IND vs ENG Rajkot test: सरफराज खान खेळणार का? जाणून घ्या राजकोट कसोटीसाठीची भारतीय प्लेइंग11..

0

IND vs ENG Rajkot test: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून खेळण्यात येणार आहे. (IND vs ENG 3rd test) राजकोट मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. स्पिन गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी बनवण्यात आली असल्याने, दोन्ही संघाच्या फलंदाजांपुढे फलंदाजी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यातच भारतीय संघातील अनेक दिगज फलंदाज तिसरा कसोटी सामना खेळणार नसल्याने, भारताच्या समस्या आणखीन वाढल्या आहेत.

विराट कोहली (Virat kohli) यापूर्वीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. विराट नंतर आता केएल राहुल (kl Rahul) देखील दुखापतीमुळे तिसरा कसोटी सामना खेळणार नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरल्यामुळे श्रेयस अय्यरलाही (Shreyas Iyer) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. साहजिकच केएल राहूल, श्रेयस अय्यर नसल्यामुळे मिडल ऑर्डरची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेल (dhruv jurel) यालाही संधी देण्यात आली आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ध्रुव जुरेलने दमदार खेळाचे प्रदर्शन केलं आहे. साहजिकच डोमेस्टिक क्रिकेट प्रदर्शनाच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सातत्याने अपयशी ठरलेल्या केएस भरतला (ks Bharat) देखील तिसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नसल्याची माहिती आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंचे पदार्पण होणार असल्याची माहिती आहे.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सरफराज खानला (sarfaraaz khan) तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळणार आहे. राजकोटची खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना मदत करणारी बनवण्यात आली आहे. सरफराज खान स्पिन गोलंदाजी खेळण्यात मातब्बर आहे. याशिवाय केएल राहुल दुखापतीमुळे तिसरा सामना खेळू शकणार नाही. श्रेयस अय्यरला डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेट चाहत्यांना सरफराज खान खेळताना दिसणार आहे.

सरफराज खान शिवाय ध्रुव जुरेल यालाही देखील भारताच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार आहे. यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा या दोघांवर सलामीवीराची जबाबदारी असणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल, चौथ्या क्रमांकावर सरफराज खान आणि पाचव्या क्रमांकावर ध्रुव जुरेल खेळताना दिसणार आहे. सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची जबाबदारी जडेजा, अश्विन पार पाडतील. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आणि कुलदीप यादव अशी प्लेइंग इलेव्हन घेऊन भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

हे देखील वाचा  BCCI On Virat Kohli: विराटच्या फॅमिली फर्स्टच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचेही दमदार उत्तर..

Rohit Sharma leave MI : रोहित शर्माचं ठरलं, मुंबई सोडणार पण कशी? जाणून घ्या हा नियम..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.