, असा प्रश्न पडला होता. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो, रोहित शर्मा वेस्टइंडीजमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असेल.

पुढे बोलताना जय शहा म्हणाले, 2023 मध्ये भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलं नसलं तरी लागोपाठ दहा सामने भारतीय संघाने जिंकण्याचा कारणामा केला. वर्ल्डकप जिंकला नसला तरी अनेकांची मन जिंकण्यात भारतीय संघाला यश आलं. त्यामुळे रोहित शर्मा हाच टी ट्वेंटी विश्वचषक संघाचा कर्णधार असेल असेही ते म्हणाले. जय शहा यांना विराट कोहली संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला.

बीबीसीआयचे सचिव (BCCI Secretary) जय शहा (jay shah) यांनी आगामी टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याचं स्पष्ट केले. जय शहा यांच्या या घोषणेनंतर विराट कोहलीवर देखील प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहली भारतीय टी ट्वेंटी विश्वचषक संघात खेळताना दिसेल का? असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जय शहा म्हणाले, विराट कोहलीवर निर्णय झालेला नाही. विराट खेळणार की नाही, हे संघ निवडी वेळी ठरविण्यात येईल.

टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने दमदार खेळ केला आहे. अनेक महत्वाचे आणि नॉक आउट सामने विराट कोहलीने एकहाती जिंकून दिले आहेत. मात्र तरी देखील विराट कोहली टी ट्वेंटी विश्वचषक संघात खेळणार की नाही याविषयी, अद्याप स्पष्टता झाली नाही. हे प्रचंड निराशाजनक असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या देखील तीन तेरा नऊ बारा वाजल्या आहेत. हार्दिक पांड्याचे टी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न आता अधिकृतरित्या भंगले आहे. मात्र हार्दिक पांड्याला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma leave MI : रोहित शर्माचं ठरलं, मुंबई सोडणार पण कशी? जाणून घ्या हा नियम..

Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..

IND vs ENG test series: विराट कोहली दारू पिऊन माझ्या अंगावर थुंकला; या दिग्गज फलंदाजाच्या आरोपाने खळबळ..

IND vs ENG Rajkot test: सरफराज खान खेळणार का? जाणून घ्या राजकोट कसोटीसाठीची भारतीय प्लेइंग11..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.