U19 world Cup final 2024 : भारताकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी; भारत ऑस्ट्रेलियामध्ये कोण आहे सरस..

0

U19 world Cup final 2024 : 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक फायनल (world Cup final 2023) सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा झालेला पराभव क्रिकेट चाहते अजूनही विसरलेले नाहीत. संपूर्ण टूर्नामेंट भारतीय संघाने दमदार खेळ साकारला होता. लगातार दहा सामने जिंकून दणक्यात फायनलमध्येही प्रवेश केला. साहजिक भारत फायनल देखील जिंकेल, असं अनेकांना वाटत होतं. मात्र अनेकांचा भ्रम निराश झाला. आता मात्र या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय युवा खेळाडूंकडे चालून आली आहे. (IND vs AUS under 19 World Cup final)

काल ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 19 वर्षाखालील विश्वचषकमधील दुसरा सेमी फायनल सामना खेळण्यात आला. (PAK vs AUS) अटीतटीच्या या लढतीत एक विकेट राखून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय संपादन करत फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून यापूर्वीच फायनलमध्ये पोहोचला आहे. आता रविवारी 11 फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक फायनल पार पडणार आहे.

ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा भारतीय संघाला फायनलमध्ये भिडणार आहे. 2023 मध्ये झालेल्या विश्वचषकादेखील ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये फायनल खेळण्यात आला होत. मात्र दुर्दैवाने भारतीय संघाला पराभव सामना करावा लागला. आता या पराभवाचे परतफेड करण्याची संधी युवा खेळाडूंकडे चालून आली आहे. उदय सहारनच्या (uday Saharan) नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज देखील झाला आहे.

दोन्ही संघाची बलस्थाने आणि कुमकुवत बाजूंची तुलना करायची झाल्यास, भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा थोडासा कमकुवत वाटत आहे. ऑस्ट्रेलिया संघाची गोलंदाजी भारतीय गोलंदाजीपेक्षा अधिक तुल्यबळ असून, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज दमदार लयीत देखील आहेत. भारतीय सलामीवीर मात्र या स्पर्धेत साधारण राहिले आहेत. भारतीय संघाची सगळी मदार मधल्या फळीवर, असून मधली फळी दमदार फॉर्ममध्ये देखील आहे.

ऑस्ट्रेलियाचे तेज गोलंदाज दमदार फॉर्ममध्ये असून, भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याची शक्यता अधिक आहे. जर भारतीय संघाला अडीचशे धावांपर्यंत मजल मारता आली तर मात्र भारतीय संघ 19 वर्षाखालील विश्वचषकावर सहाव्यांदा आपले नाव कोरण्यात यशस्वी होईल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 230 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं. तर मात्र भारतीय संघासाठी सामना जिंकणं प्रचंड आव्हानात्मक मानलं जात आहे.

भारतीय फलंदाजीची सगळी मदार बीडचा सचिन दस (sachin dhas) मुशीर खान (mushir Khan) आणि कॅप्टन उदय सहारण या तिघांवर अवलंबून असणार आहे. गोलंदाजीमध्ये देखील राज लिंबानी दमदार फॉर्ममध्ये असून, त्याच्याकडेही अनेकांचे लक्ष असणार आहे. दोन्ही संघांपैकी फायनलचा प्रेशर जो उत्तम हँडल करेल, त्या संघाला जिंकण्याची संधी अधिक असणार आहे.

हे देखील वाचा Virat Kohli miss out: विराट कोहलीचे कमबॅक लांबणीवर; जाणून घ्या विराट कधी परतणार मैदानावर..

Rohit Sharma slang: त्या कारणामुळे मैदानातच रोहितने केली आयमाय वरून शिवीगाळ; कोणाला दिली ती घाणेरडी शिवी, पाहा व्हिडिओ..

ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

Methi Water Benefits : फक्त दोन महिने असे प्या मेथीचे पाणी; शरीरात होतील हे आश्चर्यकारक बदल..

Onion export ban : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? जाणून घ्या केंद्र सरकारचा प्लॅन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.