Ricky ponting on Rishabh pant: ऋषभ पंत खेळणार; रोहित शर्मा कर्णधार? कोच पाँटिंगकडून आयपीएल प्लॅन विषयी खुलासा..

0

Ricky ponting on Rishabh pant: आयपीएल (IPL 2024) आयपीएल 2024 ची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. महिन्याभरात आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी 2024 चा हंगाम प्रचंड वादग्रस्त आणि चर्चेतही राहिला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने रोहित शर्माची (rohit sharma) कर्णधार पदावरून हकालपट्टी केल्यानंतर रोहित शर्माची फॅमिली आणि एमआयचे चाहते देखील भडकल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा चर्चेत आला असून यावेळी प्रकरण हाताबाहेर देखील गेलं आहे.

काल मुंबई इंडियन्स संघाचा कोच मार्क बाऊचर (mark baucher) याने एक इंटरव्यू दिला. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्याचे कारण सांगितले. त्यामुळे आता नवा वाद देखील निर्माण झाला असून रोहितची पत्नी रीतीकाने मार्क बाऊचरने सांगितलेली सगळी कहाणी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. मार्क बाउजरच्या इंटरव्यूमुळे हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार करताना रोहित शर्माला विश्वासात घेतलं नसल्याचंही स्पष्ट झाले.

रोहित शर्माला हटवण्याची सगळी कारणे मार्क बाऊचरने सांगितली. मात्र त्याने सांगितलेली सगळी कहाणी चुकीची असल्याचं रितिकाने म्हटलं. साहजिकच त्यामुळे रोहित शर्मा हार्दिक पांड्याचा नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यासाठी इच्छुक नसल्याचंही स्पष्ट झालं आहे. इतकच नाही, तर रोहित शर्मा दिल्ली संघाकडून खेळताना देखील पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाँटिंगने दिल्ली कॅपिटल संघाच्या रणनीती विषयी भाष्य देखील केल्याने, या चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) संघाचा कोच रिकी पाँटिंगने (Ricky ponting) ऋषभ पंत विषयी भाष्य केले आहे. ऋषभ पंत 2024 मध्ये होणाऱ्या हंगामात खेळणार असल्याचं रिकी पॉंटिंगने म्हटले आहे. मात्र ऋषभ पंत कर्णधाराच्या भूमिकेत नसणार असेही पॉंटिंग म्हणाला. पॉंटिंगच्या विधानामुळे आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर हा टॉपिक ट्रेडिंगवर देखील आहे.

पेंटिंग पुढे म्हणाला, जर आम्ही त्याला विकेट किपिंग करण्यास सांगितले, तरीही तो नकार देखील देणार नाही. मात्र आम्ही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही. तो केवळ फलंदाज म्हणून, खेळताना दिसेल. चौदा समन्यांपैकी तो किमान दहा सामने खेळणार असल्याचं पाँटिंगने म्हंटले आहे. कॅप्टन संदर्भात रिकी पॉंटिंगने कोणत्याही भाष्य केलं नसल्याने, ट्रेड विंडोच्या माध्यमातून रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघात परतणार असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचा  ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

U19 World Cup 2024 : बीडच्या सचिन धसमुळे भारत फायनलमध्ये; कोण आहे सचिन धस? तेंडुलकरशी आहे खास नातं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.