Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..

0

Rohit Sharma Delhi capitals captain : क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलचे वेध लागले आहेत. लवकरच आयपीएल सुरू होणार असून, आयपीएल (IPL ) संदर्भात अनेक आश्चर्यकारक आणि धक्का देणाऱ्या घटना पाहायला मिळू शकतात. रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार पदावरून हकालपट्टी करून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) नवा कर्णधार घोषित केले. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कर्णधार करण्याचा निर्णय रोहित शर्माला विश्वासात घेऊन केला नसल्याचे उघड झाल्यानंतर, चाहते मुंबई इंडियन्सवर प्रचंड भडकले.

मुंबई इंडियन्सने घेतलेल्या निर्णयामुळे आयपीएलला जवळपास महिन्याहून अधिक कालावधी शिल्लक असतानाही यावर्षी होणारी आयपीएल स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. त्यातच आणखी भर म्हणून मुंबई इंडियन्स संघाचा कोच मार्क बाऊचरने (Mark Boucher) रोहित शर्माला कर्णधार पदावरून का काढून टाकले, या संदर्भातले कारण स्पष्ट केले. ज्यामुळे आणखी वाद निर्माण झाला. रोहितची पत्नी रितिकाने (Ritika sajdeh) पोस्टच्या माध्यमातून मुंबई इंडियन्स आणि कोच मार्क बाऊचरला फटकारले देखील आहे.

रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय भविष्याच्या दृष्टीने विचार करून घेण्यात आल्याचं मार्क बाऊचर म्हणाला. रोहित शर्माच्या खांद्यावरून ओझं कमी करण्याचा देखील आमचा प्लॅन होता. रोहित आता फलंदाजीचा आनंद मुक्तपणे घेईल. कॅप्टन पदाचे ओझं कमी झाल्यामुळे, त्याला आपल्या परिवारालासही वेळ देता येईल. असंही तो आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला. यावर रोहित शर्माची पत्नी रितिकाने या सगळ्या कहाण्या खोट्या असल्याचं म्हटलं. ज्यामुळे मार्क बाऊचरला आपली मुलाखत डिलीट देखील करावी लागली.

क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने (aakash Chopra) देखील यावर नुकतेच भाष्य केले आहे. मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद सांभाळले मोठे आव्हान हार्दिक पांड्यासमोर असल्याचं तो म्हणाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई इंडियन्स देखील हार्दिक आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये आणखी कटुता येऊ देऊ इच्छित नाही. त्यामुळे ट्रेड विंडोच्या (trade window) माध्यमातून रोहित शर्माला ट्रेड करण्यास तयारही असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) संघात ट्रेड विंडोच्या माध्यमातून जाणार असल्याचं कळते. कार अपघातामुळे ऋषभ पंत (rishabh pant) विकेट कीपिंग करू शकणार नाही. ऋषभ पंत केवळ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजी करणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधार पदी रोहित शर्माची निवड केली जाणार असल्याचीही माहिती आहे.

जर ट्रेड विंडोच्या माध्यमातून रोहित शर्माला दिल्ली संघात जाण्यासाठी काही अडचणी आल्या, तर रोहित शर्माने याविषयी देखील आपला प्लॅन आखला आहे. रोहित शर्माला दिल्ली संघामध्ये जाण्यासाठी काही अडचणी आल्या, तर तो मुंबई इंडियन्सकडून सुरुवातीचे काही सामने खेळणार आहे. मात्र त्यानंतर दुखापतीचे कारण देऊन, प्लेइंग 11 मधून स्वतःला बाजूला देखील ठेवणार असल्याचं कळतं.

हे देखील वाचा U19 world Cup final 2024 : भारताकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी; भारत ऑस्ट्रेलियामध्ये कोण आहे सरस..

ab de villiers apologize : विराटच्या कानउघाडणी नंतर एबी डिव्हिलियर्सने मागितली माफी; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

Ricky ponting on Rishabh pant: ऋषभ पंत खेळणार; रोहित शर्मा कर्णधार? कोच पाँटिंगकडून आयपीएल प्लॅन विषयी खुलासा..

ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

Methi Water Benefits : फक्त दोन महिने असे प्या मेथीचे पाणी; शरीरात होतील हे आश्चर्यकारक बदल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.