Rohit Sharma leave MI : रोहित शर्माचं ठरलं, मुंबई सोडणार पण कशी? जाणून घ्या हा नियम..

0

Rohit Sharma leave MI : 2024 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या 17 व्या सीजनची सुरुवात 22 मार्चपासून सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. आयपीएल सतराव्या सीजनची तारीख अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आली नसली तरी, रिपोर्टनुसार 22 मार्च ते 26 मे या कालावधीमध्ये आयपीएल स्पर्धा खेळण्यात येणार आहे. (IPL 2024) आयपीएल सुरू होण्याला अजूनही दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. साहजिकच त्यामुळे आयपीएल ट्रेड विंडो (trade window) ओपन आहे.

आयपीएल अजून बराच कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच आयपीएल संदर्भातल्या अनेक घडामोडी समोर येत आहेत. अगदी खेळाडूंमध्ये आणि आयपीएल फेंचाईजी यांच्यामध्ये बिनसल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रोहित शर्मा (rohit sharma) यांच्यामध्ये देखील प्रचंड मतभेद असून, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स कडून खेळू इच्छित नसल्याची माहिती आहे.

मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केल्यानंतर रोहित शर्मा (rohit sharma) प्रचंड दुखावला गेला आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय रोहित शर्माला विश्वासात घेऊन केला नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यामधील संबंध अधिक ताणले गेले. हार्दिक पांड्याला देखील रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाच्या प्लेइंग11 मध्ये खेळवणं जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने (aakash Chopra) देखील या संदर्भात भाष्य केलं आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे कोच मार्क बाऊचरकडून (mark baucher) रोहित शर्माला कर्णधार पदावरून का काढून टाकले? याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आलं. मार्क बाऊचरच्या मुलाखतीनंतर रोहित शर्मा अधिकच दुखावला असल्याची बातमी आहे. इतकंच नाही तर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघाकडून न खेळण्याचा निर्णय देखील झाला असल्याचं बोललं जात आहे.

आयपीएल सुरू होण्याच्या एक महिना अगोदर पर्यंत ट्रेड विंडो ओपन (trade window open) असणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही खेळाडूला कोणत्याही संघात जाता येणार आहे. मात्र त्यासाठी मूळ संघ मालकाची परवानगीही आवश्यक आहे. जर रोहित शर्माला इतर कोणत्याही संघाने ट्रेड केलं, तर रोहित शर्माला जाता येईल. मात्र त्यासाठी मुंबई इंडियन्सची परवानगी आवश्यक आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर ट्रेड विंडोमध्ये काही तांत्रिक अडचण आली, किंवा मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला सोडण्याचा निर्णय घेतला नाही. तर रोहित शर्मा नाईलाजास्तव मुंबई इंडियन्स संघाकडूनच खेळणार आहे. मात्र पुढच्या सीजनमध्ये मेगा ऑप्शन होणार आहे. रोहित शर्मा स्वतःला त्या ऑप्शन टेबलवर ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे. एकूणच रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स या फॅमिलीला रामराम करण्याचा निर्णय झाला असून, या किंवा पुढच्या हंगामात हमखास तो इतर संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..

Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..

IPL 2024 MI : पत्नी रितिका नंतर रोहित शर्माचाही मुंबई इंडियन्सवर पलटवार; कमेंट करून म्हणाला..

BCCI On Virat Kohli: विराटच्या फॅमिली फर्स्टच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचेही दमदार उत्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.